मध्यप्रदेश: मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये एक भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. एका भरधाव वेगाने येणाऱ्या बसने दुर्गा मताच्या मंडपाला धडक दिली. या अपघातात २० हुन अधिक लोक जखमी झाले असून त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींचा उपचार रुग्णालयात सुरु आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरच्या सिहोरा भागात ही घटना घडली आहे.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची फसवणूक, तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा; आता पोलिसांनी…
नेमकं काय घडलं?
काल (मंगळवारी ता ३०) रात्री उशिरा, जबलपूरमधील सिहोरा येथे एका भरधाव वेगाने येणाऱ्या बसने दुर्गा पूजा मंडपात धडक दिली. अनियंत्रित बस मंडपात शिरताच गोंधळ उडाला आणि लोक गोंधळून पळू लागले. या अपघातात २० हुन अधिक लोक जखम झाले असून सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच, जिल्हाधिकारी राघवेंद्र सिंह आणि पोलीस अधीक्षक संपत उपाध्याय, भिसिहोरा पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले. गंभीर जखमींना उचारासाठी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे जिल्ह्याधिकारी आणि एसपी स्वतः जखमींवर उपचार करत आहेत. सध्या पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान, ही बस कटनीहून जबलपूरला जात असल्याचे वृत्त आहे.
प्रत्यक्षदर्शीने काय सांगितले?
प्रत्यक्षदर्शीच्या मते, बस चालक दारूच्या नशेत होता. याच कारणामुळे त्याचे वाहनावर नियंत्रण सुटले. अपघातानंतर संतप्त लोकांनी बसवर दगडफेक केली. अपघातात जखमी झालेल्या लोकांना त्वरित सिहोरा येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी रुग्णांना प्राथमिक उपचारानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस मेडिकल कॉलेज, जबलपूर येथे रेफर करण्यात आले.अपघातात ड्युटीवर असलेला एक कर्मचारीही जखमी झाला आहे. तसेच, एक जवळपास १२ वाहनांचे देखील नुकसान झाले आहे.
नवरात्रीत 8 वर्षांच्या चिमुकलीवर ‘काका’नेच केला बलात्कार, रक्ताचे डाग पाहून…
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे नवरात्रीसारख्या पवित्र सणादरम्यान माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. दुर्गा देवीची पूजा आणि मुलींचा सन्मान सुरू असताना, एका ८ वर्षांच्या निष्पाप मुलीवर तिच्याच काकाने लैंगिक अत्याचार केला. मुलगी दुर्गा मंडपात खेळत असताना काकाने तिला फसवून तिच्या घरी नेले आणि तिच्यावर घृणास्पद कृत्य केले. जर ती गप्प राहिली तर तिला जिवे मारण्याची धमकीही दिली. तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग दिसल्याने तिच्या आईला ही घटना कळली. झाशी रोड पोलिस ठाण्याने एफआयआर दाखल केला आहे आणि आरोपीला अटक केली आहे.
पोलीस दलात खळबळ ! कोल्हापूरच्या सहाय्यक फौजदारावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?