Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फसवणुकीतून ऑनलाईन 38 लाख रुपये बँकेतून परस्पर गायब; हायकोर्टाने दिला ‘हा’ महत्त्वाचा निकाल

कोर्डे यांच्या बँक खात्यातून ४१ मिनिटांत ८ अनधिकृत व्यवहारांद्वारे फसवणूक झाली होती. त्यांच्या व्यवहारांची मर्यादा ४ लाख रुपयांवरून 40 लाखांपर्यंत वाढवली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 14, 2026 | 03:07 PM
धक्कादायक ! 6 वर्षांच्या चिमुकलीसोबत नराधमाचे अनैसर्गिक कृत्य; कोर्टाने सुनावली मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

धक्कादायक ! 6 वर्षांच्या चिमुकलीसोबत नराधमाचे अनैसर्गिक कृत्य; कोर्टाने सुनावली मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

Follow Us
Follow Us:

मुंबई : चार वर्षांपूर्वी अनधिकृत ऑनलाईन व्यवहारांद्वारे ३८.०४ लाख रुपये गमावलेल्या पुण्यातील व्यावसायिकाला उच्च न्यायालयाने दिलासा दिला. न्यायमूर्ती भारती डांगरे व न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने व्यवसायिक सुबोध कोर्डे यांनी गमावलेली रक्कम परत देण्याचे आदेश एचडीएफसी बँकेला दिले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार झीरो लायबिलिटी अंतर्गत परताव्यासाठी ते पात्र असल्याचे स्पष्ट केले.

कोर्डे यांच्या बँक खात्यातून ४१ मिनिटांत ८ अनधिकृत व्यवहारांद्वारे फसवणूक झाली होती. त्यांच्या व्यवहारांची मर्यादा ४ लाख रुपयांवरून 40 लाखांपर्यंत वाढवली होती. हे व्यवहार आपण केले नसून त्यासाठी कोणताही ओटीपी मिळाला नसल्याचा दावा करून बँकेला पैसे देण्याचे आदेश द्या, अशी विनंती याचिका कोर्डे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर खंडपीठात सुनावणी झाली. याचिका निकाली लागल्याने याचिकाकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

रिझर्व्ह बँकेच्या नियमाचा आधार

आरबीआयच्या ६ जुलै २०१७ च्या परिपत्रकाचा आधार घेत खंडपीठने ग्राहकाचा निष्काळजीपणा सिद्ध करण्याची जबाबदारी बँकेची आहे. ग्राहकाची चूक नसेल आणि त्याने त्वरित तक्रार केली असेल, तर त्याचे दायित्व शून्य असते. कोर्डे यांनी फसवणूक लक्षात येताच वेगाने पावले उचलली. त्यांच्या बाजूने निष्काळजीपणाचा पुरावा नसल्याचे निरीक्षण नोंदवीत त्यांना रक्कम देण्याचे आदेश बँकेला दिले आहेत.

UPI व्यवहारांच्या संख्येत मोठी वाढ

दुसरीकडे, डिजिटल पेमेंटच्या युगात यूपीआय (UPI) व्यवहारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, त्यासोबतच ऑनलाईन फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. हे टाळण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आता अधिक कडक पावले उचलत आहे. लवकरच भारतीय रिझर्व्ह बँक एक असा बदल लागू करण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे ऑनलाइन पेमेंट करण्याच्या पद्धतीत पूर्णपणे परिवर्तन घडू शकते. यूपीआय प्लॅटफॉर्मवर ‘किल स्विच’ (Kill Switch) हे फिचर उपलब्ध करून दिले जाणार आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांचे खाते अधिक सुरक्षित ठेवता येईल.

Education Allowance : शिक्षणासाठी सरकार देतंय 33750 वार्षिक भत्ता! तुमचीही मुलं घेऊ शकता का लाभ? जाणून घ्या सविस्तर

Web Title: 38 lakhs looted from bank account through online fraud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • crime news
  • Fraud Case
  • online fraud

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.