Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वडिलांकडून चारचाकी गाडी आण, नाहीतर…; पतीने केला पत्नीचा छळ

वडिलांकडून चारचाकी गाडीसाठी पाच लाख रुपये घेवून आली तरच शरीर संबंध ठेवणार, असे सांगत शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 15, 2024 | 06:10 PM
वडिलांकडून चारचाकी गाडी आण, नाहीतर…; पतीने केला पत्नीचा छळ
Follow Us
Follow Us:

सातारा : महिलेवर छळ होण्याच्या अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत आहेत. अशातचं आता सातारा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वडिलांकडून चारचाकी गाडीसाठी पाच लाख रुपये घेवून आली तरच शरीर संबंध ठेवणार, असे सांगत शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात पत्नी सरोज चेतन भोसले (वय ३०, रा. भवानी पेठ, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. पती चेतन नारायण भोसले (वय ३४), सासरे नारायण बापूराव भोसले, सासू रेखा नारायण भोसले (सर्व रा. गुरुवार पेठ, सातारा), नणंद शलाका रितेश जगदाळे, नंदावा रितेश चंद्रकांत जगदाळे (रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा), लग्न जमावणारे शिंदे काका (पूर्ण नाव माहिती नाही, रा. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादीत नमूद केले आहे की, दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ रोजी रामाचा गोट येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात हिंदू धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे पती चेतन याच्याशी लग्न केले. फिर्यादी व त्यांच्या आईवडिल, नातेवाईकांची जाणीवपूर्वक फसवणूक करत लग्नात सुमारे ८ लाख रुपये खर्च करण्यास भाग पाडले. सहायक पोलीस निरीक्षक केणेकर तपास करत आहेत.

धमकावून पैशांची मागणी

पती चेतन हा फिर्यादीला तू शरीर संबंध प्रस्तापित करण्यास शारीरिकदृष्ट्या अपात्र आहे, चारचाकी गाडी घेण्यासाठी आणखी पाच लाख रुपये वडिलांकडून आण, तरच शरीर संबंध ठेवेन, असे धमकावून पैशांची मागणी करत होता. क्रुरतेची वागणूक देत शारीरिक व मानसिक छळ करत होता, असे फिर्यादीत म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा : पंचगंगा नदीवरील जुन्या पुलाची दूरवस्था; धोकादायक वळणावर ट्रक पलटी

सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

महिलेवर छळ होण्याच्या अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत आहेत. दरम्यान गेल्या काही महिन्याखाली एका बेरोजगार तरुणाने व्यावसायिक असल्याची बतावणी करून सुशिक्षित तरुणीची व तिच्या कुटुंबीयांची फसवणूक केली. त्यानंतर या तरूणीशी लग्न केले. लग्नानंतर तो तिचा मानसिक व शारीरिक छळ करत होता. सासू-सासरेही माहेरून 50 हजार रुपये आणण्यासाठी सतत त्रास देत होते. लग्नाच्या 70 दिवसांतच पती व सासू-सासऱ्याकडून होत असलेल्या छळाला कंटाळून पीडितेने गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी पीडित रेशमी (वय 23) च्या तक्रारीवरून पती नीरज वाघमारे (वय 26), सासरा शिवराजसिंग वाघमारे (वय 60), सासू माधुरी वाघमारे (वय 55, रा. काटोल रोड) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: A case of husband torturing his wife has come to light from satara nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2024 | 06:10 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • Satara News
  • Satara Police

संबंधित बातम्या

FDA News: घाणेरडी फरशी, झुरळे-उंदीर अन् वापरलेले तेल! फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 आस्थापनांवर FDAची धडक कारवाई
1

FDA News: घाणेरडी फरशी, झुरळे-उंदीर अन् वापरलेले तेल! फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 आस्थापनांवर FDAची धडक कारवाई

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा जागतिक डंका! महाराष्ट्राच्या नावे ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’; फडणवीस-पंकजा मुंडेंनी घडवली गणेशमूर्ती
2

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा जागतिक डंका! महाराष्ट्राच्या नावे ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’; फडणवीस-पंकजा मुंडेंनी घडवली गणेशमूर्ती

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २६९ परवानाधारक सावकार! एकही तक्रार नाही; अवैध सावकारी नाही की तक्रारीच पोहोचत नाही?
3

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २६९ परवानाधारक सावकार! एकही तक्रार नाही; अवैध सावकारी नाही की तक्रारीच पोहोचत नाही?

Dharashiv News: भूमिपूजनाला 12 वर्षे उलटली, समाजमंदिराचा पत्ताच नाही! आता त्याच जागेवर RO प्लांट; धाराशिव पालिकेवर प्रश्नचिन्ह
4

Dharashiv News: भूमिपूजनाला 12 वर्षे उलटली, समाजमंदिराचा पत्ताच नाही! आता त्याच जागेवर RO प्लांट; धाराशिव पालिकेवर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.