Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साईंच्या दारात महिलेवर वार, गेट क्रमांक चारजवळील खुनाने शिर्डी हादरली; 2 महिलांना अटक

जागतिक तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डीत साई मंदिराच्या गेट क्रमांक चारजवळ काकडी विक्रेत्या महिलेची चाकूने सपासप वार करुन निघृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे साईभक्तांत भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 21, 2026 | 01:32 PM
साईंच्या दारात महिलेवर वार, गेट क्रमांक चारजवळील खुनाने शिर्डी हादरली, २ महिलांना अटक

साईंच्या दारात महिलेवर वार, गेट क्रमांक चारजवळील खुनाने शिर्डी हादरली, २ महिलांना अटक

Follow Us
Follow Us:

शिर्डी : जागतिक तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डीत साई मंदिराच्या गेट क्रमांक चारजवळ काकडी विक्रेत्या महिलेची चाकूने सपासप वार करुन निघृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे साईभक्तांत भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तातडीने दोन महिला आरोपींना अटक केली आहे. जयश्री क्षीरसागर असे मृत महिलेचे नाव असून, या प्रसंगाने शिर्डीतील गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

 

गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील गुंडगिरीचा आगडोंब उसळला होता. या गुंडगिरीच्या निषेधार्थ चार दिवस श्रीरामपूर शहर बंद होते. त्यापूर्वी काही महिन्यांपूर्वी शिर्डी येथील गुन्हेगारी, दहशतीचा मुद्दा ऐरणीवर आला होता. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील यांनी कठोर धोरण अवलंबल्यानंतर कारवाया झाल्या. त्यानंतर शिर्डीतील गुन्हेगारीची चर्चा काहीशी शमली असतानाच आता पुन्हा महिलेचा खून झाल्याची आणि हा खून देखील महिलांनीच केल्याचे समोर आल्याने पोलिस प्रशासनासह सर्वच आवाक आहेत.

शिर्डी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (१९ जुलै) रात्री ९ ते १० वाजेच्या सुमारास जयश्री साईनाथ क्षीरसागर (वय २९, रा. बाजारतळ, शिर्डी) या साई मंदिराच्या गेट क्रमांक चारजवळ काकडी आणि कैरी विक्रीसाठी थांबल्या होत्या. आरोपी फिजा उर्फ नोझिया लुकमान पटेल (रा. कालिकानगर) आणि अंजली राजू खंडिखोड (रा. द्वारकानगर) या दोघी तेथे आल्या. त्यांनी जयश्री यांना काकडी विकण्यास विरोध केला. त्यावरून झालेल्या वादाने हिंसक रूप घेतले. जयश्री यांच्यावर सपासप वार केल्याने त्यांना तातडीने साईबाबा रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी मृत महिलेचे पती साईनाथ भालचंद्र क्षीरसागर (वय ३०) यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कल्पेश चव्हाण करत आहेत.

तपासाची सूत्रे वेगाने फिरवली

घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस उपअधीक्षक अमोल भारती आणि पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. वेगाने तपासाची चक्रे फिरवत दोन्ही महिला आरोपींना अटक केली आहे. जयश्री यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून पार्थीव नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हे सुद्धा वाचा : पुणे-सातारा महामार्गावरील हत्येचा उलगडा! वडिलांच्या खुनाचा बदला 23 व्या वर्षी घेतला

… आणि परिसरात उडाला एकच थरकाप

रविवार असल्याने मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होती. मंदिरात साईबाबांच्या शेजआरतीची तयारी सुरू होती. याच दरम्यान झालेल्या वादातून दोन्ही महिला आरोपींनी धारदार शस्त्राने जयश्री यांच्या पोटावर आणि मांडीवर सपासप वार केले. जयश्री यांचा आरडाओरडा आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेने परिसरात थरकाप उडाला.

Web Title: A woman has been murdered near the gate of the sai temple in shirdi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 01:31 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Pune Murder : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून; पोलिसांनी आरोपीला कर्नाटकातून पकडले
1

Pune Murder : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून; पोलिसांनी आरोपीला कर्नाटकातून पकडले

पत्नीची निर्घृण हत्या! डोके कापून फ्रीजमध्ये ठेवले अन् त्यानंतर शिजवून खाल्ले जेवण; लग्नानंतर काही महिन्यांतच पती बनला हैवान
2

पत्नीची निर्घृण हत्या! डोके कापून फ्रीजमध्ये ठेवले अन् त्यानंतर शिजवून खाल्ले जेवण; लग्नानंतर काही महिन्यांतच पती बनला हैवान

महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात घरफोडी, सराईताला ठोकल्या बेड्या; तब्बल 25 लाखांचा ऐवज जप्त
3

महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात घरफोडी, सराईताला ठोकल्या बेड्या; तब्बल 25 लाखांचा ऐवज जप्त

दहीहंडी कार्यक्रम अंगलट! पुण्यात नृत्यांगना राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा दाखल
4

दहीहंडी कार्यक्रम अंगलट! पुण्यात नृत्यांगना राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.