
'तो मला चुकीचा स्पर्श करतो', सक्षमचे घर सोडल्यानंतर आंचल मामीडवारने केले गंभीर आरोप; सासूचंही सत्य केलं उघड
आंचलने केले धक्कादायक आरोप
घर सोडून आल्यानंतर आंचलने यामागचे कारण स्पष्ट केले. तिने सांगितलं की, सक्षमचा लहान भाऊ तिच्यासोबत गैरवर्तन करतो. चुकीचा स्पर्श, आयोग्य वर्तन या सर्वांना कंटाळून तिने घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले. सक्षमचे घर सोडल्यानंतर आंचल आपल्या आजीकडे रहायला गेल्याचे तिने स्पष्ट केले. सक्षमच्या आईने म्हटले की, आंचल त्यांना आजीची तब्बेत खराब झाल्याचे सांगत काही दिवस रहायले गेली ती परत घरी आलीच नाही.
पोलिसांना दिला होती कल्पना
आंचलच्या म्हणण्यानुसार, सक्षमचा भाऊ तिच्यासोबत गैरवर्तन करत असल्याची बाब तिने कुटुंबासमोर याआधीच मांडली होती. पण सक्षमच्या कुटुंबाने तिच्यावर विश्वास ठेवला नाही. पुढे काही माझ्यासोबत चुकीचे घडले तरी कुटुंब माझ्यावर विश्वास ठेवणार नाही आणि म्हणूनच मी घर सोडण्याचा निर्णय घेतला अशी प्रतिक्रिया आंचलने दिली. इतकंच नाही तर घर सोडण्याआधी तिने पोलिसांनाही याची माहिती दिली. पोलिसांनी स्वतः तिला तिच्या घरी सोडल्याचे आंचलने स्पष्ट केले आहे.
सक्षमच्या आईचे आरोप फेटाळले
प्रसारमाध्यमांशी बोलताना आंचलने सांगितले की, “सक्षमची आई मला सोडायला आली नाही. पोलिस कर्मचाऱ्यांनी मला घरी सोडले. त्यांनी मला माझ्या आजीच्या हवाली केलं. सक्षमच्या आईने म्हणणं आहे की, मी माझ्या काकांच्या दबावात येऊन पुन्हा घरी परतले पण तस काही नाहीये. मी सज्ञान आहे. मी स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ शकते. मला तिकडे त्रास होत असल्याने मी घरी निघून आले” असा आरोप आंचलने सक्षमच्या कुटुंबावर लावला आहे.
तुम्हीही बाहेर जाताना घराची चावी अशाप्रकारे ठेवताय? तर थांबा; ‘इथं’ झाली मोठी चोरी
नक्की काय घडलं होत?
प्रियकर सक्षमच्या हत्येनंतर आंचलने आरोपी असलेल्या आपल्या भाऊ आणि वडिलांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. तसेच, आयुष्यभर सक्षमची पत्नी म्हणून राहणार असल्याचे सांगत तिने त्याच्या नावाचे कुंकूही लावले होते. या भूमिकेमुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय ठरले होते. मात्र, मार्च महिन्यात आंचलने सक्षमचे घर सोडल्याने पुन्हा एकदा या प्रकरणाची चर्चा रंगू लागली. त्यानंतर सक्षमच्या आईने एका मुलाखतीत आंचलबाबत अनेक दावे केले. आता त्या दाव्यांना उत्तर देत आंचलनेही आपली बाजू मांडली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या या मालिकेमुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.