Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात घरफोडी करणाऱ्या जोडप्यासह तिघांना अटक; सीसीटीव्हीच्या मदतीने लावला गुन्ह्याचा छडा

बंद घराचे कुलूप उघडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या जोडप्यासह तिघांना नऱ्हे पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी या घरफोडीचा छडा लावला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 13, 2026 | 01:17 PM
पुण्यात घरफोडी करणाऱ्या जोडप्यासह तिघांना अटक; सीसीटीव्हीच्या मदतीने लावला गुन्ह्याचा छडा

पुण्यात घरफोडी करणाऱ्या जोडप्यासह तिघांना अटक; सीसीटीव्हीच्या मदतीने लावला गुन्ह्याचा छडा

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात घरफोडी करणाऱ्या जोडप्यासह तिघांना अटक
  • सीसीटीव्हीच्या मदतीने लावला गुन्ह्याचा छडा
  • नऱ्हे पोलिसांची मोठी कारवाई
पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, अशातच आता बंद घराचे कुलूप उघडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या जोडप्यासह तिघांना नऱ्हे पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी या घरफोडीचा छडा लावला आहे. या कारवाईत एक लाख २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. संचिता सचिन गोसावी ऊर्फ कदम (वय ४२), दत्ता अरुण कदम (वय ३९) आणि दीपक बाळू ढेरंगे (वय३४, तिघेही रा. शुभंकर हाईट्स, सर्व्हे  अभिनव कॉलेज रोड, नऱ्हे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

 

घराचे कुलूप उघडून एक लाख रुपये किमतीचा ४.९५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा लक्ष्मीहार, २५ हजार रुपये किमतीचे २.५४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स आणि २५ हजार रुपये रोख, असा ऐवज चोरला होता. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक वर्षा देशमुख आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) ईश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे यांच्यासह पोलिस अंमलदार प्रणिल मेस्त्री, निलेश भोरडे, पांडुरंग पवार, आणि कार्तिक कोंडे यांनी केली आहे.

चोरी करताना आरोपीने चेहरा झाकून ठेवल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होते, यामुळे गुन्ह्याचा छडा लावणे आव्हान होते. वरिष्ठ निरीक्षक वर्षा देशमुख आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) ईश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने घटनास्थळाच्या परिसरातील तसेच आरोपींच्या संभाव्य मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. आरोपींच्या हालचालींचे तांत्रिक विश्लेषण केले. तपासादरम्यान आरोपी नऱ्हे येथील अभिनव कॉलेज रोडवरील माऊली मंगल कार्यालयाजवळील एका इमारतीत राहत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तपास पथकाने तेथे जाऊन शोध घेतला. त्याठिकाणी संचिता गोसावी-कदम, दत्ता कदम आणि दीपक ढेरंगे हे तिघे आढळले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. नंतर तिघांना अटक करून चोरीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे पुढील तपास करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : टोळक्याचा पोलिसावर दगडाने हल्ला, रक्तबंबाळ अवस्थेत गाठले पोलिस ठाणे; छावणीतील घटनेनं खळबळ

आरोपी सराईत गुन्हेगार

आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर शिक्रापूर, चिपळून आदी परिसरात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्हयात ते जामिनावर बाहेर आहेत. मागील तीन ते चार महिण्यापूर्वी ते नऱ्हे परिसरात रहायला आले आहेत.

Web Title: The police have arrested three people for breaking into a house and committing theft in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • House Theft

संबंधित बातम्या

पार्टीसाठी पैसे न दिल्याचा राग अनावर! मित्राकडून १८ वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार; डोळ्यांवरही केला हल्ला
1

पार्टीसाठी पैसे न दिल्याचा राग अनावर! मित्राकडून १८ वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार; डोळ्यांवरही केला हल्ला

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीच्या अपघातात सख्ख्या भाऊ-बहिणीचा मृत्यू
2

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीच्या अपघातात सख्ख्या भाऊ-बहिणीचा मृत्यू

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ डॉक्टर महिलेची फसवणूक; APK फाईल पाठवली अन्…
3

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ डॉक्टर महिलेची फसवणूक; APK फाईल पाठवली अन्…

शिक्षणाच्या प्रांगणात विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर? Pune University मध्ये ‘त्या’ रात्री नेमके काय घडले?
4

शिक्षणाच्या प्रांगणात विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर? Pune University मध्ये ‘त्या’ रात्री नेमके काय घडले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.