Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील बाणेरमध्ये एकाचा खून, चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं; कारण…

बाणेरमधील ब्रम्हकुमारी मेडिटेशन सेंटरमधील महिलेशी एकतर्फी प्रेमातून झालेल्या वादात जागामालकाचा एकाने धारधार शस्त्राने वार करुन खुन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 06, 2026 | 05:54 PM
पुण्यातील बाणेरमध्ये एकाचा खून, चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं; कारण...

पुण्यातील बाणेरमध्ये एकाचा खून, चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं; कारण...

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बाणेरमधील ब्रम्हकुमारी मेडिटेशन सेंटरमधील महिलेशी एकतर्फी प्रेमातून झालेल्या वादात जागामालकाचा एकाने धारधार शस्त्राने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खून केल्यानंतर तो स्वतः चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात हजर झाला आणि या घटनेची माहिती दिली.

घनश्याम संजय रायकर (वय ४९, रा. ब्रम्हकुमारी  मेडिटेशन सेंटरसमोर, बाणेर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर  सोलुमन सुर्यभान शेंडगे (वय ५२, रा. फिरस्ता) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध बाणेर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरूवारी (दि. ६) सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास रायकर फार्म हाऊस बाणेर परिसरात घडली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, घनश्याम रायकर यांची बाणेर येथील जागा आहे. त्यांनी २५ वर्षांपूर्वी तेथे ब्रम्हकुमारी मेडिटेशन सेंटर उभारले आहे. आरोपी सोलुमन याचे लग्न झाले असून, त्याचा घटस्फोट झाला आहे. त्यामुळे तो असाच फिरस्ती आहे. ब्रम्हकुमारी सेंटरमधील एका महिलेशी शेंडगे याचे एकतर्फी प्रेम असल्याची माहिती आहे. तो गेल्या एक वर्षांपासून महिलेला त्रास देत होता. गुरुवारी सकाळी तो चाकू घेऊन आला. त्यावेळी जागा मालक रायकरही तेथेच होते. त्यांच्यात वादावादी झाली. त्याने चाकू दाखविला. तेव्हा रायकर हे पळून जाऊ लागले. तेव्हा सोलुमन याने त्यांचा पाठलाग करुन त्यांच्यावर सपासप वार केले. ते तेथेच कोसळले. त्यानंतर सोलुमन तेथून पळून तेथ चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात हजर झाला.

हे सुद्धा वाचा : गुन्हेगारांची काढली ‘धिंड’ अन् पोलिसांची झाली अडचण! नेमकं प्रकरण काय?

दरम्यान सोलुमनने तेथील पोलिसांना आपण खून केल्याचे सांगितले. तात्काळ चतुःश्रृंगी पोलिसांनी हा प्रकार बाणेर पोलिसांना कळविला. नागरिकांनी रायकर यांना उपचारासाठी नजकीच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटना घडलेली हद्द बाणेर पोलिस ठाण्याची आहे. त्यामुळे त्याला पुढील कारवाईसाठी बाणेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास बाणेर पोलिस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : बाजीराव रस्त्यावरील खुनातील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले

Web Title: A shocking incident of murder has taken place in punes baner area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 05:54 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

बाजीराव रस्त्यावरील खुनातील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले
1

बाजीराव रस्त्यावरील खुनातील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; ड्रग्जविरोधात नवी रणनिती; पोलिस आयुक्तांनी दिले आदेश
2

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; ड्रग्जविरोधात नवी रणनिती; पोलिस आयुक्तांनी दिले आदेश

ऑनलाइन गेमिंगच्या नादात दिल्ली पोलिस कॉन्स्टेबल बनला एटीएम चोर; टोळीला दिले हॅकिंगचे प्रशिक्षण
3

ऑनलाइन गेमिंगच्या नादात दिल्ली पोलिस कॉन्स्टेबल बनला एटीएम चोर; टोळीला दिले हॅकिंगचे प्रशिक्षण

शहरातून तडीपार केलेल्या तीन गुंडाना पकडले; पुणे पोलिसांची मोठी कारवाई
4

शहरातून तडीपार केलेल्या तीन गुंडाना पकडले; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.