Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन चिमुकल्यांसह विवाहितेची आत्महत्या, धक्कादायक कारणही आलं समोर; चौघांना अटक

देवळा तालुक्यातील वाखारी येथे बुधवारी (दि. २२) सायंकाळी एका तरुण विवाहित महिलेने दोन लहान मुलींसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत विवाहितेच्या पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 24, 2026 | 12:53 PM
दोन चिमुकल्यांसह विवाहितेची आत्महत्या, धक्कादायक कारणही आलं समोर; चौघांना अटक

दोन चिमुकल्यांसह विवाहितेची आत्महत्या, धक्कादायक कारणही आलं समोर; चौघांना अटक

Follow Us
Follow Us:

देवळा : राज्यासह देशभरात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, अशातच आता देवळा तालुक्यातील वाखारी येथे बुधवारी (दि. २२) सायंकाळी एका तरुण विवाहित महिलेने दोन लहान मुलींसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत विवाहितेच्या पतीसह पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार जणांना देवळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास वाखारी (ता. देवळा) येथे मनीषा जयेश वाघ (वय ३०) या विवाहित महिलेने आपल्या दोन मुली सिद्धी जयेश वाघ (वय ७), खुशी जयेश वाघ (वय ३) यांच्यासह घराजवळील शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच देवळा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य सुरू केले. रात्री उशिराने तिघांचे मृतदेह मिळून आल्यावर शवविच्छेदनासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तिच्या व दोन्ही मुलींच्या मृत्यूस सासरकडील मंडळी जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी विवाहितेचा पती, सासू, सासरे, दीर आणि नणंदेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर सायंकाळी वाखारी येथील स्मशानभूमीत तिघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदा पाटील ह्या करत आहेत.

हे सुद्धा वाचा : बांधकाम व्यावसायिकाच्या आत्महत्येप्रकरपणी मोठी अपडेट; रवींद्र धंगेकर अन् त्यांच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर

सासरच्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

दोन मुली झाल्याने व माहेरून पैसे आणण्यासाठी छळ करून मयत मनीषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भास्कर जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती जयेश वाघ, सासरा रमेश वाघ, सासू सुनंदा वाघ, दीर विकी वाघ आणि नणंद सविता बच्छाव यांच्याविरुद्ध चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, पतीसह चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हे सुद्धा वाचा : सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या ठरावावरून मालखेड सोसायटीत राडा; चेअरमनला मारहाणीनंतर सदस्यावर कोयत्याने वार

Web Title: A married woman has committed suicide along with her two young daughters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 12:53 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Sucide

संबंधित बातम्या

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले
1

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
2

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…
3

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…

दहीहंडीतील ‘डीजे’च्या दणदणाटावर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका; तब्बल 16 गुन्हे दाखल, डीजे साहित्यही जप्त
4

दहीहंडीतील ‘डीजे’च्या दणदणाटावर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका; तब्बल 16 गुन्हे दाखल, डीजे साहित्यही जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.