
एमआयडीसी भोसरीत क्रेन चालकाची अरेरावी, शासकीय कामात अडथळा; धमकी देत हल्ल्याचा प्रयत्न
८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हिंदुस्तान प्रेसिंग प्रा. लि. कंपनीपासून सुमारे १०० मीटर अंतरावर, फिलिप्स चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर, टी ब्लॉक एमआयडीसी भोसरी येथे हा प्रकार घडला आहे. आरोपी आणि त्याच्यासोबतचे दोन अनोळखी व्यक्ती यांनी फिर्यादी यांच्या परवानगीशिवाय प्रवेश केला. यावेळी आरोपीने फिर्यादीशी अरेरावीची भाषा करत, “तू कोण मला सांगणारा? कोण आतमध्ये यायचं कोणी नाही. तू कोण ठरवणार?” असे म्हटले. तसेच “पोलिसांना बोलव, मिलिट्रीला बोलव व त्यांचे बापाला बोलव. मी येथून हलणार नाही. तुला पाहून घेतो, तू मला बाहेर भेट,” अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करून जोरजोरात आरडाओरड केली आणि त्यांच्या शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला.
हे सुद्धा वाचा : पुण्यात खळबळ! कोथरुडमध्ये महिलेची गळफास घेउन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर
गांजा ओढणाऱ्यांनी रेल्वे पोलिसाचा चाकूने गळा चिरला
रेल्वे पटरीवर सातत्याने गांजा ओढणाऱ्या तरुणांनी रागातून रेल्वे पोलिसाला (जीआरपीएफ) अडवून गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकाने गळ्यावर तसेच दुसऱ्याने छातीवरून चाकूने वार केले. नंतर तिसऱ्याने डोक्यात दगडही घातल्याचे समोर आले आहे. ही घटना उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावरच रात्री साडे आठच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, पसार झालेल्या आरोपींना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. तर दोन अल्पवयीन मुलांना पकडले आहे.