Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संभाजीनगर हादरलं! तरुणीचे अपहरण करून अत्याचार; अ‍ॅम्ब्युलन्समधून नेले अन्…

माझ्यासोबत लग्न केले नाही तर तुझ्या आई-वडिलांना मारून टाकीन, अशी धमकी देत १८ वर्षीय तरुणीचे अ‍ॅम्ब्युलन्समधून अपहरण केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 01, 2026 | 12:53 PM
संभाजीनगर हादरलं! तरुणीचे अपहरण करून अत्याचार; अ‍ॅम्ब्युलन्समधून नेले अन्...

संभाजीनगर हादरलं! तरुणीचे अपहरण करून अत्याचार; अ‍ॅम्ब्युलन्समधून नेले अन्...

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : माझ्यासोबत लग्न केले नाही तर तुझ्या आई-वडिलांना मारून टाकीन, अशी धमकी देत १८ वर्षीय तरुणीचे अ‍ॅम्ब्युलन्समधून अपहरण केले. तिला आळंदी येथील आर्य सेवा संस्थेत नेऊन रजिस्टरवर जबरदस्ती स्वाक्षऱ्या करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याचा प्रकार १६ ते १७ जूनदरम्यान घडला आहे. याप्रकरणी दत्ता दिनकर गायकवाड याच्याविरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरुणी शहरातील नामांकित महाविद्यालयात बारावीत शिक्षण घेत आहे. काही वर्षांपासून ती सुट्टीत आईच्या गावी जात होती. तेथे तिची दत्ता गायकवाड याच्याशी ओळख झाली. पुढे तो तिच्याशी बोलू लागला. शहरातील नामांकित महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेतल्यानंतर तो तेथे तिला भेटण्यासाठी येत होता. मैत्रिणीचा मोबाइल क्रमांक घेऊन तिच्याशी बोलणे, फिरायला नेणे आणि जवळीक साधण्याचा प्रयत्न तो करीत होता. एकदा महाविद्यालयातून पीडितेला फुस लावून नेले आणि तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी तिच्या आईच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात पोक्सोचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून दत्ता पसार होता.

हे सुद्धा वाचा : चंद्रकांत पाटलांविषयी अवमानकारक वक्तव्य भोवलं; भाजप नगरसेवकाच्या तक्रारीनंतर दोघांवर गुन्हा दाखल

विरोध केला, मात्र धमकीने घाबरली

१६ जून रोजी पीडिता झेरॉक्स काढण्यासाठी घराबाहेर पडली असता दत्ता अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन आला. तुझ्याशी बोलायचे आहे, असे सांगून तिला अ‍ॅम्ब्युलन्समध्ये बसविले. जालना हायवेमार्गे रेल्वे स्टेशनवर नेले. तेथून दुसऱ्या अ‍ॅम्ब्युलन्समधून देवाची आळंदी, पिंपरी-चिंचवड येथे नेले. आळंदीला जाण्यास पीडितेने विरोध केला. मात्र, लग्नास नकार दिल्यास आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी दिल्याने ती घाबरली. आळंदी येथे दत्ताने तिला आर्य सेवा संस्थेत नेऊन रजिस्टरवर जबरदस्ती स्वाक्षऱ्या घेतल्या.

नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार

शिरूर शहरातील मार्वल इन लॉजिंग येथे नोकरीचे आमिष दाखवून एका २२ वर्षीय तरुणीला कारमधून आणून तिच्यावर अंमली पदार्थाचा वापर करत सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना  उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शिरूर शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एकाला अटक केली आहे. याबाबत पीडित तरुणी (वय २२ वर्ष) हिने शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दीपक श्रीमंदीलकर, अजय घेगडे, ऋषिकेश ढवळे, दीपक भोसले, सागर ढवळे, अनिकेत पठारे आणि एक अनोळखी व्यक्ती या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A shocking incident involving the abduction of a young woman has occurred in sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 12:53 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Sambhajinagar Crime

संबंधित बातम्या

चंद्रकांत पाटलांविषयी अवमानकारक वक्तव्य भोवलं; भाजप नगरसेवकाच्या तक्रारीनंतर दोघांवर गुन्हा दाखल
1

चंद्रकांत पाटलांविषयी अवमानकारक वक्तव्य भोवलं; भाजप नगरसेवकाच्या तक्रारीनंतर दोघांवर गुन्हा दाखल

Karnataka Crime : ‘तू जास्त पीस का खाल्ले?’ चिकनवरून वाद अन् मित्रानेच पोटात खुपसला सुरा
2

Karnataka Crime : ‘तू जास्त पीस का खाल्ले?’ चिकनवरून वाद अन् मित्रानेच पोटात खुपसला सुरा

धक्कादायक ! बहिणीशी बोलत नसल्याने पतीने केली पत्नीची हत्या; आरडाओरड करणाऱ्या स्वत:च्या मुलाला…
3

धक्कादायक ! बहिणीशी बोलत नसल्याने पतीने केली पत्नीची हत्या; आरडाओरड करणाऱ्या स्वत:च्या मुलाला…

Pune Crime : तंबाखू न दिल्याचा राग अनावर; तरुणाला लाथाबुक्क्यांनी अन् लोखंडी रॉडने मारहाण
4

Pune Crime : तंबाखू न दिल्याचा राग अनावर; तरुणाला लाथाबुक्क्यांनी अन् लोखंडी रॉडने मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.