Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दामिनी पालव हत्या प्रकरणाचा ५ तासांत छडा; एकतर्फी प्रेम, १८ वार अन् आरोपीच्या घरापर्यंत पोहोचले पोलीस!

दामिनी पालवची हत्या करून आरोपी नेमका कुठे गेला? घटनास्थळापासून दिसलेली मोटारसायकल, डिगसच्या दुकानातील सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाने पोलिसांना दिला महत्त्वाचा धागा. अवघ्या पाच तासांत पथक आरोपीच्या घरापर्यंत पोहोचले. एकतर्फी प्रेमाचा संशय, १८ वार आणि मोबाईलमधील पुरावे आता तपासाच्या केंद्रस्थानी आहेत.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 19, 2026 | 11:19 AM
दामिनी पालव हत्या प्रकरणाचा ५ तासांत छडा; एकतर्फी प्रेम, १८ वार अन् आरोपीच्या घरापर्यंत पोहोचले पोलीस!

दामिनी पालव हत्या प्रकरणाचा ५ तासांत छडा; एकतर्फी प्रेम, १८ वार अन् आरोपीच्या घरापर्यंत पोहोचले पोलीस!

Follow Us
Follow Us:
  • १८ वार करून दामिनीची हत्या
  • सीसीटीव्हीने ५ तासांत छडा
  • आरोपीला २४ ऑक्टोबरपर्यंत कोठडी
 सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील वर्दे-खालची पालववाडी येथील २३ वर्षीय दामिनी किरण पालव हिच्या निर्घृण हत्या प्रकरणाने सिंधुदुर्ग जिल्हा हादरला आहे. या प्रकरणातील संशयित साहिल विश्राम धुरी (वय २२) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वेंगुर्ले तालुक्यातील मठ येथील घरातून ताब्यात घेतले. प्राथमिक तपासानुसार, एकतर्फी प्रेमातून दामिनीवर चाकूसदृश हत्याराने १७ ते १८ वार करण्यात आले.

काय घडलं दामिनीसोबत?

दामिनी हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होती. शनिवारी सायंकाळी ती एसटी बसने कडावल येथे उतरून वर्दे येथील घरी पायी जात होती. याचदरम्यान कडावल-वर्दे रस्त्याजवळील ‘सायल्याचा व्हाळ’ परिसरात तिच्यावर हल्ला झाला. घटनास्थळी तिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला.

इन्स्टाग्रामवरील ओळख अन् एकतर्फी प्रेमाचा संशय

प्राथमिक तपासानुसार, दामिनी आणि साहिल यांची इन्स्टाग्रामवर सुमारे दोन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. साहिलने तिला प्रेमाची मागणी घातली होती; मात्र तिने नकार दिल्याने तो नाराज होता, अशी माहिती समोर आली आहे. या रागातूनच त्याने हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा: अवघ्या 3 महिन्यांचा संसार, देवीदर्शनाहून परतताना काळाचा घाला! नवविवाहित लोकेशचा दुर्दैवी अंत

सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीपर्यंत पोहोचले पोलीस

घटनेनंतर एका प्रत्यक्षदर्शीने मोटारसायकलवरून जात असलेल्या तरुणाची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी डिगस येथील दुकानातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला. मोटारसायकलच्या क्रमांकावरून संशयिताचा माग काढत पथक मठ येथे पोहोचले आणि त्याला ताब्यात घेतले.

२४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

कुडाळ पोलिसांनी संशयिताला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. हत्येत वापरलेले हत्यार, गुन्ह्यामागील नेमके कारण आणि या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. दोघांचेही मोबाईल पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे.

महत्त्वाची नोंद: प्रकरणाचा तपास सुरू असून, एकतर्फी प्रेम हे हत्येमागील कारण असल्याची माहिती प्राथमिक तपासावर आधारित आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या प्रकरणाचा छडा कसा लागला?

    Ans: प्रत्यक्षदर्शीने दिलेली माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा माग काढला.

  • Que: संशयिताला किती दिवसांची पोलीस कोठडी मिळाली?

    Ans: न्यायालयाने त्याला २४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

  • Que: हत्येमागील कारण काय असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले?

    Ans: एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याचा प्राथमिक तपासातील संशय आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Damini palav murder case sindhudurg sahil dhuri arrest sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 11:19 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Sindhudurg District

संबंधित बातम्या

Baramati News: उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला; बारामती एमआयडीसीतील विमानतळवर नेमक काय घडलं?
1

Baramati News: उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला; बारामती एमआयडीसीतील विमानतळवर नेमक काय घडलं?

दुसऱ्या लग्नाचा राग अन् टोकाचा डाव! जावयाच्या दुसऱ्या पत्नीची हत्या करून मृतदेह खाडीत फेकला
2

दुसऱ्या लग्नाचा राग अन् टोकाचा डाव! जावयाच्या दुसऱ्या पत्नीची हत्या करून मृतदेह खाडीत फेकला

Maharashtra Live Breaking News in Marathi: गोकुळ दूध संघ निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू
3

Maharashtra Live Breaking News in Marathi: गोकुळ दूध संघ निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू

गणेश भक्तांना लुटणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला बेड्या; फरासखाना पोलिसांची उत्तर प्रदेशात मोठी कारवाई
4

गणेश भक्तांना लुटणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला बेड्या; फरासखाना पोलिसांची उत्तर प्रदेशात मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.