इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे ( Israel Hamas war) परिणाम जगभरात दिसून येत आहेत. काही ठिकाणी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत असून अनेक देशांमध्ये हिंसाचारही झाला आहे. दरम्यान, अमेरिकेतील शिकागो येथे इस्रायल-हमास युद्धातून निर्माण झालेल्या द्वेषामुळे एका 6 वर्षाच्या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला. एका 71 वर्षीय व्यक्तीने 6 वर्षाच्या मुस्लीम मुलावर चाकूने 26 वार केले. मुलाच्या 32 वर्षीय आईवरही चाकूने डझनभर वार करण्यात आले. महिलेचा जीव वाचला मात्र मुलाचा मृत्यू झाला. इस्लाम द्वेषातून वृद्धाने मुलावर आणि महिलेवर हल्ला केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धानंतर तो खूप संतापला होता.
[read_also content=”महुआ मोईत्रावर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोईत्रांनी लाच घेतली, भाजपचा आरोप, उद्योगपती दर्शन हिरानंदानींच नाव आलं समोर! https://www.navarashtra.com/india/bjp-allegation-on-tmcs-mahua-moitra-took-bribe-from-businessman-to-ask-question-in-parliament-nrps-470528.html”]
साउथवेस्ट शिकागोच्या प्लेनफिल्ड टाऊनशिपमध्ये ही घटना शनिवारी सकाळी घडली. मुलगा त्याच्या आईसोबत राहत होता. वाडिया अल फयुम असे या मुलाचे नाव असून तो पॅलेस्टिनी-अमेरिकन आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सकाळच्या सुमारास अचानक महिलेच्या घरी आला आणि तिची गळा दाबून हत्या करू लागला. तुम्हा मुस्लिमांना मरावे लागेल, असे तो म्हणत होता. यावेळी त्याने तिच्या चिमुकल्या 6 वर्षाच्या मुलावरही हल्ला केला. आरोपीने मुलावर तब्बल 26 वाप केले. त्याच्या छातीवर आणि मानेवर खोल जखमा झाल्या.
आरोपीने हल्ला केल्यावर महिलेने त्याला रोखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. त्याच्याशी भांडण करताना महिलेने 911 वर कॉल देखील केला. मात्र, पोलिस पोहोचेपर्यंत मुलगा आणि महिला दोघेही गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी दोघांनाही तात्काळ रुग्णालयात नेले मात्र मुलाचे प्राण वाचू शकले नाहीत. रुग्णालयात मुलाच्या पोटातून सात इंची ब्लेड काढण्यात आले आहे. या हत्येत लष्करातील चाकू वापरण्यात आला होता.
पोलीस आल्यावर त्यांनी पाहिले की आरोपीही घराच्या ओट्यावर बसला होता. त्याच्या डोक्यालाही दुखापत झाली होती. त्याच्यावर फर्स्ट डिग्री हत्येचा आरोप आहे. ही हत्या अत्यंत निर्घृण होती यात शंका नाही असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, हेट क्राईम अँगल तपासले जात आहे. इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धानंतर अमेरिकेत ज्यू आणि मुस्लिमांमध्ये तणाव वाढला आहे. सोशल मीडियावरही दोन्ही समाजाचे लोक भांडत आहेत.
इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेत द्वेषाच्या गुन्ह्यांच्या घटना वाढत आहेत. आरोपीच्या मोबाईलवरूनही तो मुस्लिमांचा प्रचंड द्वेष करत असल्याचे दिसून येते.अमेरिकन इस्लामिक रिलेशन्स कौन्सिलनेही या घटनेची दखल घेत त्याचा निषेध केला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की,






