Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंदेकर हत्येप्रकरणाची पुनरावृत्ती? सख्ख्या भावानेच संपत्तीसाठी भावाला संपवलं; आधी धमकी दिली अन् नंतर…

अमीन आणि आसिफ हे सख्खे भाऊ आहेत. दोघेही जयहिंदनगरातील जुन्या घरी कुटुंबासह राहत होते. तळमाळ्यावर दोन दुकानेही होती, जी भाड्याने दिली होती. 2009 पासून दोन्ही भावांमध्ये संपत्तीवरून वाद सुरू होता. अनेकदा त्यांचा वाद मानकापूर पोलिस ठाण्यातही पोहोचला होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 10, 2024 | 03:11 PM
अनैतिक संबंधातून एकाची हत्या; महिलेने रात्री फोन करून बोलावून घेतलं अन् नंतर...

अनैतिक संबंधातून एकाची हत्या; महिलेने रात्री फोन करून बोलावून घेतलं अन् नंतर...

Follow Us
Follow Us:

नागपूर : पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही हत्या त्यांच्या सख्ख्या बहिणींनी घडवून आणल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. त्यानंतर आता नागपुरातही मेहुण्यांसोबत मिळून सख्ख्या भावाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही हत्या संपत्तीसाठी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एच. जाधव यांनी चार आरोपींना दोषी ठरवून आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

हेदेखील वाचा : खळबळजनक ! बापानेच केला पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पोटात दुखतंय म्हणाली अन्…

न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या दोषींमध्ये आसिफ अली सय्यद अली (वय 40, रा. जयहिंदनगर, मानकापूर), जावेद खान हबीब खान (वय 35, रा. शम्स कॉलनी, मोर्शी), तमीज खान हफीज खान (वय 25) आणि सादिक खान आबिद खान (वय 26) अशी दोषींची नावे आहेत. त्यांच्यावर जयहिंदनगर निवासी अमीन अली सय्यद अली (वय 41) च्या खुनाचा आरोप होता. पोलिसांनी 10 ऑगस्ट 2020 रोजी अमीनची पत्नी आलियाच्या तक्रारीवरून खून आणि गुन्हेगारी कट रचण्यासह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला होता.

अमीन आणि आसिफ हे दोघे सख्खे भाऊ

अमीन आणि आसिफ हे सख्खे भाऊ आहेत. दोघेही जयहिंदनगरातील जुन्या घरी कुटुंबासह राहत होते. तळमाळ्यावर दोन दुकानेही होती, जी भाड्याने दिली होती. 2009 पासून दोन्ही भावांमध्ये संपत्तीवरून वाद सुरू होता. अनेकदा त्यांचा वाद मानकापूर पोलिस ठाण्यातही पोहोचला होता. घटनेच्या 9 दिवसांपूर्वी आसिफ कुटुंबासह मोर्शी येथे सासरी गेला होता. 10 ऑगस्टच्या सकाळी आसिफने भाडेकरू दुकानदार आमिर अलीला फोन करून सांगितले होते की, तो आज अमीनचा कायमचा काटा काढणार आहे. आमिरने आलियाला याबाबत सांगितले.

आलियाने अमीनला सावध राहण्यास सांगितले होते. रात्री 9.30 वाजताच्या सुमारास अमीन आणि आमिर घराजवळील दुकानासमोर उभे होते. या दरम्यान आसिफ आणि त्याचे साळे जावेद, तमील व सादिक चारचाकी वाहनाने तेथे आले. चौघांनीही लोखंडी रॉड आणि चाकूने हल्ला केला.

अमीन जीव वाचवण्यासाठी पळाला पण…

अमीन जीव वाचविण्यासाठी तेथून पळाला. मात्र, आरोपींनी त्याला पकडून मारहाण सुरू केली. आमिरने त्याच्या घरी जाऊन आलियाला घटनेची माहिती दिली. तोपर्यंत आरोपींनी रॉड आणि चाकूने सपासप वार करून अमीनचा खून केला होता. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये आरोपी स्पष्ट दिसत होते.

हेदेखील वाचा : ‘तेव्हा मी थरथर कापते…,’ कोलकाता अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या आई-वडिलांनी पोलिसांवर केले गंभीर आरोप

Web Title: A man assassinated of brother due to property issue nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2024 | 03:09 PM

Topics:  

  • crime news
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Milk Adulteration Case : दूध भेसळ प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार; आठ दिवसांपासून पोलिसांकडून शोध सुरु
1

Milk Adulteration Case : दूध भेसळ प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार; आठ दिवसांपासून पोलिसांकडून शोध सुरु

धक्कादायक ! 9 मुलांच्या आईने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; आधी वाद झाला अन् नंतर…
2

धक्कादायक ! 9 मुलांच्या आईने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; आधी वाद झाला अन् नंतर…

एका चोरीतून वाहनचोरांच्या टोळ्यांचा पर्दाफाश, तब्बल 11 आरोपींना ठोकल्या बेड्या; 33 दुचाकी जप्त
3

एका चोरीतून वाहनचोरांच्या टोळ्यांचा पर्दाफाश, तब्बल 11 आरोपींना ठोकल्या बेड्या; 33 दुचाकी जप्त

Uttar Pradesh Crime : पत्नीला परत मिळवायचं असेल तर आईला मारुन टाक… सासूच्या अटीवर मुलाने आईला दिले विष
4

Uttar Pradesh Crime : पत्नीला परत मिळवायचं असेल तर आईला मारुन टाक… सासूच्या अटीवर मुलाने आईला दिले विष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.