Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMC Election Results: पुण्यातील ‘हा’ गड भाजपने राखला; विरोधकांना दिला क्लीन स्वीप

प्रभाग क्रमांक ४० कोंढवा बुद्रुक–येवलेवाडी येथे तर भाजपने ‘क्लीन स्वीप’ दिला. अर्चना जगताप, वृषाली कामठे, पूजा कदम आणि रंजना टिळेकर या चारही उमेदवारांनी विजय मिळवत भाजपचा गड अधिक भक्कम केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 17, 2026 | 02:35 AM
PMC Election Results: पुण्यातील ‘हा’ गड भाजपने राखला; विरोधकांना दिला क्लीन स्वीप
Follow Us
Follow Us:

प्रभाग क्रमांक ३९ आणि ४० भाजपचा विजय
प्रभाग क्रमांक ३९ मध्ये ठरली लक्षणीय कामगिरी
३९ ‘ब’ राष्ट्रवादी काँग्रेसने एक जागा जिंकली

पुणे: कोंढवा–येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ३९ आणि ४० मध्ये भारतीय जनता पार्टीने आपला बालेकिल्ला कायम राखत निर्णायक वर्चस्व सिद्ध केले आहे. या भागात झालेल्या मतमोजणीअंती बहुसंख्य जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवत राजकीय ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली.

प्रभाग क्रमांक ३९ मध्ये भाजपची कामगिरी लक्षणीय ठरली. ३९ ‘अ’ मधून वर्षा साठे, ३९ ‘क’ मधून रूपाली धाडवे आणि ३९ ‘ड’ मधून बाळा ओसवाल हे भाजपचे उमेदवार विजयी झाले. मात्र ३९ ‘ब’ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतीक कदम यांनी बाजी मारत या प्रभागात भाजपची एक जागा रोखली. तरीही एकूण निकाल पाहता प्रभाग ३९ वर भाजपचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले.

प्रभाग क्रमांक ४० कोंढवा बुद्रुक–येवलेवाडी येथे तर भाजपने ‘क्लीन स्वीप’ दिला. अर्चना जगताप, वृषाली कामठे, पूजा कदम आणि रंजना टिळेकर या चारही उमेदवारांनी विजय मिळवत भाजपचा गड अधिक भक्कम केला. या प्रभागात आमदार योगेश अण्णा टिळेकर यांचे राजकीय प्राबल्य असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले. विशेष म्हणजे, त्यांच्या मातोश्री रंजना टिळेकर या पुन्हा निवडून आल्याने टिळेकर कुटुंबाचा प्रभाव मतदारांनी स्पष्टपणे मान्य केल्याचे चित्र आहे.

PMC Elections Result : पुण्यातील प्रभाग 33 मध्ये तुतारी वाजली; अनिता इंगळे विजयी

दरम्यान, भाजपमधून शिवसेनेत गेलेल्या माजी नगरसेविका संगीता ठोसर यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच प्रभाग ३९ मधून चर्चेत असलेले कुमार उर्फ बापू नायर यांनाही मतदारांचा अपेक्षित पाठिंबा मिळू शकला नाही. एकूणच, कोंढवा–येवलेवाडी परिसरात भाजपने आपली संघटनात्मक ताकद, स्थानिक नेतृत्व आणि मतदारांशी असलेला संपर्क यांचा प्रभावी वापर करत बालेकिल्ला अभेद्य राखल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. विरोधकांना काही ठिकाणी यश मिळाले असले, तरी या विभागात सत्ता आणि प्रभाव भाजपकडेच असल्याचे मतदारांनी ठामपणे अधोरेखित केले.

अनिता इंगळे विजयी

राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडलं. आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, लवकरच सर्व प्रभागाचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. आजच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही जागांचे निकाल हाती आले आहेत. पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक ३३ (ब) मधून शरद  पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अनिताताई तुकाराम इंगळे विजयी झाल्या आहेत.

Web Title: Bjp get victory in ward 39 and 40

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • ajit pawar
  • BJP
  • PMC Election 2026
  • pune news

संबंधित बातम्या

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
1

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
2

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ
3

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ

‘संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा’; हर्षवर्धन सपकाळांचा RSS-BJP वर हल्लाबोल
4

‘संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा’; हर्षवर्धन सपकाळांचा RSS-BJP वर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.