
औंधमध्ये १८ वर्षीय तरुणावर लोखंडी हत्याराने हल्ला, लाथाबुक्क्यांनीही मारहाण; नेमकं काय घडलं?
याप्रकरणी प्रज्वल ओम कांबळे (वय १९, रा. पीएमसी बिल्डिंग, नागरस रोड, औंध) आणि गुरुराज देविदास फंड (वय २२, रा. पीएमसी बिल्डिंग, मेडीपॉइंटसमोर, डी. पी. रोड, औंध) यांच्यावर चतुःशृंगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सिद्धेश राजू गायकवाड (वय १८, रा. पीएमसी बिल्डिंग, डी. पी. रोड, औंध) यांनी तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीनंतर एक वाजून पाच मिनिटांनी अमेय अपार्टमेंटजवळ ही घटना घडली आहे. गायकवाड यांना काही समजण्यापूर्वीच कांबळे याने त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस लोखंडी हत्याराने मारले. फंड याने त्यांना पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ केली. पोलिस उपनिरीक्षक दबडे तपास करीत आहेत.
जेवणासाठी आलेल्या पाच जणांना मारहाण
कॅम्पमधील न्यूक्लस मॉल चौपाटी येथे जेवणासाठी आलेल्या पाच जणांना दगड आणि लोखंडी हत्याराने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अभिषेक सुनील अवघडे (वय २७), अमित सुनील अवघडे (वय ३०) आणि रोहन महादेव सोनावणे (वय ३७, सर्व रा. घोरपडी गाव) यांच्यावर बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विशाल सुभाष बाथम (वय ३८, रा. घर क्रमांक २१, घोरपडी बाजार) यांनी तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,१६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीनंतर एक वाजून पाच मिनिटांनी ही घटना घडली आहे. बाथम मित्रांसोबत जेवणासाठी आले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्यासह निखिल परदेशी, अविनाश परदेशी, राज बाथम आणि नितीन बाथम यांना मारहाण केली. हाताने, दगडाने व लोखंडी हत्याराने मारल्यामुळे ते जखमी झाले. विनाकारण हल्ला करून धमकाविल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.
Ans: औंधमधील डी. पी. रोडवर अमेय अपार्टमेंटजवळ.
Ans: सिद्धेश राजू गायकवाड (वय १८).
Ans: दोघांविरुद्ध चतुःशृंगी पोलिसांत गुन्हा दाखल झाला.