Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दारु पिऊन येऊन मांसाहारी जेवण मागितल्याचा राग; मारहाण करून बापाने मुलाला संपवलं

दारूच्या आहारी गेलेला मुलगा दररोज वाद घालत असल्याच्या रागातून वडिलांनी मुलाचा गळा आवळून तसेच मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वारजे माळवाडी परिसरात ही घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 27, 2026 | 04:39 PM
धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; धारदार हत्याराने वार केले अन्...

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; धारदार हत्याराने वार केले अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : दारूच्या आहारी गेलेला मुलगा दररोज वाद घालत असल्याच्या रागातून वडिलांनी मुलाचा गळा आवळून तसेच मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वारजे माळवाडी परिसरात ही घटना घडली असून, याप्रकरणी वडिल तसेच आईला पोलिसांनी अटक केली आहे.  महेश भागवत गायकवाड (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भाऊ गणेश भागवत गायकवाड (वय ३४) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार भागवत सूर्यभान गायकवाड (वय ६४), पार्वती भागवत गायकवाड (वय ६०) आणि आणखी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडिल भागवत व आई पार्वती यांना अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, महेश याचा विवाह झालेला आहे. परंतु, त्याची पत्नी सोबत राहत नाही. त्याला दारूचे व्यसन आहे. तो मजुरी तसेच प्लबिंगचे काम करत होता. गायकवाड कुटूंब वारजेतील रामनगर येथे तिरंगा मित्र मंडळाजवळ राहण्यास आहे. भागवत यांना गणेश व महेश अशी दोन मुले व मुली आहेत. मोठा मुलगा आणि छोटा महेश असे, शेजारी शेजारी राहण्यास होते.

दरम्यान, महेश दररोज दारू पिल्यानंतर वडिलांशी तसेच आईशी वाद घालत असत. घटनेच्या दिवशी (दि. २४ ऑगस्ट) रात्री तो दारू पिऊन घरी आला. त्याने नॉनव्हेज खाण्यावरून वाद घालण्यास सुरूवात केली. श्रावण सुरू असल्याने वडिलांनी त्याला नॉनव्हेज नसल्याचे सांगितले. नंतर त्याने पैशांची मागणी केली. पण वडिलांनी त्याला पैसे देण्यासही नकार दिला.  त्यावेळी वडीलांशी वाद घालण्यास सुरूवात केली. दररोज त्यांच्यात वाद होत असत. त्यामुळे शेजारी राहणारा भाऊने याकडे दुर्लक्ष केले. परंतु, या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. भागवत यांनी महेशच्या डोक्यावर व तोंडावर मारहाण केली. तसेच, त्याचा गळा दाबला होता. दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी महेश त्याच्या खोलीतून बाहेर आला नाही. त्यामुळे भाऊ तसेच नातेवाईकांनी पाहिले, तेव्हा तो बेशुद्ध असल्याचे दिसून आले. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. वारजे माळवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व त्याला ससून रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

हे सुद्धा वाचा : कुख्यात गुंड इशप्पा उर्फ विशाल पंदीसह अकरा जणांवर मोक्का; विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मांचे आदेश

शवविच्छेदनात महेशचा गळा दाबून व डोक्यात झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. नंतर पोलिसांनी याचा तपास सुरू केला. भाऊ व नातेवाईकांकडे विचारपूस सुरू केली. वडिल व आईकडेही विचारणा करण्यात आली. पण, त्यांनी काहीच सांगितले नाही. मात्र, पोलिसी पद्धतीने तपास केल्यानंतर महेशचा खून वडिलांनी केल्याचे समोर आले. पोलिसांनी वडिलांना पकडले. तर मारहाणीत सांडलेले रक्त पुसून तसेच संबंधित घटना लपविल्याप्रकरणी आईला देखील अटक करण्यात आली आहे. वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बाळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Web Title: A shocking incident has occurred in pune where a father murdered his son

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

वाघोलीत तरुणावर टोळक्याचा हल्ला; मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्यासाठी बोलावले अन्…
1

वाघोलीत तरुणावर टोळक्याचा हल्ला; मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्यासाठी बोलावले अन्…

लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; २० जणांना अटक, ३६.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त
2

लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; २० जणांना अटक, ३६.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

गणेशोत्सवातील गर्दीत भक्तांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल २३ लाखांचा मुद्देमाल जप्त
3

गणेशोत्सवातील गर्दीत भक्तांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

जुन्नर तालुक्यात मध्यरात्री टोळक्याचा धुमाकूळ, वाहनांची तोडफोड; महिलेलाही मारहाण
4

जुन्नर तालुक्यात मध्यरात्री टोळक्याचा धुमाकूळ, वाहनांची तोडफोड; महिलेलाही मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.