Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident: नागपुरात भीषण अपघात! विटांनी भरलेला ट्रक पलटी; 3 मजुरांचा जागीच मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील ईसापुरजवळ विटांनी भरलेला आयशर ट्रक पलटी होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ट्रकमध्ये झोपलेल्या तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चालक आणि मालक जखमींना सोडून फरार झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 20, 2026 | 11:29 AM
ACCIDENT (फोटो सौजन्य- PINTEREST)

ACCIDENT (फोटो सौजन्य- PINTEREST)

Follow Us
Follow Us:
  • विटांनी भरलेला ट्रक पलटी होऊन 3 मजुरांचा मृत्यू
  • ट्रकच्या केबिनमध्ये झोपलेल्या मजुरांवर काळाची झडप
  • अपघातानंतर चालक आणि मालक घटनास्थळावरून फरार
नागपूर: नागपूर जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. विटांनी भरलेला आयशर ट्रक पलटी होऊन अपघात झाल्याच्या समोर आले आहे. या भीषण अपघातात तीन मजुरांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. तर अन्य तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घडलेली घटना नागपूर जिल्ह्यातील खापा येथून मोवाड कडे ट्रक जात असताना सावनेर मार्गावरील ईसापुर गावाजवळ पहाटेच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.

कसा झाला अपघात?

भरधाव ट्रक वरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट रस्त्याखाली जाऊन पलटला असा अंदाज व्यक्त केला जात आहे ट्रकच्या केबिनमध्ये सहा मजूर गाड झोपेत होते. याच वेळी काळाने झडप घेतली आणि यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन मजूर गंभीर जखमी झाले. मृत्यू झालेल्यांची नावे संजय कनेरे, लीलाधर वालुलकर, आणि अजित भलावी असे आहेत. तर जखमींची नावे अशी राजेंद्र राजगुरू, हेमराज कन्हेरे आणि सुभाष दुर्वे अशी आहेत.

Police Attack Tasgaon: तासगावात पोलिसांवर दगडफेक! मंदिर चोरीच्या तपासासाठी गेलेल्या पथकावर हल्ला

यात धक्कादायक बाब म्हणजे अपघातानंतर जखमींना मदत करायचे सोडून चालक आणि मालक घटनास्थळावरून फरार झाले. या प्रकरणी प्रवीण उर्फ गोलू बले याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या अपघाताने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नागपुरात पुन्हा गोळीबार! महाल परिसरात मध्यरात्री थरार; तीन बाईकवर आले अन् दोनदा गोळीबार केला

नागपूर शहरातून गोळीबाराची घटना समोर आली आहे. नागपूरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महालच्या कोठी रोड परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली. तीन बाईकवर आलेल्या सहा जणांनी दोनदा गोळीबार केल्याची माहिती आहे. ही घटना रविवारी रात्री अकरा ते बाराच्या सुमारास घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडालेली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

रवी मोहतो, गंगा काकडे यांनी गोळीबार केल्याची माहिती सौरभ नावाच्या फिर्यादीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. वर्चस्व आणि दहशत पसरविण्यासाठी ही फायरिंग केल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या असून ते अमली पदार्थ विक्री आणि बाळगण्याचे त्यांच्यावर गुन्हे आहेत. त्यांच्यातील अंतर्गत वादातून ही गोळीबार झाल्याचे बोलले जात आहे.

घडलेली घटना नागपूरच्या संघ कार्यालयापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोतवाली पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून तपासांती या प्रकरणाचे सत्य समजू शकणार आहे.

Jaigad Bomb Blast: जयगड परिसरात गावठी हातबॉम्बचा स्फोट; महिला गंभीर जखमी, २९ जिवंत बॉम्ब जप्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा अपघात कुठे घडला?

    Ans: हा अपघात नागपूर जिल्ह्यातील ईसापुर गावाजवळ सावनेर मार्गावर घडला.

  • Que: अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: या भीषण अपघातात तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले.

  • Que: अपघातानंतर चालकाने काय केले?

    Ans: अपघातानंतर चालक आणि मालक जखमींना मदत न करता घटनास्थळावरून फरार झाले.

Web Title: Accident horrific accident in nagpur truck loaded with bricks overturns 3 laborers die on the spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 11:24 AM

Topics:  

  • Accident
  • crime
  • Nagpur Accident

संबंधित बातम्या

Accident News: पहिल्यांदाच हट्ट केला अन् काळाने हिरावून नेले; दिवेआगरच्या समुद्रात सुमितचा दुर्दैवी अंत
1

Accident News: पहिल्यांदाच हट्ट केला अन् काळाने हिरावून नेले; दिवेआगरच्या समुद्रात सुमितचा दुर्दैवी अंत

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
2

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
3

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
4

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.