Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मांजरीत स्पिकर्स बनविणाऱ्या कारखान्याला भीषण आग, कारखाना जळून खाक

हडपसर भागातील मांजरी येथील मोकळ्या जागेत शेडमध्ये उभारण्यात आलेल्या स्पीकर्स बनविणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना पहाटे घडली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 21, 2025 | 02:32 PM
धावत्या शिवशाही बसला भीषण आग; बसचालकाला समजलं अन् लगेचच...

धावत्या शिवशाही बसला भीषण आग; बसचालकाला समजलं अन् लगेचच...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : हडपसर भागातील मांजरी येथील मोकळ्या जागेत शेडमध्ये उभारण्यात आलेल्या स्पीकर्स बनविणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना पहाटे घडली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र, कारखाना या आगीत जळून खाक झाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मांजरी खुर्द येथे मोकळ्या जागेत जवळपास ६ हजार स्केवअर फुटामध्ये पञे व लोखंडी अँगलने कारखाना उभा केला होता. याठिकाणी मोठ- मोठे स्पीकर बनविण्यात येत होते. शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास अचानक कारखान्यातून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. तत्काळ ही माहिती येथील नागरिकांनी अग्निशमन दल व पोलिसांना दिली. लागलीच पुणे पीएमआरडीए अग्निशमन दलाचे चार फायर बंब व पाण्याचे टँकर दाखल झाले. तोपर्यंत आगीने उग्ररूप धारण केले होते. पुर्ण कारखान्याला आगीने विळखा घातलेला होता. आग मोठ्या प्रमाणात पसरलेली होती. जवानांनी चारही बाजूने पाण्याचा मारा सुरू केला. पण, स्पीकर्ससाठी लागणारे प्लाऊड तसेच जाळी व इतर प्लास्टीक वस्तू असल्याने आग भडकलेली होती.

जवानांनी अर्धा ते पाऊन तास अथक पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणली. तरीही जळत्या लाकडाचे निखारे निघत होते. जवानांनी पाण्याचा मारा करून कुलिंग ऑपरेशन सुरू केले. दरम्यान आगीत कोणी कामगार अडकले आहे का याची खाञी केली. जेसीबीच्या साह्याने शेडलगत असणारे पञे बाजूला करुन जवानांनी आत प्रवेश केला. पाहणी केली असता त्यात कोणीही अडकलेले नसल्याचे दिसून आले. दरम्यान, या आगीत संपुर्ण कारखाना जळाला, असल्याचे सांगण्यात आले. आगीत सीएनसी मशीन्स, कटींग मशीन, स्पीकर, एम्लिफायर्स, प्लॉयवुड, रंगाचे डबे, फायबर साहित्य, फर्निचर, इलेक्ट्रीक वायरिंग असे साहित्य जळाले. या आगीचे कारण समजू शकले नाही.

हे सुद्धा वाचा : सायबर चोरट्यांकडून तिघांची फसवणूक; तब्बल 83 लाखांना घातला गंडा

पुण्यातील इमारतीत भीषण आग

राज्यात आगाीच्या घटना वारंवार घडत आहेत.  गेल्या काही दिवसाखाली कोंढवा येथील एनआयबीएम रस्त्यावरील आलिशान इमारतीतील फ्लॅटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत ज्येष्ठ दाम्पत्य गंभीररित्या जखमी झाले असून, त्यात ६५ वर्षीय ज्येष्ठ महिला गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. तर, त्यांच्या बहिणीचे पतीही गंभीर जखमी झाले आहेत.

हे सुद्धा वाचा : दारु प्यायला बसले, मस्करी झाली अन् नंतर संपवूनच टाकलं; वाई तालुक्यातील खळबळजनक प्रकार

Web Title: A terrible fire has taken place in a factory that makes speakers in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 02:28 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Fire News
  • Hadapsar
  • maharashtra
  • Pune Fire
  • Pune Police

संबंधित बातम्या

चक्क मेलेला माणूसच झाला जिवंत! अंत्यसंस्कार करण्यापूर्वी, ‘ब्रेन डेड’ घोषित केलेल्या तरुणाला आला अचानक खोकला…
1

चक्क मेलेला माणूसच झाला जिवंत! अंत्यसंस्कार करण्यापूर्वी, ‘ब्रेन डेड’ घोषित केलेल्या तरुणाला आला अचानक खोकला…

Mumbai Rain Update: गणपती विसर्जनावर पावसाचे सावट! मुंबईत सकाळपासून पावसाची रिमझिम, IMD कडून महत्त्वाचा इशारा
2

Mumbai Rain Update: गणपती विसर्जनावर पावसाचे सावट! मुंबईत सकाळपासून पावसाची रिमझिम, IMD कडून महत्त्वाचा इशारा

Vanraj Andekar News: वनराज आंदेकर खून प्रकरणानंतर शस्त्रपूजन, टोळ्यांची बदला घेण्याची शपथ; आयुषने गमावला जीव
3

Vanraj Andekar News: वनराज आंदेकर खून प्रकरणानंतर शस्त्रपूजन, टोळ्यांची बदला घेण्याची शपथ; आयुषने गमावला जीव

Pune Crime: गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुणे रक्तरंजित! आंदेकर हत्येच्या बदल्यासाठी थेट जावयाच्या मुलालाच…
4

Pune Crime: गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुणे रक्तरंजित! आंदेकर हत्येच्या बदल्यासाठी थेट जावयाच्या मुलालाच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.