
‘भावेश मोरेशी वाद का घालतो ?’ म्हणत तरुणावर हल्ला; डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार; पुण्यातील घटनेनं खळबळ
पोलिसांच्या माहितीनुसार, साक्षर अडागळे (दि. २७ ऑगस्ट) हा बिबवेवाडी येथील समर्थनगर परिसरातून निघाला होता. त्यावेळी आरोपींनी त्याला अडवले. ‘भावेश मोरेशी वाद का घालतो ?’, अशी विचारणा करुन आरोपींनी त्याला मारहाण केली. आरोपींनी अडागळे याच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. त्यावेळी अडागळे याच्या मित्राच्या आईने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी मित्राच्या आईलाही शिवीगाळ केली. भांडणात मध्यस्थी केली तर अडागळेला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी आरोपींनी त्यांना दिली. सहायक निरीक्षक शरयू देशमुख या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मारहाण करून बापाने मुलाला संपवलं
दारूच्या आहारी गेलेला मुलगा दररोज वाद घालत असल्याच्या रागातून वडिलांनी मुलाचा गळा आवळून तसेच मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वारजे माळवाडी परिसरात ही घटना घडली असून, याप्रकरणी वडिल तसेच आईला पोलिसांनी अटक केली आहे. महेश भागवत गायकवाड (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भाऊ गणेश भागवत गायकवाड (वय ३४) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार भागवत सूर्यभान गायकवाड (वय ६४), पार्वती भागवत गायकवाड (वय ६०) आणि आणखी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडिल भागवत व आई पार्वती यांना अटक केली आहे.