फोटो सौजन्य - Social Media
यंत्र लिमिटेडमध्ये भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. रोजगाराच्या शोधामध्ये असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. तसेच यंत्र लिमिटेडमध्ये काम करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण ३८८३ पदे भरले जाणार आहेत. या रिक्त जागांसाठी उमेदवारांना आमंत्रित केले गेले आहे. महत्वाचे म्हणजे जर तुम्ही ITI केले आहे, तर ही संधी खास तुमच्यासाठी आहे. या संधीचे सोने करण्याची मुदत काही काळापुरती मर्यादित आहे. त्यामुळे उमेदवारांना त्या वेळेच्या आधी अर्ज करणे अनिवार्य आहे. अन्यथा अर्ज स्वीकारले जाणार नाही. मुळात, या भरतीसंबंधित अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना या अधिसूचनेचा आढावा घेणे भाग आहे. या भरतीसंदर्भात सखोल माहिती या अधिसूचनेमध्ये पुरवण्यात आली आहे.
हे देखील वाचा : जर्मनीमध्ये भारतीयांसाठी स्पेशल व्हॅकन्सी; लोको पायलटच्या पदासाठी करता येईल अर्ज
एकूण ३८८३ पदांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये २४९८ पदे ITI चे प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांसाठी आहे. १३८५ पदे ITI न झालेल्या उमेदवारांसाठी आहे. एकंदरीत, जर तुम्ही ITI प्रमाणपत्र धारक नसाल तरी या भरतीला लाभ तुम्हाला घेता येणार आहे. महत्वाची बाब अशी आहे कि या भरतीच्या माध्यमातून नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची भरती इंडियन ऑर्डिनेंस तसेच ऑर्डिनेंस इक्विपमेंट फैक्ट्रिमध्ये केली जाईल. दरम्यान, दोन्ही उमेदवारांसाठी वेगवेगळी पदे रिक्त आहेत. ITI झालेल्या उमेदवारांसाठी वेगळी पदे रिक्त आहेत. तर ITI न झालेल्या उमेदवारांसाठी इतर काही पदे रिक्त आहेत. या पदांसाठी दोन्ही उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
यंत्र लिमिटेडच्या या भरतीमध्ये सहभाग घेऊ पाहणार्या उमेदवारांना काही अटी शर्तींचे पालन करावे लागणार आहे. या अटी शर्ती शैक्षणिक तसेच उमेदवाराच्या वयोमर्यादेसंदर्भात आहेत. या अधिसूचनमध्ये नमूद आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार किमान SSC उत्तीर्ण असावा. तसेच किमान ५०% गुण त्याला प्राप्त असावे, तरच या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच जर अर्ज कर्ता उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रामध्ये ITI प्रमाणपत्र आहे तर अतिउत्तम ठरेल. अधिसूचनुसार, एका ठराविक वयोगटातील उमेदवारांनाच या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. किमान १८ वर्षे आयु असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तर जास्तीत जास्त ३५ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. महत्वाची बाब अशी आहे कि आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात येईल.
हे देखील वाचा : UPSC च्या परीक्षेत निबंध लिहण्याचे टिप्स; अनुसरण करा, मिळवा चांगले गुण
स्टायपेंड पाहिले तर ITI न झालेल्या उमेदवारांना ६,००० रुपये स्टायपेंड दिले जाईल. तर संबंधित क्षेत्रामध्ये ITI केलेल्या उमेदवारांना ७,००० रुपये स्टायपेंड दिले जाईल. अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरायचे आहे. सामान्य क्ष्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना तसेच OBC प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना २०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. SC , ST , दिव्यांग तसेच महिला उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे.