Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला, ट्रॅक्टरला कारची जोरदार धडक; पती-पत्नीचा जागीच मृत्यू

रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण गावाच्या हद्दीत एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कोल्हापूर येथील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 24, 2026 | 01:43 PM
देवदर्शनाला जाताना काळाचा घाला, ट्रॅक्टरला कारची जोरदार धडक; पती-पत्नीचा जागीच मृत्यू

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला, ट्रॅक्टरला कारची जोरदार धडक; पती-पत्नीचा जागीच मृत्यू

Follow Us
Follow Us:

कवठेमहांकाळ : राज्यासह देशभरात अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज अनेक जणांना अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागत आहे. अशातच आता एक मोठी घटना समोर आली आहे. रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण गावाच्या हद्दीत एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कोल्हापूर येथील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी साडेसात ते पावणेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मृतांमध्ये कोल्हापूर जिल्हा न्यायालयातील वकील वंदना संतोष गायकवाड (वय ३८) आणि त्यांचे पती संतोष धोंडीराम गायकवाड (वय ४५, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गायकवाड दाम्पत्य त्यांच्या MH-09-FJ-2815 क्रमांकाच्या व्हॅगनार कारने कोल्हापूरहून पंढरपूरकडे अक्कलकोट येथे देवदर्शनाला जात होते. शिरढोण गावाजवळील नायरा पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर (MH-09-CJ-2671) व त्याच्या दोन ट्रॉलींना त्यांच्या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. ट्रॅक्टर चालक व कामगार चहा पिण्यासाठी जवळील हॉटेलमध्ये थांबले होते. धडक अत्यंत भीषण असल्याने कार ट्रॉलीखाली अडकली आणि कारमधील दोघांचा गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्य करत अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली. तसेच घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार धैर्यशील माने यांचे स्विय सहाय्यक अमोल कोरे यांच्या तत्परतेमुळे मृतांची ओळख पटविणे शक्य झाले असून, अमोल कोरे यांनी तत्काळ संपर्क साधल्याने पोलिसांना मोठी मदत मिळाली.

हे सुद्धा वाचा : नगरसेवक करणार ‘ड्रग्ज मुक्त प्रभाग’! पुणे पोलीस आयुक्तांचा महत्वकांक्षी उपक्रम

पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस हद्दीत बारामती फाट्याजवळ शुक्रवारी (दि. २०) पहाटे दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास अक्कलकोटहून पुण्याकडे जाणारी एसटी बस पलटी होऊन अपघात झाला आहे. या भीषण अपघातात बसमधील सुमारे ४४ प्रवासी थोडक्यात बचावले असून तीन ते चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. बसचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. या बसमध्ये अंदाजे ४४ प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Web Title: A shocking incident has occurred in which a husband and wife died on the spot in a horrific accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • Accident Case
  • Accident Death
  • Sangli

संबंधित बातम्या

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटींची जोरदार धडक, तिघांचा मृत्यू; १९ जखमी
1

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटींची जोरदार धडक, तिघांचा मृत्यू; १९ जखमी

Sangli News: ‘शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी घेऊन…’; राजू शेट्टी, जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल
2

Sangli News: ‘शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी घेऊन…’; राजू शेट्टी, जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; काँग्रेसच्या युवा नेत्याचा जागीच मृत्यू
3

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; काँग्रेसच्या युवा नेत्याचा जागीच मृत्यू

Missing Link Accident : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, फॉर्च्युनरचा चुराडा; एकाचा मृत्यू
4

Missing Link Accident : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, फॉर्च्युनरचा चुराडा; एकाचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.