वडगाव मावळमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार (फोटो- istockphoto )
वडगाव मावळ: राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. महिलांवरील अत्याचार होण्याचे गुन्हे राज्यात रोज कुठे ना कुठे घडताना दिसून येत आहेत. पोलिस देखील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न करताना दिसून येत आहेत. दरम्यान पुण्याच्या वडगाव मावळ येथून अशीच एक दुर्दैवी घटना समोर अलायी आहे. वडगाव मावळमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिक संतप्त झाले असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
२० वर्षीय मुलीवर १० जणांनी केला आळीपाळीने बलात्कार
ओडीशा राज्यातील गोपालपूर या प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यावर 20 वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचार करण्याचा दुर्दैवी घटना घडली होती. गोपालपूर या समुद्रकिनाऱ्यावर 20 वर्षीय युवतीवर तिच्या प्रियकरासमोरच सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. या घटनेत आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात 4 अल्पवयीन आणि 10 आरोपींना अटक केली आहे.
मोठी बातमी! २० वर्षीय मुलीवर १० जणांनी केला आळीपाळीने बलात्कार; अटक झालेल्यामधे ४ अल्पवयीन
20 वर्षीय युवती जवळील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. ती युवती आपल्या प्रियकरासोबत समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेली होती. तिने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, ते दोघेही समुद्रकिनाऱ्यावर एका निर्जन ठिकाणी बसले होते. त्याच वेळेस त्या दोघांना 10 जणांच्या टोळीने घेरले. त्यानंतर त्यांनी तिच्या प्रियकारला पकडून ठेवले. त्यानंतर 10 जणांनी त्या युवतीवर आळीपाळीने अत्याचार केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सर्वात प्रथम 7 जणांना चौकशीसाथी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर सर्व 10 आरोपीना अटक करण्यात आली आहे. आरोपी दुसऱ्या राज्यात पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्याआधीच त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.