शासकीय रुग्णालयातून नवजात बाळाची चोरी (फोटो सौजन्य-X)
stole a newborn baby News In Marathi: ओडिशातील संबलपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील रुग्णालयातून एका नवजात अर्भकाची त्याच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत चोरी झाल्याचा आरोप आहे. याबाबत माहिती देताना पोलिसांनी बुधवारी सांगितले की, नवजात बाळाला चोरणाऱ्या महिलेचा शोध घेण्यासाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत. या घटनेत पोलीस बस आणि ट्रेनची तपासणी करत आहेत. हे नवजात अर्भक संबळपूरच्या शासकीय विमसार रुग्णालयातून चोरीला गेल्याचे पोलिसांनी सांगितले.तसेच ज्या महिलेने मूल चोरले, तिचा मुलाच्या कुटुंबाशी बराच संपर्क वाढला होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, हे नवजात बाळ शेजारील राज्य छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यातील एका जोडप्याचे आहे. पोलिसांनी तक्रारीचा हवाला देत म्हटले की, ‘सोमवारी रुग्णालयात मुलाचा जन्म झाला. चोरीची घटना मंगळवारी दुपारी घडली जेव्हा मुलाचे आई-वडील त्याला कुटुंबातील एका व्यक्तीच्या ताब्यात देऊन बाहेर गेले होते. पोलिसांनी सांगितले की, ‘सीसीटीव्ही फुटेज’मध्ये एक अनोळखी महिला रुग्णालयातून मुलाला घेऊन जात असल्याचे दिसून आले आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती देताना अतिरिक्त पोलिस अधीक्षक हरेशचंद्र पांडे म्हणाले, ‘मुल चोरणाऱ्या महिलेचा शोध घेण्यासाठी आम्ही 4 टीम तयार केल्या आहेत. याबाबत सर्व ‘चेक गेट्स’ला कळवण्यात आले असून पोलिस बसेस आणि ट्रेनची तपासणी करत आहेत.’ अशी माहिती मुलाच्या आईने पोलिसांना दिली आहे. VIMSAR चे संचालक भाबग्रही रथ यांनी सांगितले की, नवजात बाळ लवकरच सापडेल अशी आशा आहे. त्यांनी रुग्णांना त्यांच्या खाटेजवळ अज्ञात व्यक्तीला येऊ देऊ नये, असे आवाहन केले.
कर्नाटकातील कलबुर्गी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील जिल्हा रुग्णालयातून बनावट परिचारिकांनी नवजात अर्भकाचे अपहरण केले. येथे स्वतःला परिचारिका म्हणून घेणाऱ्या दोन महिलांनी नवजात बालकाचे अपहरण केले.
रुग्णालयाच्या ११५ वॉर्डमध्ये २५ नोव्हेंबरला पहाटे ४ वाजता कस्तुरीला बाळाचा जन्म झाला. त्यानंतर संशयित महिला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या गणवेशात कुटुंबाकडे आल्या आणि बाळाला रक्त तपासणीसाठी घेऊन जावे लागेल, असे सांगितले. घरच्यांनी मूल देऊन टाकलं पण तिने ते परत आणलं नाही. पीडित पालक रामकृष्ण आणि कस्तुरी हे सय्यद चिंचोली गावचे रहिवासी आहेत. याप्रकरणी ब्रह्मपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.