Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पैशाच्या जुन्या वादातून रक्तरंजित संघर्ष, करडे घाटातील गोळीबारात सराईताची हत्या; एक जण गंभीर जखमी

शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसरात सोमवारी (दि. १ जून) सायंकाळी झालेल्या थरारक गोळीबारात एका सराईत गुन्हेगाराची हत्या करण्यात आली, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 02, 2026 | 04:32 PM
पैशाच्या जुन्या वादातून रक्तरंजित संघर्ष, करडे घाटातील गोळीबारात सराईताची हत्या; एक जण गंभीर जखमी

पैशाच्या जुन्या वादातून रक्तरंजित संघर्ष, करडे घाटातील गोळीबारात सराईताची हत्या; एक जण गंभीर जखमी

Follow Us
Follow Us:

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसरात सोमवारी (दि. १ जून) सायंकाळी झालेल्या थरारक गोळीबारात एका सराईत गुन्हेगाराची हत्या करण्यात आली, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. भररस्त्यात वाहन अडवून गोळीबार, दगडफेक आणि कोयत्याने हल्ला करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल काळे, केदार झाडगे आणि उमेश जगदाळे हे तिघे एमएच १२ एक्सक्यू ५१०४ क्रमांकाच्या कारमधून न्हावरेहून शिरूरकडे येत होते. करडे घाट परिसरातील राजस्थान ढाब्यासमोर समोरून आलेल्या एमएच १४ एलए ११२८ क्रमांकाच्या कारने त्यांच्या वाहनाला धडक देत अडवले. यावेळी कारमधील तसेच दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी तिघांचा पाठलाग केला. जीव वाचवण्यासाठी तिघे पळू लागले असता मुख्य आरोपी सनी यादव याने विशाल काळे याच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. त्याचवेळी इतर साथीदारांनी केदार झाडगे याच्यावर कोयत्याने वार केले, तर दगडफेक करून मारहाणही केली. उमेश जगदाळे हा घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. या हल्ल्यात विशाल सुनील काळे (वय ३१, रा. ढोरआळी, मुंबई बाजार, शिरूर) याचा मृत्यू झाला. केदार चंद्रकांत झाडगे (वय २५) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. उमेश अनिल जगदाळे (वय २६) यालाही दुखापत झाली आहे.

मृत युवक, हल्लेखोर रेकॉर्डवरील गुन्हेगार

घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिस, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (एलसीबी) आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात हा हल्ला पैशाच्या जुन्या वादातून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मृत युवक तसेच हल्लेखोर हे विविध गुन्ह्यांमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहितीही समोर आली आहे.

घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात सनी यादव (रा. बकोरी फाटा, वाघोली, ता. हवेली) याच्यासह त्याच्या सहा साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली. भरदिवसा रस्त्यावर वाहन अडवून गोळीबार झाल्याच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा : माळेगाव परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट, तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात; नागरिकांचे गंभीर आरोप

वाहन अडवून केला हल्ला

हल्लेखोरांनी प्रथम कारला धडक देऊन वाहन थांबवले. त्यानंतर गोळीबार, दगडफेक आणि कोयत्याने हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर आरोपींनी काही वाहने घटनास्थळीच सोडून पलायन केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले असून तपास वेगाने सुरू आहे.

Web Title: A shocking incident has taken place in shirur taluka where one person was shot dead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 04:32 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Shirur Crime

संबंधित बातम्या

Nilanga Murder : शेतीच्या वादातून चुलत्याचा निघृण खून; दगड व काठीने मारहाण करुन जागेवरच संपवलं
1

Nilanga Murder : शेतीच्या वादातून चुलत्याचा निघृण खून; दगड व काठीने मारहाण करुन जागेवरच संपवलं

न्यायालयाच्या गेटवरच पत्नीला जाळण्याचा प्रयत्न; बाटलीने पेट्रोल अंगावर टाकलं अन्…
2

न्यायालयाच्या गेटवरच पत्नीला जाळण्याचा प्रयत्न; बाटलीने पेट्रोल अंगावर टाकलं अन्…

Pune Sucide News : पुण्यात गॅलरीतून उडी मारून मुलीची आत्महत्या; घरातील सर्वजण झोपले अन्…
3

Pune Sucide News : पुण्यात गॅलरीतून उडी मारून मुलीची आत्महत्या; घरातील सर्वजण झोपले अन्…

UP Crime : एक वर्ष केली फुल प्रुफ प्लॅनिंग, पत्नीने बाॅयफ्रेंडच्या मदतीने काढला पतीचा काटा; सापाच्या दंशाने केली हत्या
4

UP Crime : एक वर्ष केली फुल प्रुफ प्लॅनिंग, पत्नीने बाॅयफ्रेंडच्या मदतीने काढला पतीचा काटा; सापाच्या दंशाने केली हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.