Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

समलैंगिक APP वर ओळख, भेटण्यास बोलावले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पिंपरी-चिंचवड शहरातील एका व्यक्तीला संमलैंगिक अ‍ॅपवरून ओळख निर्माण करून भेटण्यास बोलविल्यानंतर त्याला तिघांनी बेदम मारहाण करून लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 23, 2025 | 05:55 PM
समलैंगिक APP वर ओळख, भेटण्यास बोलावले अन्...; पुण्यातील धक्कादायक प्रकार

समलैंगिक APP वर ओळख, भेटण्यास बोलावले अन्...; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Follow Us
Follow Us:

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील एका व्यक्तीला संमलैंगिक अ‍ॅपवरून ओळख निर्माण करून भेटण्यास बोलविल्यानंतर त्याला तिघांनी बेदम मारहाण करून लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ३८ वर्षीय व्यक्तीने बंडगार्डन पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानूसार, शाहरूख टॉप व त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा नोंदविला आहे. १८ मार्च रोजी ही घटना घडली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्ती पिंपरी-चिंचवड शहरातील आहे. संमलैंगिक अ‍ॅपवरून आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधला. तसेच, त्याला भेटण्यासाठी बोलविले. आरटीओ चौकात तक्रारदार व आरोपी भेटले. तक्रारदार परत निघाले. त्यावेळी या तिघांनी पुन्हा त्यांना परत बोलविले. नंतर त्यांना रेल्वे रुळावरून पायी चालत निर्जनस्थळी नेले. त्याठिकाणी पैशांची मागणी केली. त्यांच्यात वादविवाद झाले. त्यावेळी चौघांनी त्यांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडील रोकड जबरदस्तीने घेतली. तसेच, त्यांचा मोबाईल फॉरमॅट केला. नंतर आरोपी तेथून पळून गेले. त्यानंतर तक्रारदारांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. अधिक तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

फ्लेक्सवर नाव न टाकल्याने मारहाण

फ्लेक्सवर नाव टाकण्यावरुन झालेल्या वादातून एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर भागात चौघांना गज तसेच बांबुने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत संजय राजेंद्र तावरे (वय ३६, रा. जांभळी, सांगरुण, ता. हवेली) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी रुपेश तावरे, दीपक तावरे, वैभव तावरे, विष्णू उघडे यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, फ्लेक्सवर नाव न टाकल्याने आरोपींनी गावातील मुलांना मारहाण केल्याची घटना मंगळवारी (१८ मार्च) घडली. संजय तावरे यांनी मध्यस्थी केल्याने आरोपींनी तावरे तसेच त्यांचा भाऊ संदीप, गणेश चौधरी, स्वप्नील बाबर यांना गज व बांबूने मारहाण केली. आरोपींनी गावात दहशत माजविली. अधिक तपास उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर करत आहेत.

Web Title: A shocking incident of a young man being beaten up in pune has come to light nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2025 | 05:55 PM

Topics:  

  • Arrested
  • cmomaharashtra
  • crime news
  • maharashtra
  • Pimpri Chinchwad
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

CM Fadnavis Birthday: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी रोजगार अन् कौशल्य विकासाचा संकल्प दृढ – मंत्री मंगल प्रभात लोढा
1

CM Fadnavis Birthday: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी रोजगार अन् कौशल्य विकासाचा संकल्प दृढ – मंत्री मंगल प्रभात लोढा

पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून व्यावसायिकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये शेवटची इच्छा
2

पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून व्यावसायिकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये शेवटची इच्छा

पिंपळे जगतापमधील ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा लागला छडा; तीन आरोपींना ठोकल्या बेड्या
3

पिंपळे जगतापमधील ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा लागला छडा; तीन आरोपींना ठोकल्या बेड्या

Pune Murder : बहिणीची छेड काढल्याचा राग अनावर; पुण्यात 17 वर्षीय सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून
4

Pune Murder : बहिणीची छेड काढल्याचा राग अनावर; पुण्यात 17 वर्षीय सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.