Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिप शाळेची ‘इस्रो’ पर्यंत भरारी! स्पर्धा जिल्हास्तरीय परीक्षेत संपादन केले घवघवीत यश

कल्याणमधील जि.प. शाळेने ‘मिशन भरारी’ उपक्रमातून जिल्हास्तरीय स्पर्धेत अव्वल स्थान मिळवले. तीन विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे शैक्षणिक सहलीसाठी निवड झाली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 26, 2026 | 07:58 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील काकडवाल गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने ‘मिशन भरारी’ उपक्रमांतर्गत घेतलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्यात अव्वल स्थान पटकावले आहे. या यशामुळे शाळेच्या तीन विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे शैक्षणिक सहल आणि अभ्यास दौऱ्यासाठी प्रथम क्रमांकाने निवड झाली आहे. सरकारी शाळांच्या गुणवत्तेबाबत नवा आदर्श निर्माण करणारे हे यश ठाणे जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

जागतिक पुस्तक दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन! उपक्रमातून विद्यार्थ्यांना विविध लेखकांच्या पुस्तकांशी झाली ओळख

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अंकित मढवी (इयत्ता ५ वी), चैत्रवी साळवी (इयत्ता ७ वी) आणि दक्ष भाने (इयत्ता ७ वी) यांचा समावेश आहे. या तिघांनीही तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवत शाळेचा लौकिक उंचावला आहे. केंद्र, तालुका आणि जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांनी सातत्यपूर्ण गुणवत्तेचे प्रदर्शन करत यश मिळवले.

या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हे महत्त्वाचे घटक ठरले आहेत. इयत्ता पाचवीचे वर्गशिक्षक सोमनाथ दंडगव्हाळ आणि सातवीच्या वर्गशिक्षिका सुजाता सपकाळ यांनी विद्यार्थ्यांच्या संकल्पना भक्कम करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. तसेच अजय जाधव यांनी अतिरिक्त तासिका घेत विद्यार्थ्यांना अधिक सक्षम बनवले.

विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी आधुनिक डिजिटल साधनांचा वापर केला. गुगल जेमिनी एआय सारख्या तंत्रज्ञानाचा अभ्यासात समावेश केल्यामुळे त्यांना विषय समजून घेणे अधिक सोपे झाले. त्यामुळे त्यांच्या यशात तंत्रज्ञानाचीही मोठी भूमिका असल्याचे दिसून येते.
शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री नाडे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकवर्ग, स्वयंसेविका आणि संस्थेच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य झाला आहे. शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि स्थानिक समाजघटकांनी दिलेल्या पाठबळामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल अधिक बळकट झाले.

Sangali News : शिष्यवृत्ती परिक्षेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज; चौथीसाठी 141 तर सातवीसाठी 104केंद्रे

जिल्हा परिषद शाळेने खासगी शाळांना मागे टाकत मिळवलेले हे यश ठाणे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे. ‘मिशन भरारी’ उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी आणि शिक्षक-विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले असून, भविष्यात अशाच यशस्वी कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Zilla parishad school soars to isro heights achieves resounding success in district level competitive examination

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 07:56 PM

Topics:  

  • ISRO
  • ISRO Scientists

संबंधित बातम्या

‘ISRO’ मध्ये इंटर्नशिपची सुवर्णसंधी! कोणती कागदपत्रे, अर्जांची अंतिम तारीख, पात्रता AtoZ माहिती जाणून घ्या…
1

‘ISRO’ मध्ये इंटर्नशिपची सुवर्णसंधी! कोणती कागदपत्रे, अर्जांची अंतिम तारीख, पात्रता AtoZ माहिती जाणून घ्या…

NISAR: अंटार्क्टिकाच्या बर्फाखाली रहस्य! बर्फात दिसला महाकाय ‘हमिंगबर्ड’ पक्षी; नासा-इस्रोच्या NISAR उपग्रहाने टिपले अद्भूत दृश्य
2

NISAR: अंटार्क्टिकाच्या बर्फाखाली रहस्य! बर्फात दिसला महाकाय ‘हमिंगबर्ड’ पक्षी; नासा-इस्रोच्या NISAR उपग्रहाने टिपले अद्भूत दृश्य

28 वर्षांच्या तरुणांनी रचला इतिहास! Vikram 1 च्या यशस्वी लाँचिंगवर गौतम अदानींचं मोठी प्रतिक्रिया, ‘हाच खरा आत्मनिर्भर भारत!’
3

28 वर्षांच्या तरुणांनी रचला इतिहास! Vikram 1 च्या यशस्वी लाँचिंगवर गौतम अदानींचं मोठी प्रतिक्रिया, ‘हाच खरा आत्मनिर्भर भारत!’

Skyroot Aerospace: इस्रोच्या जोडीदाराची अंतराळात मोठी भरारी; त्यांनी उभारलेल्या ‘स्कायरूट एअरोस्पेस’ ची यशोगाथा एकदा वाचाच
4

Skyroot Aerospace: इस्रोच्या जोडीदाराची अंतराळात मोठी भरारी; त्यांनी उभारलेल्या ‘स्कायरूट एअरोस्पेस’ ची यशोगाथा एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.