Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 2 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: साताऱ्यात मध्यरात्री भीषण अपघात; कार 3 वेळा पलटी, एका तरुणाचा जागीच मृत्यू

साताऱ्यातील कराड तालुक्यात गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी निघालेल्या तीन मित्रांच्या कारचा भीषण अपघात झाला. भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने ती दोन ते तीन वेळा पलटी होऊन झाडीत कोसळली. या अपघातात बीडच्या 23 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 14, 2026 | 10:55 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • गणपतीपुळे ट्रिपसाठी निघालेल्या मित्रांच्या कारचा कराडमध्ये अपघात.
  • कार 2 ते 3 वेळा पलटी होऊन झाडीत कोसळली; एका तरुणाचा मृत्यू.
  • चंद्रपूरचा युवक गंभीर जखमी असून मसूर पोलीस तपास करत आहेत.
सातारा: सातारा जिल्ह्यातून अपघाताची बातमी समोर आली होती. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गणपतीमुळे येथे फिरण्यासाठी निघालेल्या तीन मित्रांचा चारचाकी कारचा भीषण अपघात झाला. (Accident News) या अपघातात एका २३ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. एका जण गंभीर तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना मध्यरात्री कराड तालुक्यातील वडोली भिकेश्वर गावाजवळ घडली. एक जण गंभीर तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे.(Accident News)

कसा झाला अपघात?

या अपघातातील तिन्ही मित्र कोरेगाव एका कंपनीत एकत्र काम करत होते. सुट्टी मिळाल्याने त्यांनी कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे जाण्याचा बेत आखला. ते तिघेही निघाले आणि कराड तालुक्यातील वडोली भिकेश्वर गावाच्या हद्दीत आले असता त्यांच्या भरधाव वेगातील करवरील नियंत्रण सुटले.( Accident News) हा अपघात इतका भीषण होता की, ही कार रस्त्यावरच २ ते ३ वेळा पलटी झाली. त्यांनतर रस्त्यालगत असलेल्या खोल झाडीत जाऊन अडकली. या भीषण अपघातात कारमधील तरुण एका तरुणाचा मृत्यू झाला तर २ तरुण जखमी झाले आहे. ( Accident News)

Beed Crime: लग्नानंतर मुलगी गर्भवती; रुग्णालयातील तपासणीत धक्कादायक खुलासा

स्थानिकांनी धाव घेत बचावकार्य केले

मध्यरात्रीच्या शांततेत झालेल्या या अपघाताचा आवाज ऐकून वडोली भिकेश्वर परिसरातील स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. गाडी झाडीत अडकल्यामुळे नागरिकांनी रात्रीच्या अंधारातच मोठ्या शिताफीने मदतकार्य राबवून जखमींना गाडीबाहेर काढले. (Accident News) त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरु केला आहे. (Accident News)

एकाच मृत्यू तर…

ओंकार खंडागळे (वय २३ वर्ष) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ओंकार हा बीड जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या कामाच्या निमित्ताने पाटण येथे राहत होता. तर गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव प्रशिक धावणे (वय २८ वर्ष, मूळ रा. चंद्रपूर जिल्हा) असे आहे. प्रशिकवर रुग्णालयात अतिदक्षाता विभागात उपचार सुरु आहे. (Accident News) तिसरा युवक हा सातारा जिल्ह्यातील पडळ येथील रहिवासी असून तो सुदैवाने या अपघातात किरकोळ जखमी झाला आहे. या अपघातामुळे कोरेगाव आणि मृताच्या मूळ गावी बीड परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Latur Accident: भरधाव ट्रकचा कहर! दुचाकी आणि कारला धडक; लातूरमध्ये तिघांचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा अपघात कुठे घडला?

    Ans: कराड तालुक्यातील वडोली भिकेश्वर गावाजवळ हा भीषण अपघात झाला.

  • Que: अपघातात कोणाचा मृत्यू झाला?

    Ans: बीड जिल्ह्यातील 23 वर्षीय ओंकार खंडागळे यांचा जागीच मृत्यू झाला.

  • Que: अपघातानंतर काय घडले?

    Ans: स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेत जखमींना बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले.

Web Title: Accident news horrific accident in satara at midnight car overturned three times one youth died on the spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 10:55 AM

Topics:  

  • Accident
  • Satara
  • Satara Accident
  • Trip

संबंधित बातम्या

वर्धापन दिनानिमित्त सातारा पालिकेचा हरित शहराचा संदेश, साताऱ्यातून भव्य रॅली शहरातील महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन
1

वर्धापन दिनानिमित्त सातारा पालिकेचा हरित शहराचा संदेश, साताऱ्यातून भव्य रॅली शहरातील महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन

Jawali News: जावळीच्या सुपुत्रावर मोठी जबाबदारी! अंकुश कदम यांची शिवसेना प्रवक्तेपदी नियुक्ती
2

Jawali News: जावळीच्या सुपुत्रावर मोठी जबाबदारी! अंकुश कदम यांची शिवसेना प्रवक्तेपदी नियुक्ती

F35 Crash: सॅन दिएगोमध्ये USचे अत्याधुनिक फायटर जेट कोसळले; मिरामार एअर बेसजवळ भीषण अपघात, लष्कराकडून चौकशी सुरू
3

F35 Crash: सॅन दिएगोमध्ये USचे अत्याधुनिक फायटर जेट कोसळले; मिरामार एअर बेसजवळ भीषण अपघात, लष्कराकडून चौकशी सुरू

Satara Rain: शिवडे येथे उत्तर मांड नदीच्या पुलावरून पाणी; वाहतूक बंद, उंब्रज परिसरात मुसळधार पावसाचा तडाखा
4

Satara Rain: शिवडे येथे उत्तर मांड नदीच्या पुलावरून पाणी; वाहतूक बंद, उंब्रज परिसरात मुसळधार पावसाचा तडाखा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.