Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Murder Case : गुन्हा दाखल केल्याच्या रागातून वृद्धाचा निर्घृण खून; पोलिसांनी आरोपींना घेतले ताब्यात

लातूर जिल्ह्यात दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्याचा राग मनात धरून तरुणाने साथीदारांच्या मदतीने तरुणीच्या वडिलांचा खून केल्याची गंभीर घटना मुखेड तालुक्यातील लादगा शिवारात घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 22, 2026 | 02:59 PM
गुन्हा दाखल केल्याच्या रागातून वृद्धाचा निर्घृण खून; पोलिसांनी आरोपींना घेतले ताब्यात

गुन्हा दाखल केल्याच्या रागातून वृद्धाचा निर्घृण खून; पोलिसांनी आरोपींना घेतले ताब्यात

Follow Us
Follow Us:

नांदेड : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. लातूर जिल्ह्यात दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्याचा राग मनात धरून तरुणाने साथीदारांच्या मदतीने तरुणीच्या वडिलांचा खून केल्याची गंभीर घटना मुखेड तालुक्यातील लादगा शिवारात घडली आहे. या प्रकरणातील पसार झालेल्या तीन प्रमुख आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड आणि मुखेड पोलिसांच्या पथकाने अवघ्या पाच तासांत ताब्यात घेतले आहे.

दापका राजा येथील किशन राजकुमार जोगदंड (वय २२) याच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा राग मनात धरून किशन जोगदंड याने आपल्या दोन साथीदारांसह संगनमत केले. त्यानंतर २० ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ११ वाजता लादगा शिवारातील शेतात फिर्यादीचे वडील बाबूपुंडलिक गायकवाड (वय ६०) यांच्यावर हल्ला करून त्यांचा जागीच खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्ल्यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या आईच्या तोंडावर चाकूने वार करून तिलाही गंभीर जखमी केले. या घटनेप्रकरणी मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम १०३ (१), १०९(१), ३५१ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

हे सुद्धा वाचा : नाशिकमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर

शोध मोहीमेला यश

घटना गंभीर असल्याने पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याचे निर्देश दिले. अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी शाम पानेगावकर व वैभव पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि मुखेड पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. विविध ठिकाणी शोधमोहीम राबवून अवघ्या पाच तासांत किशन जोगदंड, सोहम सुंदरसिंह बयास ऊर्फ सोन्या (वय १९, मुखेड) आणि मंगेश निवृत्ती लिंगे (वय ५०, मुखेड) यांना ताब्यात घेण्यात आले. पुढील कायदेशीर कारवाई मुखेड पोलिस करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : सफाई कर्मचाऱ्याच्या डोक्यात कठीण वस्तू घालून खून, पुण्यातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?

Web Title: A shocking incident of murder has occurred in nanded district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

लग्न झाले असतानाही दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध; लोखंडी पाईपने मारहाण करून एकाची हत्या
1

लग्न झाले असतानाही दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध; लोखंडी पाईपने मारहाण करून एकाची हत्या

Crime News: सायंकाळी गजबजलेल्या रस्त्यावर अचानक हल्ला; ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, आरोपी पसार
2

Crime News: सायंकाळी गजबजलेल्या रस्त्यावर अचानक हल्ला; ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, आरोपी पसार

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा
3

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा

MSEDCL Shirur News: जॅमर लावून २५ महिने केली वीजचोरी!; ५ लाखांत वीजजोडणी मागणाऱ्या दुग्ध संस्थेला कोर्टाचा दणका
4

MSEDCL Shirur News: जॅमर लावून २५ महिने केली वीजचोरी!; ५ लाखांत वीजजोडणी मागणाऱ्या दुग्ध संस्थेला कोर्टाचा दणका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.