Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Paithan Accident : पैठण तालुक्यात भीषण अपघात; पिकअपच्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू

पैठण तालुक्यातील विहामांडवा-चौंडाळा मार्गावरील सहकारी साखर रेणुकादेवी-शरद कारखान्यासमोर रविवारी (२१ जून) रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पारधी कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 22, 2026 | 01:51 PM
दुर्दैवी ! महाराष्ट्राच्या दोन वकिलांचा लडाखमध्ये अपघाती मृत्यू; सैन्याच्या वाहनाला दुचाकीची धडक

दुर्दैवी ! महाराष्ट्राच्या दोन वकिलांचा लडाखमध्ये अपघाती मृत्यू; सैन्याच्या वाहनाला दुचाकीची धडक

Follow Us
Follow Us:

पैठण : राज्यासह देशभरात अपघाताच्या घटना वाढल्या असून, दररोज अपघातामध्ये नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशातच आता पैठण तालुक्यातील विहामांडवा-चौंडाळा मार्गावरील सहकारी साखर रेणुकादेवी-शरद कारखान्यासमोर रविवारी (२१ जून) रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पारधी कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

 

साखर रेणुकादेवी-शरद सहकारी कारखान्याच्या मागील बाजूस वास्तव्यास असलेल्या पारधी कुटुंबातील पाच जण दोन मोटारसायकलींवरून प्रवास करत होते. यावेळी समोरून येणाऱ्या पिकअप (क्र. एमएच १७. के. ९०७७) लोडिंग वाहनाची मोटारसायकलशी समोरासमोर जोरदार धडक झाली. भरधाव पिकअपने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील सिद्धार्थ भैय्या चव्हाण (वय ३०), पायल सिद्धार्थ चव्हाण (वय २७), आव्हान्या सिद्धार्थ चव्हाण (वय ५), संजना अभिषेक चव्हाण (वय २२) यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि पारधी समाजातील मोठ्या संख्येने लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच घटनास्थळी मोठी गर्दी जमल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक हरी बोबडे यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने पाचोड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताचे नेमके कारण आणि पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

पारधी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

रविवारी रात्रीच्या या भीषण अपघाताने पारधी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आनंदाने सुरू असलेला प्रवास काही क्षणांतच मृत्यूच्या दारात पोहोचला. चौघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.

हे सुद्धा वाचा : मध्यरात्री सराईत गुन्हेगार अन् पोलिसांत थरार, पोलिस अधिकाऱ्यावर चाकूने वार; नेमकं काय घडलं?

एकाच कुटुंबातील चौघे ठार

भरधाव पिकअपने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील सिद्धार्थ भैय्या चव्हाण (वय ३०), पायल सिद्धार्थ चव्हाण (वय २७), आव्हान्या सिद्धार्थ चव्हाण (वय ५), संजना अभिषेक चव्हाण (वय २२) यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.

हे सुद्धा वाचा : ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा दोन तासात लावला छडा; काळेपडळ पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Web Title: A shocking incident has occurred in paithan taluka where four people died in a horrific accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 01:51 PM

Topics:  

  • Accident Death
  • Accident News
  • Paithan

संबंधित बातम्या

Accident News: डोंगरावरून कार थेट रेल्वे रुळावर; पनवेल-उरण मार्गावरील अप-डाऊन रेल्वे वाहतूक ठप्प
1

Accident News: डोंगरावरून कार थेट रेल्वे रुळावर; पनवेल-उरण मार्गावरील अप-डाऊन रेल्वे वाहतूक ठप्प

Accident News: मोठी बातमी ! कॅबिनेट मंत्र्याचा मुलीसह कार अपघातात मृत्यू; कारला ट्रकची जोरदार धडक बसली अन्…
2

Accident News: मोठी बातमी ! कॅबिनेट मंत्र्याचा मुलीसह कार अपघातात मृत्यू; कारला ट्रकची जोरदार धडक बसली अन्…

Accident News : स्टेअरिंग जाम झाल्याने बस उलटून अपघात; 7 जण गंभीर जखमी तर 31 प्रवासी…
3

Accident News : स्टेअरिंग जाम झाल्याने बस उलटून अपघात; 7 जण गंभीर जखमी तर 31 प्रवासी…

Accident News: विरारमध्ये अज्ञात वाहनाची ६५ वर्षीय वृद्धाला जोरदार धडक; मृत्यू, अपघातानंतर चालक वाहनासह पसार
4

Accident News: विरारमध्ये अज्ञात वाहनाची ६५ वर्षीय वृद्धाला जोरदार धडक; मृत्यू, अपघातानंतर चालक वाहनासह पसार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.