Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 30 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धाराशिवमध्ये खळबळ! तरुणीचे अपहरण करून जबरदस्ती विवाह; मोटारसायकलवर बसवून नेले अन्…

धाराशिव जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका गावातील तरुणीचे अपहरण करून तिच्याशी जबरदस्तीने विवाह लावल्याचा, लैंगिक अत्याचार केल्याचा तसेच जातीवाचक शिवीगाळ करून धमकावल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 14, 2026 | 11:55 AM
धाराशिवमध्ये खळबळ! तरुणीचे अपहरण करून जबरदस्ती विवाह; मोटारसायकलवर बसवून नेले अन्...

धाराशिवमध्ये खळबळ! तरुणीचे अपहरण करून जबरदस्ती विवाह; मोटारसायकलवर बसवून नेले अन्...

Follow Us
Follow Us:

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका गावातील तरुणीचे अपहरण करून तिच्याशी जबरदस्तीने विवाह लावल्याचा, लैंगिक अत्याचार केल्याचा तसेच जातीवाचक शिवीगाळ करून धमकावल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून संबंधित तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता (नाव व गाव गोपनीय) हिने ११ जून रोजी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, ३ जून रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका गावातील तरुणाने तिला बसस्थानकातून पैसे देतो असे सांगून मोटारसायकलवर बसवून नेले. त्यानंतर तिच्याशी बळजबरीने विवाह लावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : बिहारमध्ये मित्राची आत्महत्या, गुजरातमध्ये दोन तरुणांनी संपवले आयुष्य; स्टेटसवर लिहिलं ‘लवकरच तुझ्याजवळ येतोय’

धमकी दिल्याचा आरोप

तक्रारीनुसार, आरोपीने पीडितेला मारहाण करून तिच्यावर दबाव टाकला. तसेच “माझ्यासोबत राहिली नाहीस तर तुला ठार मारेन किंवा तुझ्या नावाची चिठ्ठी लिहून स्वतःला काहीतरी करेन,” अशी धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याशिवाय आरोपीने पीडितेच्या घरासमोरील रस्त्यावर उभे राहून जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून संबंधित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील बलात्कार, मारहाण, धमकी व इतर संबंधित कलमांनुसार तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यातील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : इमारतीवरून उडी मारून सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या; सोबत असलेलं 6 महिन्यांचं बाळ सुखरूप

१३ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार

छत्तीसगड येथून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आली आहे. प्रियकराने आपल्या मित्रांसोबत मिळून १३ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. प्रियकराने तिला दुकाचीवरून फिरवण्याच्या बहाण्याने रेल्वे स्थानकावर घेऊन गेले आणि तिथे हा गुन्हा घडला. ही घटना बिलासपूर येथे घडली. मुलगी 5 मे रोजी अचानकपणे बेपत्ता झाली होती. नातेवाईकांनी तिचा शोध घेतला, मात्र तिचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. नंतर ते पोलीस ठाण्यात गेले आणि मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. 7 मे रोजी रात्री 10 वाजता, पोलिसांनी अल्पवयीन मुलीला रेल्वे स्थानकापासून ताब्यात घेतल्याची तिच्या नातेवाईकांना माहिती दिली. तिची चौकशी केली असता अल्पवयीन मुलीने पोलिसांना याबाबतची माहिती दिली की, प्रियकराने तिला फिरायला नेण्याच्या बहाण्याने दूर नेले. नंतर रेल्वे स्थानकाजवळ पोहोचले, त्याच ठिकाणी दोन मित्र आधीपासूनच होते. नंतर तिला निर्जनस्थळी नेऊन तिघांनी तिच्यावर एकामागून एक लैंगिक अत्याचार कण्यात आले. याच प्रकरणात नराधमांवर पॉक्सो कायद्यांतर्गत तीन मुलांवर गुन्हा दाखल केला, नंतर त्यांना ताब्यात घेत कारवाई केली.

Web Title: A shocking incident of a young womans abduction has occurred in dharashi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 11:49 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Dharashiv Crime

संबंधित बातम्या

आता पुणे पोलिस करणार भाडेकरूंची पडताळणी; माहिती न दिल्यास थेट होणार कारवाई
1

आता पुणे पोलिस करणार भाडेकरूंची पडताळणी; माहिती न दिल्यास थेट होणार कारवाई

पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध पेटणार? कृष्णा आंदेकरच्या खुनाचा कट उघड; सुरज ठोंबरे टोळीची उडी
2

पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध पेटणार? कृष्णा आंदेकरच्या खुनाचा कट उघड; सुरज ठोंबरे टोळीची उडी

डोळ्यांवर स्प्रे मारून 8 लाखांची रोकड लुटली; पुण्याच्या वारजे माळवाडीतील धक्कादायक घटना
3

डोळ्यांवर स्प्रे मारून 8 लाखांची रोकड लुटली; पुण्याच्या वारजे माळवाडीतील धक्कादायक घटना

Karnataka : अनैतिक संबंधांच्या संशयातून पत्नीला फॅनला लटकवले, व्हिडिओ कॉलवर आई-वडिलांना दाखवली मुलीची तडफड
4

Karnataka : अनैतिक संबंधांच्या संशयातून पत्नीला फॅनला लटकवले, व्हिडिओ कॉलवर आई-वडिलांना दाखवली मुलीची तडफड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.