नागपुरात संचारबंदी कायम; अनेक शाळांना सुट्टी जाहीर (फोटो - सोशल मीडिया)
चंद्रपूर : पालक आपल्या मुलांवर चांगले संस्कार आणि शिक्षण मिळावे यासाठी शाळांमध्ये पाठवत असतात. खेडेगावांमध्ये जिल्हापरिषदेच्या शाळांमध्ये पाठवावे असे आवाहन केले जाते. मात्र चंद्रपूरमध्यचे जिल्हापरिषदेच्या शाळेमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. शाळेच्या शिक्षिकेने सातवीच्या वर्गातील 17 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघकीस आला आहे. शिक्षिकेने जबर मार दिल्यानंतर दोन विद्यार्थिनींना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना जवळच्या सावली ग्रामीण रुग्णालयातही भरती करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे शहरामध्ये एकच खळबळ उडाली असून सर्वांनी यावर रोष व्यक्त केला आहे.
शाळेमध्ये विद्यार्थी आणि शिक्षिका यांच्यामध्ये गुरु-शिष्याप्रमाणे नाते असते. चुकल्यावर कान धरणारा आणि जिंकल्यावर शाबासकी देणारा हा शिक्षकच असतो. मात्र एका शिक्षिकेने तर कहरच केला आहे. सातवीच्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली आहे. तब्बल 17 विद्यार्थ्यांना या शिक्षिकेने बदडून काढले. एवढी मोठी मारहाणीची शिक्षा देण्यात आली की दोन विद्यार्थींनीना रुग्णालयामध्ये दाखल करावे लागले. या शिक्षिकेने सातवीच्या वर्गातील तब्बल 17 विद्यार्थ्यांना मारले आहे. चंद्रपुरातील व्याहाड खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये हा संबंधिकत धक्कादायक प्रकार घडला आहे. उज्वला पाटील असे या शिक्षिकेचे नाव असून त्या शाळेमध्ये विषय शिक्षिका म्हणून काम करत आहेत.
हे देखील वाचा : धक्कादायक! पोलिसांनीच काढली महिलेची छेड; सिंधुदुर्गमधील प्रकारेने उडाली एकच खळबळ
उज्वला पाटील या शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याने मुलींना त्रास झाला असून दोषी शिक्षिकेवर कारवाई करण्याची पालकांची मागणी आहे. माझ्या पिण्याच्या पाण्यात काहीतरी मिसळवले असा आरोप करत या शिक्षेकेने विद्यार्थ्यांना बेदम मारलं आहे. त्यांच्या पिण्याच्या पाण्याची बाटलीमध्ये विद्यार्थींनीनी काहीतरी मिसळ्याचा आरोप शिक्षिकेंनी केला. यानंतर त्यांनी वर्गातील विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. यामुळे दोन विद्यार्थींनीची तब्येत बिघडली. धनश्री हरिदास दहेलकर आणि लावण्या कुमदेव चौधरी या दोन विद्यार्थिनींना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर चंद्रपूर मधीलच सावली ग्रामीण रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. या मुलींच्या पालकांची निष्ठूर शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी आहे.