भारताने लॉंच केला एआय चॅटबॉट (फोटो- istockphoto)
भारताने लॉंच केला स्वदेशी एआय चॅटबॉट
कायवेक्स असे आहे नवीन चॅटबॉटचे नाव
अमेरिका-चीनच्या सर्ज इंजिनला देणार टक्कर
सध्या जगभरात एआयचा वापर केला जातो. जवळपास सर्वच गोष्टींमध्ये एआय टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. एआयचे अनेक फायदे असल्याचे आपल्याला दिसून येतात. दरम्यान अमेरिका, चीन या देशांनी सर्वात आधीच एआय चॅटबॉट लॉंच केले आहेत. दरम्यान भारतात देखील सर्व क्षेत्रांमध्ये या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. भारताने आपला स्वदेशी एआय चॅटबॉट लॉंच केला आहे. भारताने Kyvex नावाचा चॅटबॉट केला आहे.
Kyvex एआय चॅटबॉट हा स्वदेशी आहे. हा एक एआय असिस्टंट आहे. सखोल अभ्यास यावर तो काम करतो. लार्ज या कंपनीच्या स्वतःच्या भाषेवर हा चॅटबॉट चालतो. अचूक उत्तरे देखील हा चॅटबॉट देत असल्याचे म्हटले जात आहे. हा एआय चॅटबॉट पूर्णपणे मोफत आहे. शिक्षण, संशोधन, यासाठी याचा वापर करता येऊ शकतो.
Kyvex चॅटबॉट संपूर्णपणे भारतीय इंजिनियर्सने तयार केले आहे. हे तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारची विदेशी मदत घेण्यात आलेली नाही. हा चॅटबॉट वेब वर देखील उपलब्ध आहे. अँन्ड्रॉईड आणि आयओएसवरून हा चॅटबॉट वापरता येऊ शकतो. यामुळे अनेक लोक याचा वापर करू शकणार आहेत.
Gemini AI मध्ये येणार Nano Banana चं नवीन व्हर्जन
अलीकडेच गुगलवर Nano Banana ट्रेंड व्हायरल झाला होता. तेव्हा या ट्रेंडची संपूर्ण सोशल मीडियावर वेगळीच क्रेझ होती. युजर्स गुगल जेमिनीवर फोटो अपलोड करून वेगवेगळ्या अवतारात पोट्रेट तयार करत होते. कधी साडी प्रोट्रेट, तर कधी लेहेंगा. कधी dreamy Polaroid-style aesthetics तर कधी cinematic AI visuals. या सर्वांनी युजर्सच्या मनावर राज्य केलं होतं. आजही हा ट्रेंड युजर्समध्ये तितकाच लोकप्रिय आहे. इंस्टाग्राम, एक्स, व्हॉट्सअॅप या सर्व सोशल मीडियावर गुगल जेमिनी ट्रेंडची जादू पसरली होती.
आता नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, Google आता एका मोठा निर्णय घेत आहे. कंपनी या Nano Banana चे नवीन वर्जन Nano Banana 2 लाँच करण्याचा निर्णय घेणार आहे. हे नवीन वर्जन आधीपेक्षा कितीतरी पट जास्त पावरफुल, स्टाइल-कंट्रोल्ड आणि क्रिएटिव फीचर्सने सुसज्ज असणार आहे.
पहिले वर्जन Nano Banana ला Gemini AI suite अंतर्गत लाँच करण्यात आले होते आणि अगदी कमी काळात हे वर्जन फॅशन, आर्ट आणि फोटो एडिटिंग कम्युनिटीचे आवडते टूल ठरले. आता याचे नवीन वर्जन देखील लवकरच लाँच केले जाणार आहे. नवीन वर्जन, ज्याला आता Nano Banana 2 (किंवा GEMPIX2, कारण ते अंतर्गत सिस्टम फाइल्समध्ये आढळले आहे) असे म्हणतात, ते गुगलच्या एआय क्रिएटिव्ह इकोसिस्टमला एका नवीन स्तरावर घेऊन जाणार आहे. टेक एक्सपर्ट्स आणि Gemini टेस्टर्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन वर्जनच्या सुरुवातीच्या झलक आधीपासूनच इंटरनेटवर दिसू लागल्या आहेत. ज्यामुळे असे संकेत मिळाले आहेत की, या नवीन वर्जनची रिलीज डेट आता जवळ आली आहे.






