Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महापालिकेचा शिपाई शिवानंद पाटीलवर आणखी एक गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

पुणे महापालिकेत विविध पदावर नोकरी लावण्याचे आमिषाने फसवणूक प्रकरण समोर असतानाच पालिकेच्या शिक्षण विभागातील शिपाई शिवानंद बाळासाहेब पाटील याने आणखी एकाची तब्बल १५ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 13, 2026 | 03:13 PM
महापालिकेचा शिपाई शिवानंद पाटीलवर आणखी एक गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

महापालिकेचा शिपाई शिवानंद पाटीलवर आणखी एक गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे महापालिकेत विविध पदावर नोकरी लावण्याचे आमिषाने फसवणूक प्रकरण समोर असतानाच पालिकेच्या शिक्षण विभागातील शिपाई शिवानंद बाळासाहेब पाटील याने आणखी एकाची तब्बल १५ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. कनिष्ठ, वरिष्ठ अभियंता तसेच उपआयुक्त पदावर नोकरी लावण्याचे आमिषाने ही फसवणूक केली असून, त्यांना बनावट लेटरहेड देखील दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात शिवानंद बाळासाहेब पाटील याच्याविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत ३५ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. हा प्रकार डिसेंबर २०२३ ते १२ ऑगस्ट २०२६ पर्यंत सुरू होता.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार धायरी परिसरात राहण्यास आहेत. त्यांची आरोपी शिवानंद याच्यासोबत ओळख झाली होती. या ओळखीनंतर शिवानंद याने त्यांना आपण महापालिकेत क्रिडा अधीक्षक म्हणून नोकरीस असल्याची बतावणी केली. तर त्यांना मंत्रालयात चांगली ओळख असल्याचे सांगत पालिकेत कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ अभियंता अथवा उपआयुक्त या पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. नंतर त्यांच्याकडून वेळोवेळी रोख स्वरूपात त्यांच्याकडून १५ लाख रुपये घेतले. याबदल्यात त्यांना बनावट जॉईनिंग लेटर देऊन त्यांची फसवणूक केली.

तीनही पदांचे लेटर हेड

शिवानंद पाटील हा पालिकेत शिपाई आहे. त्यामुळे त्याचा मुक्त वावर होता. त्याने तक्रारदार यांना तीनही पदांचे बनावट नियुक्तीचे पत्र दिले. त्यावर स्वाक्षऱ्या, शिक्के देखील मारले होते. यासोबतच बदलीचे आदेश आणि बनावट ओळखपत्र देखील दिले गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा  : धनेगाव पेट्रोल पंपावरील खूनप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी सहाव्या फरार आरोपीला ठोकल्या बेड्या

यापुर्वी शिवानंदसोबतच इतरांवर गुन्हा

पुणे महानगर पालिकेतील विविध विभागात नोकरी मिळवून देण्याचे आमिषाने बनावट लेटरहेड, बनावट शिक्के, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या आणि बनावट नियुक्तीपत्रांच्या आधारे उमेदवारांची तब्बल ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी यापुर्वी शिवाजीनगर पोलिसांत जेजुरी देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र बबन खेडेकर यांच्यासह, महानगर पालिकेचा शिक्षण विभागातील शिपाई शिवानंद बाळासाहेब पाटील, नमिता गोवर्धन बसनोडे, तसेच त्यांच्या इतर साथीदारांवर गुन्हा दाखल आहे. हा सर्व प्रकार देखील मार्च २०२२ ते जुलै २०२६ या कालावधीत घडला आहे.

Web Title: A case has been registered against pune municipal corporation peon shivanand patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • crime news
  • pune news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

धनेगाव पेट्रोल पंपावरील खूनप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी सहाव्या फरार आरोपीला ठोकल्या बेड्या
1

धनेगाव पेट्रोल पंपावरील खूनप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी सहाव्या फरार आरोपीला ठोकल्या बेड्या

Pune News : धर्मांतराच्या आरोपप्रकरणी ब्रिटिश धर्मगुरू देवनूर यांना अटकपूर्व जामीन
2

Pune News : धर्मांतराच्या आरोपप्रकरणी ब्रिटिश धर्मगुरू देवनूर यांना अटकपूर्व जामीन

अटकेची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकाला गंडा; तब्बल 10.74 कोटींची ‘अशी’ झाली फसवणूक
3

अटकेची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकाला गंडा; तब्बल 10.74 कोटींची ‘अशी’ झाली फसवणूक

Jalgaon Crime : जामनेर ST डेपोमधून चोरट्यांनी पळवली नवीकोरी बस; वाटेत टायर पंचर अन् डाव फसला!
4

Jalgaon Crime : जामनेर ST डेपोमधून चोरट्यांनी पळवली नवीकोरी बस; वाटेत टायर पंचर अन् डाव फसला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.