Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv Crime: पत्नीनेच प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; आधी दारू पाजली, नंतर मिरची पावडर टाकून…

उमरगा बायपासजवळ 35 वर्षीय शाहूराज सूर्यवंशी याची धारदार हत्यार व दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. पत्नी व तिच्या प्रियकराने अनैतिक संबंधातून कट रचल्याचा उलगडा पोलिसांनी 12 तासांत केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 08, 2026 | 11:07 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • उमरगा बायपासजवळ मृतदेह आढळून खळबळ
  • मृताची ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे 4 तास प्रयत्न
  • अनैतिक संबंधातून हत्या केल्याची कबुली
  • दारू पाजून, मिरची पावडर टाकून दगडाने ठेचून खून
धाराशिव: धाराशिव येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. आधी दारू पाजली नंतर त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. याप्रकरणाचा उलगडा पोलिसांनी अवघ्या १२ तासात केली. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव शाहूराज महादू सूर्यवंशी (वय 35) असे आहे.

Palghar Crime: पालघरमध्ये लग्नाचं आमिष देत 20 वर्षीय आदिवासी तरुणीची 3 लाखांत विक्री; गर्भावस्थेत मारहाण, जेवण नाही आणि…

काय नेमकं प्रकरण?

उमरगा शहर बायपासजवळील कोरेगाववाडी रस्त्यानजीक एका 35 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह नागरिकांना आढळून आला नागरिकांनी या घटनेची माहिती तात्काळ उमरगा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेहाचा चेहरा आरोपींनी विद्रूप केला होता. त्यामुळे मृतांची ओळख पटवणे कठीण झाले होते.

आपल्या अनुभवाच्या आधारे तपासाची सूत्रे हलवली. शेजारील शेतकरी, स्थानिक नागरिक यांच्याशी संपर्क साधून सखोल चौकशी करण्यात आली. अखेर चार तासांच्या प्रयत्नानंतर मृतांची ओळख पटवण्यात यश आले. पोलिसांनी तातडीने श्वान पथकाला पाचारण केले. फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी दाखल होऊन तपास केले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स व इतर तांत्रिक पुराव्यांची सखोल तपासणी केली.

पोलिसांनी तपासातून शिवाजी दत्तू दूधनाळे (वय 32) आणि मृताची पत्नी गौरी शाहूराज सूर्यवंशी (वय 34) यांचा सहभाग स्पष्ट झाला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले त्यानंतर कसून चौकशी केली असता त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

Dharashiv Crime: तुळजापुर हादरलं! चुलत्यानेच 13 वर्षीय पुतण्याचा काढला काटा; आई-काकाच्या अनैतिक संबंधांची माहिती…

कशी केली हत्या?

रविवारी पहाटे आरोपी शिवाजीने शाहूराजला दारू पाजली. त्यानंतर रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास त्याला उमरगा बायपासजवळील कोरेगाववाडी रस्त्यावर नेले. तेथे शाहूराजच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली नंतर जमिनीवर पाडण्यात आले. त्यानंतर हंटर आणि दगडाने त्याच्या डोक्यावर जोरदार हल्ला केला. यात शाहूराज सूर्यवंशी रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला.

का केली हत्या?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शाहूराजची पत्नी गौरी आणि आरोपी शिवाजी यांच्यात अनैतिक संबंध होते. या कारणावरून शाहूराज आणि गौरी यांच्यात सतत वाद होत होते. शाहूराज अडथळा ठरत असल्याने गौरी आणि शिवाजी यांनी त्याचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला. आणि त्याची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत व्यक्ती कोण होती?

    Ans: शाहूराज महादू सूर्यवंशी (वय 35).

  • Que: हत्या कशामुळे झाली?

    Ans: पत्नी व प्रियकरातील अनैतिक संबंधातून.

  • Que: आरोपी कोण आहेत?

    Ans: पत्नी गौरी सूर्यवंशी व तिचा प्रियकर शिवाजी दूधनाळे.

Web Title: Dharashiv crime the wife along with her lover murdered her husband

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 11:07 AM

Topics:  

  • crime
  • Dharashiv
  • Dharashiv Crime

संबंधित बातम्या

Ashok Kharat : भोंदू खरातचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढला; महिन्यापासून खरात ताब्यात, फलनिष्पत्ती काय?
1

Ashok Kharat : भोंदू खरातचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढला; महिन्यापासून खरात ताब्यात, फलनिष्पत्ती काय?

एक फ्लॅट, दोन मित्र आणि विचित्र अट; अमरावती सेक्स स्कँडलचा पर्दाफाश, एकाच ठिकाणी व्हिडिओ शूटचा धक्कादायक प्रकार समोर
2

एक फ्लॅट, दोन मित्र आणि विचित्र अट; अमरावती सेक्स स्कँडलचा पर्दाफाश, एकाच ठिकाणी व्हिडिओ शूटचा धक्कादायक प्रकार समोर

Solapur Crime: करमाळ्यात धक्कादायक प्रकार! दारूच्या त्रासाला कंटाळून बहिणीनेच भावाचा गळा आवळून खून
3

Solapur Crime: करमाळ्यात धक्कादायक प्रकार! दारूच्या त्रासाला कंटाळून बहिणीनेच भावाचा गळा आवळून खून

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! रील बनवण्याच्या नादात बसची धडक; चिमुकल्याचा मृत्यू, 25 जखमी
4

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! रील बनवण्याच्या नादात बसची धडक; चिमुकल्याचा मृत्यू, 25 जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.