Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किरकोळ वादातून डोक्यावर कोयत्याने वार, महिलेच्या पोटात लाथ मारली अन्…; शिरुरमधील घटनेने खळबळ

शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील कोळपेवस्ती परिसरात भावकीतील किरकोळ वादातून भयानक हाणामारी झाली असून, यात एकाच कुटुंबातील अनेक सदस्य गंभीर जखमी झाले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 11, 2025 | 06:16 PM
किरकोळ वादातून डोक्यावर कोयत्याने वार, महिलेच्या पोटात लाथ मारली अन्...; शिरुरमधील घटनेने खळबळ

किरकोळ वादातून डोक्यावर कोयत्याने वार, महिलेच्या पोटात लाथ मारली अन्...; शिरुरमधील घटनेने खळबळ

Follow Us
Close
Follow Us:
  • किरकोळ वादातून भयानक हाणामारी
  • शिरुरमधील प्रकाराने खळबळ
  • एकाच कुटुंबातील अनेक सदस्य गंभीर जखमी
शिरुर : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील कोळपेवस्ती परिसरात भावकीतील किरकोळ वादातून भयानक हाणामारी झाली असून, यात एकाच कुटुंबातील अनेक सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. डोक्यावर कोयत्याने वार, लोखंडी रॉड, तलवारीसदृश हत्यारे आणि दगडांनी केलेल्या हल्ल्यात महिलांसह अनेक जणांना गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना बुधवारी (ता. ८ ऑक्टोबर) रोजी रात्री साडेआठच्या सुमारास गणेश लॉन्सजवळ घडली आहे.

याप्रकरणी १४ जणांसह ५ ते ६ अनोळखी व्यक्तींविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोळपेवस्ती येथील धनगर समाजाच्या वार्षिक देवकार्याच्या निमित्ताने मंदिरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम संपल्यानंतर, जेवणावरून दादा कोळपे आणि शहाजी कोळपे यांच्यात किरकोळ वाद झाला. रात्री घरी परतल्यानंतर तोच वाद विकोपाला गेला.

रात्री साडेआठच्या सुमारास दादा भैरू कोळपे, मनोज भैरू कोळपे, शहाजी कारभारी कोळपे, अनिल शहाजी कोळपे यांच्यासह १३-१४ जणांनी तात्या भाऊसो कोळपे यांच्या घरी येऊन, “तू आमच्याशी देवकार्याच्या कार्यक्रमात वाद का घातलास?” असे म्हणत दादा कोळपे यांनी त्यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केला. तात्या कोळपे यांना वाचविण्यास आलेले परसराम कोळपे यांना देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. आवाज ऐकून बाहेर आलेले गंगाराम कोळपे यांच्यावर तलवारीसदृश हत्याराने हल्ला करण्यात आला. शहाजी कोळपे यांनी धुळा कोळपे यांच्या हातावर लोखंडी रॉडने वार करून त्यांचा हात फ्रॅक्चर केला. महिलांनाही दगड व हातांनी मारहाण झाली.

हॉस्पिटलमध्येही पाठलाग व हल्ला

जखमींना तत्काळ वरदविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारासाठी जात असताना भिवा कोळपे यांच्यावर सोन्या उर्फ तुषार खैरे (रा. शिरसगाव काटा) याने पांढऱ्या कारमधून पाठलाग करत चाकूने हल्ला केला. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी थेट हॉस्पिटलमध्ये घुसून मनिषा कोळपे यांना पोटात लाथ मारून गंभीर दुखापत केली.

पुढील तपास सुरू

तात्या कोळपे यांनी शिरूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दादा भैरू कोळपे, मनोज भैरू कोळपे, भैरू कारभारी कोळपे, शहाजी कारभारी कोळपे, अनिल शहाजी कोळपे, बाबुराव विठ्ठल कोळपे, धुळा विठ्ठल कोळपे, सिद्धेश्वर शिवाजी कोळपे, शिवाजी कारभारी कोळपे, धुळा बाबू थोरात, भिवा बाबू थोरात, सोन्या उर्फ तुषार खैरे यांच्यासह दोन महिलांवर आणि ५ ते ६ अनोळखी व्यक्तीवर भारतीय दंड संहितेच्या विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी करत असून, परिसरात तणावाचे वातावरण आहे.

Web Title: A fight has broken out in shirur taluka over a minor dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2025 | 06:16 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Shirur Crime

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: अजित पवारांकडून पुणे, पिंपरी निसटणार? ‘डिझाईन बॉक्स’कंपनीवर छापेमारी
1

Maharashtra Politics: अजित पवारांकडून पुणे, पिंपरी निसटणार? ‘डिझाईन बॉक्स’कंपनीवर छापेमारी

धक्कादायक ! जावयाने गळा दाबून केली सासऱ्याची हत्या; मृतदेह लपवण्यासाठी थेट पुलाखालीच…
2

धक्कादायक ! जावयाने गळा दाबून केली सासऱ्याची हत्या; मृतदेह लपवण्यासाठी थेट पुलाखालीच…

Konkan Railway: कोकण रेल्वेत तिकीट तपासणी मोहीम तीव्र; ४३,८९६ फुकटे प्रवासी कचाट्यात
3

Konkan Railway: कोकण रेल्वेत तिकीट तपासणी मोहीम तीव्र; ४३,८९६ फुकटे प्रवासी कचाट्यात

सिग्नलवर गाडी थांबणंच बेतलं जीवावर; ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, महिलेचा जागीच मृत्यू
4

सिग्नलवर गाडी थांबणंच बेतलं जीवावर; ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, महिलेचा जागीच मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.