Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fraud News : नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

शासकीय विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून कणकवलीत एका उच्चशिक्षित बेरोजगार तरुणीची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 11, 2026 | 04:29 PM
नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

Follow Us
Follow Us:

कणकवली : शासकीय विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून कणकवलीत एका उच्चशिक्षित बेरोजगार तरुणीची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या गोपनीय विभागात नोकरी लावतो, असे खोटे सांगून संशयित आरोपीने या तरुणीकडून २ लाख २४ हजार ६५० रुपये उकळले. पैसे देऊनही नोकरी न मिळाल्याने आणि दिलेले पैसे परत देण्यास नकार दिल्याने अखेर या प्रकरणी तोंडवली येथील श्रीकृष्ण शामसुंदर कुडतरकर याच्याविरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

कणकवली येथे राहणाऱ्या एका पदव्युत्तर (एम. कॉम.) शिक्षण पूर्ण झालेल्या तरुणीला नोकरीची अत्यंत गरज होती. याचाच गैरफायदा घेत संशयित आरोपी श्रीकृष्ण कुडतरकर याने आपण स्वत: अँटी करप्शन मध्ये काम करत असल्याची बतावणी केली. तसेच जिल्हाधिकारी मॅडम यांच्या विशेष अधिकारातील गोपनीय विभागात वरिष्ठ लिपिक या पदावर तिला नोकरीस लावून देतो, असे प्रलोभन त्याने तरुणीच्या कुटुंबाला दाखवले. या कामासाठी एकूण दोन लाख रुपयांची मागणी केली.

हे सुद्धा वाचा : 50 हून अधिक तरुणींना त्रास देणारा विकृत जाळ्यात; व्हॉट्सॲप ग्रुपवरून नंबर घेयचा अन्…

वेगवेगळ्या सबबी सांगून वारंवार टाळाटाळ

पीडित तरुणीच्या कुटुंबाने श्रीकृष्ण याच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या तारखांना गुगल पे आणि नेट बैंकिंगद्वारे पैशांचे व्यवहार केले. २ ऑक्टोबंर २०२५ ते २९ डिसेंबर २०२५ या कालावधीत टप्याटप्प्याने एकूण २ लाख २४ हजार ६५० रुपये कुडतरकर याने दिलेल्या बँक खात्यांवर वर्ग केले. पैसे देऊनही अनेक महिने नोकरी लागत नसल्याने आणि श्रीकृष्ण कुडतरकर याच्याकडून वेगवेगळ्ळ्या सबबी सांगून वारंवार टाळाटाळ केली जात असल्याने तरुणीला व तिच्या कुटुंबाला संशय आला. त्यांनी दिलेल्या पैशांची मागणी लावून धरली असता त्याने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणी व तिच्या कुटुंबाने कुडतरकर याच्या विरोधात तक्रार नोंदवली. संबंधित संशयित श्रीकृष्ण कुडतरकर हा अँटी करप्शनमध्ये कोणत्याही पदावर कार्यरत नसून, त्याने केवळ आर्थिक लुबाडणूक करण्यासाठी हा खोटा बनाव रचल्याचे तपासात समोर आले आहे.

Web Title: A shocking incident has occurred where a young woman was defrauded under the pretext of a job offer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 04:29 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Fraud Case

संबंधित बातम्या

बिहारमध्ये एकाच फासावर लटकलेले आढळले प्रेमीयुगुलाचे मृतदेह; भोला अन् सफीनाच्या मृत्यूचे गूढ गुलदस्त्यात
1

बिहारमध्ये एकाच फासावर लटकलेले आढळले प्रेमीयुगुलाचे मृतदेह; भोला अन् सफीनाच्या मृत्यूचे गूढ गुलदस्त्यात

कार सोडण्यासाठी ३ हजारांची लूट, टोइंग व्हॅनवरील तिघांना ठोकल्या बेड्या; पुणे पोलिसांची कारवाई
2

कार सोडण्यासाठी ३ हजारांची लूट, टोइंग व्हॅनवरील तिघांना ठोकल्या बेड्या; पुणे पोलिसांची कारवाई

बुलडाणा अर्बनच्या माजी सीईओ व विभाग व्यवस्थापिकांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
3

बुलडाणा अर्बनच्या माजी सीईओ व विभाग व्यवस्थापिकांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

४८ दिवसांत तब्बल २१ किलो वजन घटलं! उच्च न्यायालय हादरले; ५९ वर्षीय कैद्याला अखेर वैद्यकीय जामीन
4

४८ दिवसांत तब्बल २१ किलो वजन घटलं! उच्च न्यायालय हादरले; ५९ वर्षीय कैद्याला अखेर वैद्यकीय जामीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.