crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जौनपूर जिल्ह्यात राहणाऱ्या एका ७५ वर्षीय वृद्धाने ३५ वर्षीय महिलेशी मग्न केले. मात्र त्यांचा आनंदाचा क्षण जास्त काळ काही टिकला नाही. लग्नाच्या रात्री लगेच वृद्धाचा मृत्यू झाला. या अनपेक्षित घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चां होत आहे. सर्वांचे लक्ष पोलिसांच्या पुढील तपासाकडे लागले आहे.
नेमकं काय प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, घडलेली घटना जौनपूरच्या गौराबादशाहपूर पोलीस स्टेशन हद्दीतील कुछमुछ गावातील आहे. मृतकाचे नाव संगरू राम (75) असे आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन एका वर्षांपूर्वी झाले होते. त्यांना मुलं- बाळ नव्हते आणि ते एकटेच शेतीची कामे सांभाळत होते. कुटुंबातील सदस्यांनी संगरू राम यांना दुसरे लग्न न करण्याचा सल्ला दिला होता. तरी देखील संगरू राम यांनी कोणाचेही ऐकले नाही.
रात्रभर गप्पा मारल्या आणि…
त्यांनी 29 सप्टेंबर रोजी जलालपूर परिसरातील मनभावती (35) या महिलेशी लग्न केलं. आधी कोर्टात नंतर मंदिरात सात फेरे घेतले. मात्र त्यांचा आनंदाचा हा क्षण जास्त काळ काही टिकला नाही. लग्नाच्या रात्री दोघांनी उशिरापर्यंत गप्पा मारल्या. मात्र दुसर्या दिवशी सकाळी अचानक संगरू राम यांची तब्येत बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
संपूर्ण गावात या घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे. अनेकांचे म्हणणे आहे ही हा खेळ नशिबाचा आहे, तर काही लोक या घटनेला संशयास्पद मानत आहेत. या प्रकरणाला आता अजून एक नवीन वळण आलं आहे. ते म्हणजे राम यांच्या भाच्यांमुळे. जेव्हा संगरू राम यांच्या दिल्लीत राहणाऱ्या भाच्यांना माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी गावात येऊन अंत्यसंस्कार थांबवले. आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाणार का आणि पोस्टमार्टम केले जाणार का. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
३९ कोटींच्या विम्यासाठी मुलाने रचला कट; आई-वडिलांना ठार करून दाखवला अपघात, पत्नीच्या मृत्यूनंतर…
उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी स्वत:च्या आई-बापाची हत्या केली आणि हि हत्या अपघात असल्याचे दाखवलं. एवढेच नाही तर त्यांने आपल्या पत्नीचाही अपघातात मृत्यू झाल्याचा दाखवला असून त्यातून देखील आरोपीने इन्शुरन्सचे पैसे मिळवले असल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला आणि त्याचा साथीदाराला अटक केली असून त्याचा तपास सुरु आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव विशाल सिंघल असे आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील हापुड येथील असल्याचे समोर आले आहे.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची फसवणूक, तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा; आता पोलिसांनी…