Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रस्ता ओलांडताना जोरात बस आली अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना

सातारा रस्त्यावर भरधाव पीएमपीने दिलेल्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नातूबाग परिसरात हा अपघात घडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 25, 2024 | 05:20 PM
रस्ता ओलांडताना जोरात बस आली अन्...; पुण्यातील धक्कादायक घटना

रस्ता ओलांडताना जोरात बस आली अन्...; पुण्यातील धक्कादायक घटना

Follow Us
Follow Us:

पुणे : सातारा रस्त्यावर भरधाव पीएमपीने दिलेल्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नातूबाग परिसरात हा अपघात घडला असून, महिला विवाह सोहळ्यावरून घरी निघाली होती. अपघातात महिलेबरोबर असलेली नात गंभीर जखमी झाली आहे. आशाबाई दत्तात्रय साळुंके (वय ५७, रा. हिराबाग, शुक्रवार पेठ, टिळक रस्ता) असे मृत्यू झालेल्या पादचारी महिलेचे नाव आहे. अपघातात साळुंके यांची नात प्रचिती जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पीएमपी चालक सतीश राजाराम गोरे (वय २७, रा. कोंढणपूर, ता. हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विशाल दत्तात्रय साळुंके (वय ३८) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, साळुंके कुटुंबीय नातेवाईकांच्या विवाहासाठी शनिवारी रात्री पुणे-सातारा रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात गेले होते. रात्री सव्वानऊच्या सुमारास तक्रारदार साळुंके यांची आई आशाबाई, मुलगी प्रचिती घरी निघाले. नातूबाग परिसरातून ते रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव पीएमपी बसने रस्ता ओलांडणाऱ्या आशाबाई साळुंके आणि त्यांची नात प्रचिती यांना धडक दिली. अपघातात आशाबाई गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक छगन कापसे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक फिरोज शेख तपास करत आहेत.

अपघाताचे प्रमाण वाढले

पुण्यात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली सोलापूर-पुणे रस्त्यावर भल्या पहाटे वाहन तपासणीसाठी नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांना भरधाव दुचाकीने धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात एक पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाला आहे. तर, दुचाकी चालक तरुणासह त्याची मैत्रिण देखील जखमी झाली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार तरुणावर हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचारी संकेत गांगुर्डे, पोलीस हवालदार बारटक्के, मोटारचालक चेतन सिंग, दुचाकीवरील सहप्रवासी सायली टिंगे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मनोहर भाऊ ओंबासे (वय ३९, रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

हे सुद्धा वाचा : सदाशिव पेठेत भरदुपारी फ्लॅट फोडला; अमेरिकन डॉलर चोरले

टेम्पोने तिघांना उडविले

गेल्या काही दिवसाखाली सातारा-पुणे महामार्गावरील मांगडेवाडी गावाच्या परिसरात रस्त्याच्या कडेला महिला पतीसह मैत्रिणीशी गप्पा मारत उभा असताना भरधाव पॅगो टेम्पोने उडविले. या भीषण अपघातात महिलेचा मृत्यू झाला, तर दाम्पत्य जखमी झाले आहेत. दिपाली वैभव बर्गे (वय ४५) अशी मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, आदीनाथ वायदंडे (वय ५९) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात चालक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पार्वती वायदंडे (वय ५०) यांनी तक्रार दिली आहे. ९ नोव्हेंबर रोजी पावणे आठच्या सुमारास हा अपघात घडला आहे.

Web Title: A woman pedestrian has died in a collision with a pmp bus in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2024 | 04:49 PM

Topics:  

  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने मुक्या जीवांची घुसमट; प्राण्यांमध्ये कानाच्या विकारांत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ
1

डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने मुक्या जीवांची घुसमट; प्राण्यांमध्ये कानाच्या विकारांत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ

पाषाण येथील मुख्य बसथांब्याच्या दुरावस्थेवरुन मनसे आक्रमक; प्रशासनाला दिला आंदोलनाचा इशारा
2

पाषाण येथील मुख्य बसथांब्याच्या दुरावस्थेवरुन मनसे आक्रमक; प्रशासनाला दिला आंदोलनाचा इशारा

डीजेविरोधात पुणेकर एकवटले! बालगंधर्व चौक ते पुणे महापालिकेपर्यंत निषेध मोर्चा; ध्वनीप्रदूषणावर कारवाईची मागणी
3

डीजेविरोधात पुणेकर एकवटले! बालगंधर्व चौक ते पुणे महापालिकेपर्यंत निषेध मोर्चा; ध्वनीप्रदूषणावर कारवाईची मागणी

Madha Jamgaon Murder Case : २ लाख ४० हजारांच्या दागिन्यांसाठी वृद्धाचा घेतला बळी!
4

Madha Jamgaon Murder Case : २ लाख ४० हजारांच्या दागिन्यांसाठी वृद्धाचा घेतला बळी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.