Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाण्यात अवैध ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’ साठ्यावर धाड; 1.20 कोटींचा मुद्देमाल जप्त

अंबरनाथ तालुक्यात उसाटणे परिसरात अवैधरित्या साठवून ठेवलेल्या ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’च्या मोठ्या साठ्यावर राज्य दक्षता पथकाने रविवारी धडक कारवाई करत सुमारे एक कोटी २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 14, 2026 | 05:55 PM
ठाण्यात अवैध ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’ साठ्यावर धाड; 1.20 कोटींचा मुद्देमाल जप्त

ठाण्यात अवैध ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’ साठ्यावर धाड; 1.20 कोटींचा मुद्देमाल जप्त

Follow Us
Follow Us:

ठाणे : अंबरनाथ तालुक्यात उसाटणे परिसरात अवैधरित्या साठवून ठेवलेल्या ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’च्या मोठ्या साठ्यावर राज्य दक्षता पथकाने रविवारी धडक कारवाई करत सुमारे एक कोटी २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात संबंधित आरोपींविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, अवैध इंधन साठवणूक आणि काळाबाजाराविरोधातील ही महत्त्वपूर्ण कारवाई मानली जात आहे.

 

नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे (भा.प्र.से.) यांना मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीच्या आधारे राज्य दक्षता पथकाने अंबरनाथ येथील उसाटणे भागातील न्यूओ लॉजिस्टिक पार्क परिसरात, राज्यस्तरीय प्लॉट क्रमांक २० समोर छापा टाकला. कारवाईदरम्यान टँकरचे सील तोडून ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’ची बेकायदेशीर साठवणूक व देवाणघेवाण सुरू असल्याचे उघडकीस आले. दोन व्यक्ती या प्रकारात प्रत्यक्ष सहभागी असल्याचे आढळून आले

पथकाने घटनास्थळी तपासणी केली असता GJ-12 BY-7560 क्रमांकाचा टँकर पूर्णपणे भरलेला आढळला. या टँकरमध्ये सुमारे २९ हजार ७०० किलो मिक्स हायड्रोकार्बन ऑईल असल्याचे निदर्शनास आले. तसेच MH-43 E-190 क्रमांकाचा आणखी एक टँकर घटनास्थळी उभा असून त्यामध्ये इलेक्ट्रिक मोटारीच्या सहाय्याने इंधन साठवण्याचे काम सुरू असल्याचे आढळले. याशिवाय MH-46 C-1282 क्रमांकाच्या टेम्पोमध्ये २०० लिटर क्षमतेच्या प्लास्टिक बॅरलमध्ये तेलाची बेकायदेशीर साठवणूक सुरू होती. या वाहनात २२० लिटर क्षमतेचे २० रिकामे प्लास्टिक बॅरल्स देखील आढळून आले.

घटनास्थळी जमिनीवर आणखी ८० रिकामे बॅरल्स, एक इलेक्ट्रिक मोटार आणि एक एअर ऑपरेटेड डायाफ्राम (AOD) पंप जप्त करण्यात आला. या सर्व साहित्य, वाहने आणि इंधनासह एकूण सुमारे एक कोटी २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधितांकडे आवश्यक परवाने किंवा वैध कागदपत्रे नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच अवैध इंधन साठवणूक, वाहतूक आणि काळाबाजाराशी संबंधित इतर बाबींचाही तपास केला जाणार आहे. ही कारवाई नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य दक्षता पथकाचे सहायक नियंत्रक शिधावाटप प्रदीप काळे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी योगेश जंगले, मुख्य निरीक्षण अधिकारी नागनाथ हंगरगे तसेच शिधावाटप निरीक्षक रामराजे भोसले, चंद्रकांत कांबळे, विकास नागदिवे, रवींद्र राठोड, राजेश सोरते, देवानंद थोरवे, पवन कुंभले, राहुल इंगळे आणि अरुण काते यांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

हे सुद्धा वाचा : भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडले, तिघांचा मृत्यू; संभाजीनगर- गंगापूर रोडवरील धक्कादायक घटना

दरम्यान, इंधनाच्या अवैध साठवणुकीमुळे महसूल नुकसान होण्याबरोबरच सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या बेकायदेशीर साठवणूक, वाहतूक आणि काळाबाजाराविरोधातील मोहिमा आगामी काळात आणखी तीव्र करण्यात येतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

 

Web Title: A major operation was carried out in thane by raiding a stockpile of illegal mixed hydrocarbon oil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 05:54 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • thane

संबंधित बातम्या

Tukaram Mundhe: ‘लोक खातात म्हणून गुटखा विकतात’; तुकाराम मुंढेंच्या ‘मकोका’ कारवाईवर मंत्र्यांचं अजब विधान
1

Tukaram Mundhe: ‘लोक खातात म्हणून गुटखा विकतात’; तुकाराम मुंढेंच्या ‘मकोका’ कारवाईवर मंत्र्यांचं अजब विधान

Crime News : जुन्या वादातून शेतकऱ्याला मारहाण, दगडाने नाकावर वार; तिघांवर गुन्हा दाखल
2

Crime News : जुन्या वादातून शेतकऱ्याला मारहाण, दगडाने नाकावर वार; तिघांवर गुन्हा दाखल

Gurbhej Singh : लंडनमध्ये 26 वर्षीय भारतीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या; पोलिसांनी 7 जणांना केली अटक
3

Gurbhej Singh : लंडनमध्ये 26 वर्षीय भारतीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या; पोलिसांनी 7 जणांना केली अटक

‘तो मला चुकीचा स्पर्श करतो’, सक्षमचे घर सोडल्यानंतर आंचल मामीडवारने केले गंभीर आरोप; सासूचंही सत्य केलं उघड
4

‘तो मला चुकीचा स्पर्श करतो’, सक्षमचे घर सोडल्यानंतर आंचल मामीडवारने केले गंभीर आरोप; सासूचंही सत्य केलं उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.