Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बायकोनं नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत लॉजवर रंगेहात पकडलं; पती घाबरला अन्…

पत्नीने लॉजवर धाड टाकून पतीला एका महिलेसोबत रंगेहात पकडले आहे. अपमानित झाल्यानंतर पतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 05, 2025 | 01:35 PM
बायकोनं नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत लॉजवर रंगेहात पकडलं; पती घाबरला अन्...

बायकोनं नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत लॉजवर रंगेहात पकडलं; पती घाबरला अन्...

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : पती-पत्नींमधील नातं हे विश्वास आणि प्रेमावर आधारित असते. जर दोघांपैकी कोणीही एकमेकांशिवाय तिसऱ्याच व्यक्तीशी नातं सुरू केलं तर दोघांच्यातील विश्वासाला आणि नात्याला तडा जातो. पती-पत्नींमधील नात्याचे मूळ असते ‘विश्वास’… लग्न समारंभावेळी, आपण एकमेकांवर प्रेम करण्याचे आणि विश्वासू राहण्याचे वचन देतो. पण जेव्हा तिसरी व्यक्ती त्यांच्यामध्ये येते तेव्हा तो विश्वास तुटतो. जेव्हा आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती दुसऱ्या कोणासोबत दिसते तेव्हा आपण खूप दुखी होतो. अशातच आता पत्नीने लॉजवर धाड टाकून पतीला एका महिलेसोबत रंगेहात पकडले आहे. अपमानित झाल्यानंतर पतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

बुधवारी मध्यरात्री ऐरोली खाडी पुलावरून उडी मारलेला हा रिक्षाचालक गुरुवारी सकाळी गाळात अडकलेल्या अवस्थेत जिवंत सापडला. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची आणि खाडीत उडी मारल्याची माहिती मिळताच पोलिस व अग्निशमन दलाने दोन तास शोधमोहीम राबवली. तो वाहून गेल्याचे समजून तपास थांबवला, मात्र गुरुवारी सकाळी तो गाळात रुतलेल्या अवस्थेत आढळून आला.

ठाण्यातील रहिवासी हा रिक्षाचालक परस्त्रीच्या प्रेमात असल्याची पत्नीला माहिती मिळाली होती. तिने बुधवारी पतीवर पाळत ठेवली आणि तो परस्त्रीसोबत लॉजवर गेल्याचे लक्षात येताच धाड टाकली. पतीचे बिंग फुटल्याने संतप्त पत्नीने त्याला चांगलाच जाब विचारला. अपमानित झाल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास रिक्षाचालक थेट ऐरोली खाडी पुलावर पोहोचला. त्याने तेथून पत्नीला फोन करून आपल्या चुकीची कबुली दिली. तसेच “आता आत्महत्या करतोय” असे सांगत त्याने पुलावरून उडी मारली. काही वेळातच याची माहिती नातेवाईक व पोलिसांना मिळाली. रबाळे पोलिस, ऐरोली अग्निशमन दल आणि नातेवाईकांनी जवळपास दोन तास शोधमोहीम राबवली. मात्र, तो वाहून गेला असावा असे समजून शोध थांबवण्यात आला.

गुरुवारी सकाळी मात्र खाडीपुलापासून काही अंतरावर एका तरुणाला गाळात अडकलेल्या अवस्थेत पाहून स्थानिकांनी पोलिसांना कळवले. पोलिस पथकाने बोटीच्या साहाय्याने त्याला बाहेर काढले. चौकशीदरम्यान तोच बुधवारी मध्यरात्री पुलावरून उडी मारणारा रिक्षाचालक असल्याचे स्पष्ट झाले. त्याचा जीव वाचला असला तरी या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पुढील तपास रबाळे पोलिस करत आहेत.

भर रस्त्यात अपहरणाचा थरार

आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात पतीच्या प्रेयसीचं अपहरण करून तिला मारहाण केल्याची धक्कादायक घटना गेल्या काही दिवसाखाली घडली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात संबंधीत महिला, तिची सासू आणि मेहुणा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Web Title: A woman in mumbai has revealed her husbands extramarital affair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 01:01 PM

Topics:  

  • crime news
  • Mumbai Crime
  • Mumbai Police
  • Sucide News

संबंधित बातम्या

Mumbai Bomb Threat: मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी, पोलीस म्हणाले, ‘घाबरण्याची गरज नाही अलर्ट….’
1

Mumbai Bomb Threat: मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी, पोलीस म्हणाले, ‘घाबरण्याची गरज नाही अलर्ट….’

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून शिक्षिकेवर सातत्याने अत्याचार; फ्लॅटसाठी पैसेही घेतले अन् नंतर शिक्षिकेलाच…
2

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून शिक्षिकेवर सातत्याने अत्याचार; फ्लॅटसाठी पैसेही घेतले अन् नंतर शिक्षिकेलाच…

मोबाईल हिसकावणाऱ्या राज्यस्थानातील दोघांना ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात पाठलाग करुन पकडले
3

मोबाईल हिसकावणाऱ्या राज्यस्थानातील दोघांना ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात पाठलाग करुन पकडले

कोल्हापुरात खळबळ! रिक्षा चालकाचा गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
4

कोल्हापुरात खळबळ! रिक्षा चालकाचा गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.