Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्न करावं की नाही? विवाहाचे आमिष दाखवले, विश्वास संपादन केला अन् थेट…; पुण्यातून समोर आले ‘हे’ भयानक प्रकरण

पोलिसांनी आरोपीविरोधात लुकआउट सर्क्युलर जारी केला होता. तो २५ जूनला सिंगापुरहून मुंबई विमानतळावर येणार होता. त्याची माहिती ‘इमिग्रेशन ब्युरो’कडून पुणे सायबर पोलिसांना समजली. सायबर पोलिसांनी त्याला अटक केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 27, 2025 | 09:29 PM
लग्न करावं की नाही? विवाहाचे आमिष दाखवले, विश्वास संपादन केला अन् थेट…; पुण्यातून समोर आले ‘हे’ भयानक प्रकरण
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: सायबर गुन्ह्यांत भरमसाठ वाढ होत असताना पुणे पोलिसांच्या सायबर सेलने एका आंतरराष्ट्रीय सायबर चोरट्याला मुंबईतील विमानतळावरून बेड्या ठोकल्या असून, त्याच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. तो शादी डॉटकॉम मॅट्रिमोनियल साईटवरून तब्बल साडे तीन हजार महिलांशी ‘कनेक्ट’मध्ये असल्याचे समोर आले आहे. त्याने पुण्यातील एका महिलेची साडे तीन कोटी रुपयांची फसवणूक केली होती. त्याप्रकरणात त्याला अटक केल्यानंतर चौकशीतून ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. त्याने यातील किती महिलांना फसविले आहे, याबाबत तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

याप्रकरणी डॉ. रोहित ओबेरॉय उर्फ अभिषेक शुक्ला (मूळ भारतीय, सध्या स्थायिक ऑस्ट्रेलिया) असे आरोपीचे नाव आहे. त्याला २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई अप्पर आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ, वरिष्ठ निरीक्षक स्वप्नाली शिंदे, उपनिरीक्षक सुशिल डमरे व त्यांच्या पथकाने केली आहे.

दिल्लीतील एक महिला पुण्यात खराडी येथे काही काळ राहत होती. तिने शादी डॉट कॉमवर लग्नासाठी प्रोफाइल तयार केले होते. २०२३ मध्ये आरोपीने डॉ. रोहित ओबेरॉय नावाच्या प्रोफाइलद्वारे तिला मेसेज केला. स्वतःला ऑस्ट्रेलियात राहणारा डॉक्टर असल्याचे सांगितले. मैत्री केली. नंतर तो पुण्यातही आला. दोघे पुण्यासह भारतात इतर ठिकाणी एकत्र राहिले. या महिलेला तिच्या पहिल्या पतीकडून ५ कोटी रुपयांची पोटगी मिळाली होती. ती या पैशातून लहान मुलांसाठी विविध कार्यक्रम सुरू करणार होती.

ही माहिती आरोपीला कळाल्यावर त्याने तिचा विश्वास संपादन केला. व्यवसायासाठी सिंगापूरहून गुंतवणूक मिळवून देतो, असे सांगून त्यासाठी ‘इव्हॉन हँदायनी’ आणि ‘विन्सेंट कुआण’ नावाच्या बनावट लोकांची ओळख करून दिली. तिघांनी मिळून पीडित महिलेला सिंगापूर आणि भारतातील विविध बँकांमध्ये टप्प्याटप्प्याने तीन कोटी ६० लाख रुपये भरायला लावले. नंतर आरोपी ऑस्ट्रेलियाला गेला आणि महिलेशी संपर्क टाळला. काही दिवसांनी महिलेला एका इमेलद्वारे ‘डॉ. रोहित’चा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. पण, महिलेला संशय आल्याने तिने तक्रार दिली होती.

आरोपीची खरी ओळख समोर
सायबर पोलिसांच्या तपासात ‘डॉ. रोहित ओबेरॉय’ हे नाव बनावट असून, त्याचे खरे नाव अभिषेक शुक्ला असल्याचे समोर आले. तो मूळचा लखनऊचा असून सध्या ऑस्ट्रेलियात पर्थ येथे स्थायिक आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व स्वीकारले असून, तेथे लग्नही केलेले आहे. त्यास दोन मुले आहेत.

‘लुकआउट’ नोटीशीमुळे आरोपीची माहिती
पोलिसांनी आरोपीविरोधात लुकआउट सर्क्युलर जारी केला होता. तो २५ जूनला सिंगापुरहून मुंबई विमानतळावर येणार होता. त्याची माहिती ‘इमिग्रेशन ब्युरो’कडून पुणे सायबर पोलिसांना समजली. सायबर पोलिसांनी त्याला अटक केली.

हजारो महिलांना मेसेज
आरोपीने शादी डॉट कॉमवर खोटे प्रोफाइल तयार करून ३१९४ महिलांना मेसेज पाठवले होते. त्यामुळे आरोपीने अजून किती महिलांना फसवले आहे, याचा तपास सुरू आहे. आरोपीकडून (प्रोफाइल क्रमांक एसएच-८७३४१२३१) कोणाची फसवणूक झाली असेल, तर ७०५८७१९३७१/७५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पंकज देशमुख यांनी केले आहे.

Web Title: Accused cyber fraud with woman with 3 5 crore pune crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 09:29 PM

Topics:  

  • crime news
  • cyber crime
  • Cyber Fraud
  • pune news

संबंधित बातम्या

Bribe News : 7 हजाराची लाच घेणं भोवलं; शिरूर तालुक्यातील महिला तलाठ्याला रंगेहात पकडले
1

Bribe News : 7 हजाराची लाच घेणं भोवलं; शिरूर तालुक्यातील महिला तलाठ्याला रंगेहात पकडले

माझा पराभव करण्यासाठी दोन मंत्र्यांनी ताकद लावली होती, पण…; विजयानंतर अमोल बालवडकर यांची प्रतिक्रीया
2

माझा पराभव करण्यासाठी दोन मंत्र्यांनी ताकद लावली होती, पण…; विजयानंतर अमोल बालवडकर यांची प्रतिक्रीया

PMC Election Results: पुण्यातील ‘हा’ गड भाजपने राखला; विरोधकांना दिला क्लीन स्वीप
3

PMC Election Results: पुण्यातील ‘हा’ गड भाजपने राखला; विरोधकांना दिला क्लीन स्वीप

Pune Crime News : मित्राच्या घरी जेवायला गेला, अन्…; पुण्यातील खळबळजनक घटना
4

Pune Crime News : मित्राच्या घरी जेवायला गेला, अन्…; पुण्यातील खळबळजनक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.