Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET पुनर्परीक्षेआधीच आणखी एका विद्यार्थ्याची आत्महत्या; 2 दिवसात 4 विद्यार्थ्यांनी संपवले जीवन

२१ जून रोजी होणाऱ्या नीट फेरपरीक्षेच्या ३ दिवस आधी अहमदाबादच्या न्यू राणीप परिसरातील एका बहुमजली इमारतीवरून उडी मारून एका नीट विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 19, 2026 | 11:41 AM
NEET पुनर्परीक्षेआधीच आणखी एका विद्यार्थ्याची आत्महत्या; 2 दिवसात 4 विद्यार्थ्यांनी संपवले जीवन

NEET पुनर्परीक्षेआधीच आणखी एका विद्यार्थ्याची आत्महत्या; 2 दिवसात 4 विद्यार्थ्यांनी संपवले जीवन

Follow Us
Follow Us:

अहमदाबाद : २१ जून रोजी होणाऱ्या नीट फेरपरीक्षेच्या ३ दिवस आधी अहमदाबादच्या न्यू राणीप परिसरातील एका बहुमजली इमारतीवरून उडी मारून एका नीट विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, पीडित विद्यार्थ्यांचे कुटुंब धक्क्यात आहे. मृत विद्यार्थ्यांची ओळख १८ वर्षीय कहान पटेल अशी पटली आहे. पोलिसांचे एक पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि जखमी मुलाला स्थानिक रुग्णालयात दाखल केले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

 

मृत विद्यार्थ्याच्या मामांनी पोलिसांना सांगितले की, त्याची पहिली नीट परीक्षा खूप चांगली झाली होती आणि तो फेरपरीक्षेची तयारी करत होता. त्यांनी कोणत्याही दबावाचा उल्लेख केला नाही. कहानने गुरुवारी सकाळी अरिस्टो आनंदम फ्लॅट्सच्या सर्वांत वरच्या मजल्यावरून उडी मारली. मोठा आवाज आणि किंकाळ्या ऐकून सोसायटीचे सदस्य आणि सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत कहानचा मृत्यू झाला होता. घटनेची भीषणता पाहून स्थानिक रहिवाशांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच, साबरमती पोलिसांचे एक पथक त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.

हे सुद्धा वाचा : परीक्षेत नापास, मोबाईलचं व्यसन अन् नैराश्य; 11 एक्सपायरी गोळ्या खाऊन 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू

गेल्या दोन दिवसांतील नीट विद्यार्थ्याच्या आत्महत्येची ही चौथी घटना आहे. कोईम्बतूरमध्ये नीटची तयारी करणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थिनी अनुकीर्तनाने बुधवारी सकाळी विष प्राशन करून आत्महत्या केली. १६ जूनला डेहराडूनमध्ये २३ वर्षीय रिया थापा आणि लखनौमध्ये १७ वर्षीय एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. १२ मे रोजी नीट परीक्षा रद्द झाल्यापासून देशभरात आतापर्यंत सुमारे १२ विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवले आहे.

हे सुद्धा वाचा : वेदांत बंडगर खूनप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी; सोमवारपासून हमाल-माथाडी कामगारांचा संप

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

गेल्या काही दिवसाखील आंबेगाव तालुक्यातील तांबडेमळा येथे एका २४ वर्षीय विवाहित महिलेने नवऱ्याच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, मयत मुलीच्या आईने तिच्या पतीविरोधात मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रेरणा शुभम तांबडे या विवाहितेचा विवाह ३० एप्रिल २०२५ रोजी शुभम बाबुराव तांबडे याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याच कारणावरून पत्नीला वारंवार शिवीगाळ, दमदाटी आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचाही दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.

Web Title: A shocking incident has occurred in which a student has committed suicide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • NEET Exam
  • Students
  • Sucide News

संबंधित बातम्या

पुण्यात ‘ग्लोबल स्कॉलर्स’चा एकलव्य इंडिया फाऊंडेशनकडून सत्कार; तब्बल 25 विद्यार्थी परदेशात शिक्षण घेणार
1

पुण्यात ‘ग्लोबल स्कॉलर्स’चा एकलव्य इंडिया फाऊंडेशनकडून सत्कार; तब्बल 25 विद्यार्थी परदेशात शिक्षण घेणार

सोनिक लहरींपासून विझवता येणार आग! हिमाचल प्रदेशच्या विद्यार्थ्यांनी बनवले बिना पाण्याचे अग्निशमनयंत्र!
2

सोनिक लहरींपासून विझवता येणार आग! हिमाचल प्रदेशच्या विद्यार्थ्यांनी बनवले बिना पाण्याचे अग्निशमनयंत्र!

Student Suicide: पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; सुसाईड नोटमधून समोर आले धक्कादायक कारण…
3

Student Suicide: पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; सुसाईड नोटमधून समोर आले धक्कादायक कारण…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.