Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

28 वर्षांच्या तरुणांनी रचला इतिहास! Vikram 1 च्या यशस्वी लाँचिंगवर गौतम अदानींचं मोठी प्रतिक्रिया, ‘हाच खरा आत्मनिर्भर भारत!’

भारताच्या अंतराळ मोहिमेत एका खाजगी स्टार्टअपच्या २८ वर्षीय तरुणांनी 'विक्रम-१' रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करून नवा इतिहास रचला आहे. या ऐतिहासिक यशाचे कौतुक करताना दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांनी, "हाच खरा आत्मनिर्भर भारत आहे", अशा शब्दांत या तरुण शास्त्रज्ञांचं कौतुक केलं केला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 18, 2026 | 06:28 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • 28 वर्षांच्या तरुणांनी रचला इतिहास!
  • Vikram 1 चं यशस्वी लाँचिंग
  • गौतम अदानींचं मोठी प्रतिक्रिया
भारतात जेव्हा जेव्हा अंतराळ आणि रॉकेटचा विषय निघायचा, तेव्हा डोळ्यांसमोर फक्त एकच नाव – इस्रो (ISRO – भारतीय अंतराळ संशोधन संस्था) आणि मनामध्ये ही एकच स्वप्न जर अवकाशात भरारी घ्यायची असेल तर मेहनत करुन इस्त्रोमध्ये पोहोचायचं. या अगोदर उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी असणारी लांबलचक प्रतीक्षा यादी आणि प्रचंड खर्च यामुळे व्यावसायिक अंतराळ उड्डाणे सामान्य लोक आणि लहान कंपन्यांच्या आवाक्याबाहेर होती. मात्र, आज भारताच्या कमर्शियल स्पेस सेक्टरमध्ये एका अशा शांत क्रांतीने जन्म घेतला आहे, ज्याने संपूर्ण जगाला थक्क केले आहे.

Mutual Fund Claim: गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर क्लेम मिळणं झालं सुटसुटीत! सिग्नेचर मिसमॅचचं टेन्शन मिटलं, पाहा नवे नियम

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी शनिवारी विक्रम-१ च्या यशस्वी कक्षीय प्रक्षेपणाबद्दल स्कायरूट एरोस्पेसचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, ही ऐतिहासिक मोहीम भारताच्या खाजगी अंतराळ उद्योगासाठी एका नव्या युगाची सुरुवात असून ‘आत्मनिर्भर भारत’च्या भावनेचे एक खरे उदाहरण आहे.

‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये गौतम अदानी म्हणाले की, “विक्रम-१ चे पहिले यशस्वी कक्षीय उड्डाण आणि मोहिमेची सर्व उद्दिष्टे साध्य होणे, ही भारताच्या वेगाने विकसित होत असलेल्या खाजगी अंतराळ परिसंस्थेसाठी एक ऐतिहासिक उपलब्धी आहे.

अदानी म्हणाले, “हे अभियान शक्य करुन दाखवल्याबद्दल पवन चंदना, भारत ढाका, स्कायरूट एरोस्पेसची उत्कृष्ट टीम, तसेच इस्रो आणि इन-स्पेस यांचे मनःपूर्वक अभिनंदन. विक्रम-१ ने आपल्या पहिल्याच कक्षीय उड्डाणात मोहिमेची सर्व उद्दिष्ट्ये यशस्वीरित्या पूर्ण केली असून, भारताच्या खाजगी अंतराळ क्षेत्रासाठी एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. इतिहास घडला आहे. विक्रम-१ ने आपल्या पहिल्याच कक्षीय उड्डाणात मोहिमेची सर्व उद्दिष्ट्ये उत्कृष्टपणे पूर्ण केली आहेत. हाच ‘आत्मनिर्भर भारता’चा खरा पुरावा आहे.” असं म्हणत त्यांनी कौतुक केलं आहे.

या मोहिमेचे वर्णन भारताच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक असे करताना ते म्हणाले की, ही कामगिरी देशाची वाढती तांत्रिक क्षमता आणि नाविन्यपूर्ण शक्ती जगाला दाखवते. ते म्हणाले, “या टीमचे सरासरी वय फक्त २८ वर्षे आहे. तरुण भारत काय साध्य करू शकतो, याचा हा जगाला दिलेला पुरावा आहे. जय हिंद!”

शनिवारी सकाळी, हैदराबादस्थित स्कायरूट एरोस्पेसने ‘मिशन आगमन’चा भाग म्हणून विक्रम-१ चे यशस्वी प्रक्षेपण केले. यासह, अमेरिका आणि चीननंतर भारत हा जगातील तिसरा देश ठरला आहे, जिथे एका खाजगी कंपनीने कक्षेत रॉकेट प्रक्षेपित करण्याची क्षमता यशस्वीरित्या प्रदर्शित केली आहे. भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या नावावर असलेले, चार टप्प्यांचे विक्रम-१ हे प्रक्षेपण यान लहान उपग्रहांसाठी जलद आणि मागणीनुसार प्रक्षेपण सेवा प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आले आहे.

जागतिक व्यावसायिक प्रक्षेपण बाजारपेठेत भारताचे स्थान अधिक मजबूत करण्याच्या दिशेने हे अभियान एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जाते.जवळपास सात मजली उंच असलेले हे रॉकेट पृथ्वीच्या निम्न कक्षेत (LEO) सुमारे ४५० किलोमीटर उंचीवर पोहोचवण्यासाठी पाठवण्यात आले. या यशस्वी प्रक्षेपणामुळे, भारत त्या निवडक देशांच्या गटात सामील झाला आहे, जिथे खाजगी कंपन्यांनी कक्षीय प्रक्षेपण क्षमता यशस्वीरित्या प्रदर्शित केली आहे.

PF धारकांसाठी मोठी बातमी! जुने प्रलंबित क्लेम वेळेत सोडवण्यासाठी EPFO चा मोठा निर्णय, VISHWAS 2026 केला लॉन्च

Web Title: 28 year olds make history successful launch of vikram 1 gautam adani shares a major reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 06:28 PM

Topics:  

  • Business News
  • Gautam Adani
  • Hyderabad
  • ISRO
  • ISRO Scientists
  • Marathi News
  • Space
  • space mission

संबंधित बातम्या

Mutual Fund Claim: गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर क्लेम मिळणं झालं सुटसुटीत! सिग्नेचर मिसमॅचचं टेन्शन मिटलं, पाहा नवे नियम
1

Mutual Fund Claim: गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर क्लेम मिळणं झालं सुटसुटीत! सिग्नेचर मिसमॅचचं टेन्शन मिटलं, पाहा नवे नियम

Medha Manjrekar : “कॅन्सरपेक्षा जास्त कठीण..” आजारांशी लढताना मेधा मांजरेकरांनी काय सहन केलं सगळं सांगितलं
2

Medha Manjrekar : “कॅन्सरपेक्षा जास्त कठीण..” आजारांशी लढताना मेधा मांजरेकरांनी काय सहन केलं सगळं सांगितलं

Skyroot Aerospace: इस्रोच्या जोडीदाराची अंतराळात मोठी भरारी; त्यांनी उभारलेल्या ‘स्कायरूट एअरोस्पेस’ ची यशोगाथा एकदा वाचाच
3

Skyroot Aerospace: इस्रोच्या जोडीदाराची अंतराळात मोठी भरारी; त्यांनी उभारलेल्या ‘स्कायरूट एअरोस्पेस’ ची यशोगाथा एकदा वाचाच

तुम्हीही Muthoot Finance कडून घेतलंय गोल्ड लोन? RBI कडून बँकेवर कडक कारवाई, ग्राहकांवर काय होणार परिणाम?
4

तुम्हीही Muthoot Finance कडून घेतलंय गोल्ड लोन? RBI कडून बँकेवर कडक कारवाई, ग्राहकांवर काय होणार परिणाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.