Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अण्णासाहेब पाटील महामंडळाची फसवणूक, तब्बल दहा लाखांना घातला गंडा; सहा जणांवर गुन्हा दाखल

आर्थिकदृष्ट्या मागासांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देत त्यावरील व्याजाचा भार कमी करणाऱ्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेलाच बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 30, 2026 | 12:14 PM
अण्णासाहेब पाटील महामंडळाची फसवणूक, तब्बल दहा लाखांना घातला गंडा; सहा जणांवर गुन्हा दाखल

अण्णासाहेब पाटील महामंडळाची फसवणूक, तब्बल दहा लाखांना घातला गंडा; सहा जणांवर गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : आर्थिकदृष्ट्या मागासांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देत त्यावरील व्याजाचा भार कमी करणाऱ्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेलाच बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. महास्वयम पोर्टलवर खोटी माहिती व बनावट कागदपत्रे अपलोड करून १८ कर्जप्रकरणांतून १० लाख ६० हजार ५२९ रुपयांचा व्याज परतावा हडपण्यात आला आहे. हा प्रकार ११ सप्टेंबर २०२३ ते २६ जुलै २०२४ दरम्यान रेल्वे स्टेशन रोडवरिल मालजीपुऱ्यात घडला आहे.

गौरव शंकर मंचरे (रा. धोत्रे भोजडे ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर), वर्षा गौरव मंचरे, शंकर चांगदेव मंचरे (दोघे रा. साकुरी ता. राहता जि. अहिल्यानगर), करण राजेंद्र टेकाळे (रा. पासणी महाराज परिसर राहता, जि. अहिल्यानगर), रुख्मिणी जिजाबा कुसारे आणि योगेश दत्ताञय राहणे (रा. राहता जि. अहिल्यानगर) अशी फसवूणक करणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरोधात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्याज परतावा हडपला, सहा जणांवर गुन्हा

या प्रकरणात आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक समाधान मच्छींद्र सूर्यवंशी (वय ३०, रा. मनोली, बळेगाव ता. वैजापुर) यांनी ही फिर्याद दिली आहे. त्यानुसार, महामंडळाकडून मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास व्यक्तींना व्यवसायासाठी बँकेमार्फत कर्ज घेण्यास प्रोत्साहन दिले जाते. कर्जदाराने महास्वयम पोर्टलवर अर्ज केल्यानंतर पात्रतेनुसार पूर्वसंमती दिली जाते. कर्ज मंजूर झाल्यानंतर कर्ज मंजुरीपत्र, परतफेडीचे वेळापत्रक, कर्ज खात्याचे स्टेटमेंट, बचत खात्याचा धनादेश, उद्यम आधार प्रमाणपत्र, व्यवसायाचा पुराव आदी कागदपत्रे महास्वयमवर अपलोड करावी लागतात. कर्जाचे हप्ते भरल्यानंतर संबंधित बँक स्टेटमेंटच्या आधारे व्याज परताव्याचा दावा करता येतो. याच प्रक्रियेचा गैरफायदा घेत आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करून पोर्टलवर अपलोड केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा : सासवडला पुन्हा तीन मेडिकल दुकाने फोडली, पोलिसांना चोरट्यांचे आव्हान; कोम्बिंग ऑपरेशन सुरु

पोल्ट्री, दुग्ध व्यवसायाच्या नावाने कर्जे

महामंडळाच्या छाननीत कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसायाच्या नावाने दाखविण्यात आलेली १८ प्रकरणे संशयास्पद आढळली. सोमणाथ चव्हाण, किरण लासुरे, सतीश भरसाखळ, शिवाजीराव पवार, कचरू मुंजाळ, नयासिंग पवार, शेखर जामधाडे, सतीश तांबट, चरण जरवाल, विशाल पवार, करुणा शिंदे, जगदीश कुमावत, बालासाहेब खांडेकर, प्रसाद थानगे, पावळस वाघमारे, अनिता नाळे, वैभव मुसळे आणि सोमणाथ जिरे यांच्या नावाने ही प्रकरणे असल्याचे तक्रारीत नमूद आहे. नाशिकमधील सातपूर आणि अहिल्यानगरमधील तोफखाना भागात अशाच प्रकारे बनावट कागदपत्रांच्या आधारे व्याज परतावा घेतल्याचे प्रकार समोर आल्यानंतर इतर जिल्ह्यांतील प्रकरणांची छाननी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: A case has been registered against six individuals for defrauding the annasaheb patil corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 12:14 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Fraud Case

संबंधित बातम्या

दुष्काळात गरबा इव्हेंटवर कोट्यवधींची उधळपट्टी? शेलार, चव्हाणांचा राजीनामा घेणार का? काँग्रेसचा सवाल
1

दुष्काळात गरबा इव्हेंटवर कोट्यवधींची उधळपट्टी? शेलार, चव्हाणांचा राजीनामा घेणार का? काँग्रेसचा सवाल

भंगार चोरण्यासाठी निघाले अन् बंगल्यातील सोन्यावर मारला डल्ला! तळवडेतील चोरीप्रकरणी तिघांना अटक
2

भंगार चोरण्यासाठी निघाले अन् बंगल्यातील सोन्यावर मारला डल्ला! तळवडेतील चोरीप्रकरणी तिघांना अटक

हिंजवडीत एमडी ड्रग्जचा मोठा साठा जप्त; राजस्थानच्या तरुणासह दोघांना ठोकल्या बेड्या
3

हिंजवडीत एमडी ड्रग्जचा मोठा साठा जप्त; राजस्थानच्या तरुणासह दोघांना ठोकल्या बेड्या

किरकोळ वादातून रक्तरंजित थरार! २१ वर्षीय तरुणाचा खून; वाघोलीतील घटनेनं खळबळ
4

किरकोळ वादातून रक्तरंजित थरार! २१ वर्षीय तरुणाचा खून; वाघोलीतील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.