Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : पुण्यात भाड्याच्या वादातून रिक्षाचालकावर हल्ला; डोक्यात दगड घातला अन्…

भाड्यावरुन वाद झाल्याने प्रवाशाने रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड घातल्याची घटना हडपसर भागात घडली आहे. या प्रकरणी प्रवाशाविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 20, 2026 | 06:08 PM
पुण्यात भाड्याच्या वादातून रिक्षाचालकावर हल्ला; डोक्यात दगड घातला अन्...

पुण्यात भाड्याच्या वादातून रिक्षाचालकावर हल्ला; डोक्यात दगड घातला अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाड्यावरुन वाद झाल्याने प्रवाशाने रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड घातल्याची घटना हडपसर भागात घडली आहे. या प्रकरणी प्रवाशाविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ईश्वर बरोडा पवार (वय ३७, रा. वैदुवाडी, हडपसर) असे जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. या प्रकरणी प्रवासी भागवत गुंडाप्पा वाले (वय २५, रा. केशव चौक, माळवाडी, हडपसर) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पवार यांनी याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा रखवालदार म्हणून काम करतो. १८ जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हडपसर गाडीतळ परिसरात रिक्षाचालक पवार हे थांबले होते. त्यावेळी आरोपीने वैदुवाडीला जाण्यासाठ किती भाडे घेणार आहे, अशी विचारणा केली. भाड्यावरुन त्यांच्यात वाद झाला. आरोपीने रिक्षाचालक पवार यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यांच्या डोक्यात दगड घातला. या घटनेत पवार जखमी झाले. पोलीस हवालदार मुंढे अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासकीय फेरबदल; तब्बल 272 कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

किरकोळ वादातून तरुणाला मारहाण

किरकोळ वादातून तरुणाला बांबूने मारहाण केल्याची घटना लोहगाव परिसरात घडली आहे. या प्रकरणी रोहित गालफाडे याच्यासह साथीदारांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महेश संभाजी वाघमारे (वय ३२, रा. मोझे आळी, लोहगाव) यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघमारे हे १८ जून रोजी रात्री दहाच्या सुमारास धानोरी जकात नाका परिसरातून निघाले होते. त्यावेळी वाघमारे यांच्या ओळखीतील आरोपी हे एका मद्यविक्री दुकानाजवळ थांबले होते. या परिसरात काय करता, अशी विचारणा त्यांनी आरोपींकडे केली. त्यावेळी झालेल्या वादातून आरोपींनी त्यांना बांबूने मारहाण केली. पोलसी हवालदार सातपुते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मानसिक छळाला कंटाळून एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरची आत्महत्या; पत्नीचा गंभीर आरोप

Web Title: A shocking incident has occurred in pune where a passenger attacked a rickshaw driver

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 06:08 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime

संबंधित बातम्या

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
1

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा
2

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले
3

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले

वहिनी बघून हसल्याचा राग अनावर; दिराने डोक्यात लोखंडी सळई घालून केला खून
4

वहिनी बघून हसल्याचा राग अनावर; दिराने डोक्यात लोखंडी सळई घालून केला खून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.