Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील उच्चशिक्षित तरुणाची फसवणूक; तब्बल 80 लाखांना घातला गंडा

क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून दर महिन्याला दहा टक्के परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने पिंपरी- चिंचवड मधील उच्चशिक्षित तरुणाची ८० लाख २७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 13, 2025 | 05:08 PM
पुण्यातील उच्चशिक्षित तरुणाची फसवणूक; तब्बल 80 लाखांना घातला गंडा

पुण्यातील उच्चशिक्षित तरुणाची फसवणूक; तब्बल 80 लाखांना घातला गंडा

Follow Us
Follow Us:

पिंपरी : क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून दर महिन्याला दहा टक्के परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने पिंपरी- चिंचवड मधील उच्चशिक्षित तरुणाची ८० लाख २७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पिंपरी- चिंचवड सायबर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अविनाश सिंग आणि रवी ठाकूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही मार्केटिंग आणि साखळी पद्धतीने उच्चशिक्षित तरुणांना त्यांच्या जाळ्यात ओढत होते. याबाबत सेमिनार घेऊन त्यांना कशा पद्धतीने परतावा मिळू शकतो. याबद्दल ते पटवून द्यायचे.

सायबर गुन्हेगारी मध्ये अनेक उच्चशिक्षित तरुण अडकत असल्याचं वारंवार समोर येत आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील उच्चशिक्षित असलेल्या तरुणाला क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून ८० लाख रुपयांना गंडा घातला आहे. आरोपी अविनाश सिंग आणि रवी ठाकूर हे ओरीस कॉइन कंपनीच्या माध्यमातून विविध उच्चशिक्षित तरुणांना आपल्या जाळ्यात ओढत, क्रिप्टोकरन्सीची कंपनी असल्याचं ते भासवायचे. दर महिन्याला दहा टक्के परतावा मिळवण्याच्या आमिषाने त्यांना पैसे गुंतवण्यास भाग पाडायचे. काही जणांना त्यांनी ते पैसे दिले. परंतु, फिर्यादी यांनी तब्बल ८० लाख रुपये त्यांच्याकडे गुंतवले होते. त्यांना तो परतावा मिळाला नाही. त्यानंतर त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचं समोर आलं. या प्रकरणानंतर फिर्यादी यांनी पिंपरी- चिंचवडच्या सायबर पोलिसांकडे धाव घेऊन याबाबत रीतसर तक्रार नोंदवली.

हे सुद्धा वाचा : महिन्याला हप्ता दे नाहीतर, मी…; पुण्यात गुंडाकडून व्यावसायिकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण

कंपनीच्या मालकांचा शोध

सायबर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान याप्रकरणी अशी फसवणूक इतर कोणाची झाली असल्यास तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहन देखील सायबर पोलिसांकडून करण्यात आलं आहे. या प्रकरणांमध्ये ओरिस कॉइन कंपनीचे मालक राहुल खुराना आणि तरुण त्रिका या दोघांचा सायबर पोलीस शोध घेत आहेत.

मनीलॉन्ड्रींगच्या धाकाने सहा लाख उकळले

मगरपट्टा येथील एका तरुणीला आधार कार्डचा गैरवापर करून त्याद्वारे मनी लॉन्ड्रींग झाले आहे. यामुळे यात तुम्हाला अटक करावे लागेल असे सांगून सायबर चोरट्यांनी तरुणीकडून 8 लाख 89 हजार रुपये उकळले आहेत. याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार हडपसर पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. सायबर चोरट्याने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विभागातून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या नावाने मनीलॉन्ड्रींग झाले असून, आधार कार्डचाही गैरवापर करण्यात आला आहे. तुम्हाला अटक होऊ शकते असे धमकावून केस क्लिअर करण्यासाठी एनओसी सर्टीफिकेट देतो असे सांगून तरुणीकडून 5 लाख 89 हजार रुपये उकळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अमर काळंगे करीत आहेत.

Web Title: A youth from pune has been cheated of 80 lakhs nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2025 | 05:08 PM

Topics:  

  • crime news
  • cyber crime
  • maharashtra
  • Pune Crime

संबंधित बातम्या

महाराष्ट्राच्या जलसुरक्षेवर उष्णसंकट! कोकण-गोव्यात उष्ण मान्सून हवामान पट्टा वाढला
1

महाराष्ट्राच्या जलसुरक्षेवर उष्णसंकट! कोकण-गोव्यात उष्ण मान्सून हवामान पट्टा वाढला

बसस्थानकात महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या, मंचर पोलिसांची कारवाई; तब्बल…
2

बसस्थानकात महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या, मंचर पोलिसांची कारवाई; तब्बल…

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट
3

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन
4

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.