Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर खचलेल्या वडिलांचा गळफास घेऊन मृत्यू; लोणी काळभोरमधील घटना

एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर मानसिकदृष्ट्या खचलेल्या वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज (२९ ऑगस्ट) सकाळी लोणी काळभोर परिसरात घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 29, 2026 | 05:52 PM
मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर खचलेल्या वडिलांचा गळफास घेऊन मृत्यू; लोणी काळभोरमधील घटना

मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर खचलेल्या वडिलांचा गळफास घेऊन मृत्यू; लोणी काळभोरमधील घटना

Follow Us
Follow Us:
  • मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर वडील खचले
  • गळफास घेऊन संपवले जीवन
  • लोणी काळभोरमधील धक्कादायक घटना
लोणी काळभोर : राज्यासह देशभरात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वेगवेगळ्या कारणावरुन अनेकजण टोकाचं पाऊल उचलत आहेत. अशातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर मानसिकदृष्ट्या खचलेल्या वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज (२९ ऑगस्ट) सकाळी लोणी काळभोर परिसरात घडली आहे. गुरुषणतप्प सिद्धांप्पा मठ (वय ४७) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुषणतप्पा मठ यांचा मुलगा सोमेश्वर मठ याचा सुमारे दोन वर्षांपूर्वी अपघात झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. मुलाच्या मृत्यूचा धक्का तसेच स्वतः अपंगत्वामुळे गुरुषणतप्पा मठ मानसिकदृष्ट्या खचले होते, अशी माहिती समोर आली आहे. आज सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या ड्राय क्लिनिंगच्या दुकानातील आराम खोलीत गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच त्यांचा मुलगा आकाश मठ यांनी त्यांना तातडीने लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मृतदेह शवविच्छेदनासाठी उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भापकर आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक देवकर करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : पत्नीच्या प्रियकराला चाकूने भोसकून संपवलं; पुणे-सातारा महामार्गावरील सारोळे गावातील थरार

भाजप नगरसेविकेच्या नणंदेची आत्महत्या

माहेरहून पैसे आणण्यासाठी तसेच वडीलोपार्जित मालमत्तेत हिस्सा मिळवण्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका ४२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना वाकड गुरुवारी (२७ ऑगस्ट) मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास ईशान सोसायटी येथील प्रथम बंगल्यात उघडकीस आली आहे. मयत विवाहिता वाकड येथील भाजपा नगरसेविकेच्या नणंद होत्या. शिल्पा सचिन गवारे (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मृत महिलेचे भाऊ संतोष गुलाब कलाटे (वय ४७, रा. दत्तमंदिर रोड, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती सचिन उत्तम गवारे, सासरा उत्तम शिवराम गवारे, सासू संजीवनी उत्तम गवारे आणि दीर संदीप उत्तम गवारे (सर्व रा. ईशान सोसायटी, वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A person has committed suicide by hanging in the loni kalbhor area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 05:52 PM

Topics:  

  • Loni Kalbhor Police
  • pune news
  • Sucide News

संबंधित बातम्या

Sports: ४० लाख डॉलरचे घसघशीत बक्षीस! भारतात रंगणार आंतरराष्ट्रीय गोल्फपटूंचा थरार
1

Sports: ४० लाख डॉलरचे घसघशीत बक्षीस! भारतात रंगणार आंतरराष्ट्रीय गोल्फपटूंचा थरार

Mhada Pune ने दिला दिलासा! अर्जाची मुदत वाढली, ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज
2

Mhada Pune ने दिला दिलासा! अर्जाची मुदत वाढली, ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई
3

बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई

पुण्यात महाविकास आघाडीचा प्रचार मेळावा; दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा शरद पवारांना विश्वास
4

पुण्यात महाविकास आघाडीचा प्रचार मेळावा; दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा शरद पवारांना विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.