Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nalasopara News: मैत्री, प्रेमाचं आमिष अन् धर्मांतरासाठी दबाव; नालासोपाऱ्यात तरुणीचा गंभीर आरोप

मैत्री झाली, प्रेमाचं आमिष दाखवलं... पुढे मात्र सुरू झाला कथित छळाचा सिलसिला! धर्मांतरासाठी दबाव, मारहाण आणि लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप करत नालासोपाऱ्यातील तरुणीने पोलिसांत धाव घेतली आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 14, 2026 | 05:35 PM
Nalasopara News: मैत्री, प्रेमाचं आमिष अन् धर्मांतरासाठी दबाव; नालासोपाऱ्यात तरुणीचा गंभीर आरोप

Nalasopara News: मैत्री, प्रेमाचं आमिष अन् धर्मांतरासाठी दबाव; नालासोपाऱ्यात तरुणीचा गंभीर आरोप

Follow Us
Follow Us:
  • नालासोपाऱ्यात तरुणीवर धर्मांतरासाठी दबाव आणि अत्याचाराचा आरोप
  • आरिफसह आई आणि मावस भावाविरोधात गंभीर तक्रार
  • ७०-८० तरुणींना लक्ष्य केल्याचा पीडितेचा दावा; पोलिस तपास सुरू
 

नालासोपारा : मैत्रीच्या माध्यमातून ओळख वाढवून प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, त्यानंतर धर्मांतरासाठी दबाव टाकणे, मारहाण आणि लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार नालासोपारा येथे समोर आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने १२ ऑक्टोबर रोजी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुख्य आरोपी आरिफ शेख याच्यासह त्याची आई रुक्साना शेख आणि मावस भाऊ साहिल खान यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात आरोपींकडून आपल्यावर धर्मांतरासाठी दबाव आणण्यात आल्याचा दावा केला आहे. तसेच मारहाण आणि लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपही तिने केला आहे.

जादूटोणा आणि भूताची भीती दाखवल्याचा आरोप

पीडितेच्या म्हणण्यानुसार, एका मैत्रिणीच्या माध्यमातून तिची आरिफ शेखशी ओळख झाली. ओळख वाढल्यानंतर आरिफने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने त्याची आई रुक्साना शेख ही अॅस्ट्रोलॉजर असल्याचे सांगून पीडितेची तिच्याशी भेट घडवून आणली. रुक्सानाने पीडितेला तिची आई मरण पावली असून घरात भूत असल्याची तसेच घरातीलच व्यक्ती तिला मारून टाकतील, अशी भीती दाखवल्याचा आरोप आहे. त्यानंतर पीडितेला आरोपीच्या घरी राहण्यास भाग पाडल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. १ एप्रिल २०२५ रोजी ती आरोपीच्या घरी राहण्यास गेल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून आरिफने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

हेही वाचा: Crime News: ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा अंतिम निर्णय! सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान-साहिलला फाशीची शिक्षा

भाड्याच्या घरातही छळ सुरूच

५ मे २०२५ रोजी आरिफ आणि पीडिता दुसऱ्या ठिकाणी भाड्याने राहू लागले. त्या ठिकाणी केवळ हिंदू नागरिकांनाच खोल्या दिल्या जात असल्याने आरिफने स्वतःला पीडितेचा भाऊ असल्याचे भासवून तिच्यासोबत राहण्यास सुरुवात केल्याचा दावा करण्यात आला आहे. विरोध केल्यास आरिफ मारहाण करत असल्याचे पीडितेने म्हटले आहे. जुलै २०२५ मध्ये आरिफचा मावस भाऊ साहिल खान यानेही तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्याला विरोध केल्यानंतर आरिफ आणि साहिल या दोघांनी मिळून मारहाण केल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.

गोमांस आणि हिजाबची सक्ती केल्याचा दावा

धर्मांतरासाठी दबाव आणताना पीडितेला गोमांस खाण्यास आणि हिजाब परिधान करण्यास सांगितले जात असल्याचा आरोप आहे. त्यास नकार दिल्यास मारहाण केली जात असल्याचेही तिने पोलिसांना सांगितले. आरिफने अनेक हिंदू तरुणींना अशाच प्रकारे लक्ष्य केल्याचा दावा पीडितेने केला आहे. तसेच मुलींचे अश्लील फोटो काढून त्यांच्याकडून पैसे उकळणे आणि लैंगिक अत्याचार करण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोपही तिने केला आहे. आरिफने ७० ते ८० हिंदू मुलींना लक्ष्य केल्याचे आपल्यासमोर सांगितल्याचा दावा पीडितेने केला आहे. नवरात्रोत्सव आणि गणेशोत्सवाच्या काळात हिंदू तरुणींना लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही तिने केला आहे. या आरोपांची पोलिसांकडून चौकशी केली जात असून, या प्रकरणात आणखी पीडित महिला किंवा तरुणी तक्रार देतात का, याकडेही लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Crime News: उत्तर प्रदेशातून उल्हासनगरमध्ये गांजाची तस्करी; दोन तरुणांना अटक, १५ किलो गांजा जप्त

मोठ्या टोळीचा आरोप; पोलिसांच्या तपासाकडे लक्ष

आरिफ हा तरुणींना जाळ्यात ओढणाऱ्या मोठ्या टोळीशी संबंधित असल्याचा दावा पीडितेने केला आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आरोपींचे इतर कोणाशी संबंध आहेत का, अशा प्रकारची आणखी प्रकरणे आहेत का आणि पीडितेने केलेले आरोप कितपत खरे आहेत, याचा तपास पोलिसांकडून केला जाणे अपेक्षित आहे.

Web Title: Nalasopara forced conversion abuse allegation arif sheikh case sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • crime news
  • latest news
  • Nalasopara
  • nalasopara news

संबंधित बातम्या

Crime News: ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा अंतिम निर्णय! सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान-साहिलला फाशीची शिक्षा
1

Crime News: ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा अंतिम निर्णय! सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान-साहिलला फाशीची शिक्षा

Crime News: उत्तर प्रदेशातून उल्हासनगरमध्ये गांजाची तस्करी; दोन तरुणांना अटक, १५ किलो गांजा जप्त
2

Crime News: उत्तर प्रदेशातून उल्हासनगरमध्ये गांजाची तस्करी; दोन तरुणांना अटक, १५ किलो गांजा जप्त

लग्नाला अवघे चार महिने अन् नवविवाहितेने संपवले जीवन; पतीने फसवल्याचा माहेरच्यांचा आरोप
3

लग्नाला अवघे चार महिने अन् नवविवाहितेने संपवले जीवन; पतीने फसवल्याचा माहेरच्यांचा आरोप

Nalasopara Fire : देव तारी त्याला कोण मारी ! ११व्या मजल्यावर अग्नितांडव, मृत्यूशी केली यशस्वी झुंज
4

Nalasopara Fire : देव तारी त्याला कोण मारी ! ११व्या मजल्यावर अग्नितांडव, मृत्यूशी केली यशस्वी झुंज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.