Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाचेच ‘एक’ प्रकरण, दोन सरपंच जाळ्यात; काय आहे प्रकरण?

सरपंच पत्नीच्या पतीला १६ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. वेल्हा तालुक्यातील मौजे वरघड येथील महिला सरपंच पती व त्यांना प्रोत्साहन देणारे गिवशी आंबेगाव येथील सरपंचाना पकडण्यात आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 06, 2025 | 02:37 PM
लाचखोर संशयित प्रशांत राठी रुग्णालयातून फरार

लाचखोर संशयित प्रशांत राठी रुग्णालयातून फरार

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यनगरी अन् ग्रामीण भागात लाचेच्या सापळा कारवाया वाढत असतानाच लाचेच ‘एक’ प्रकरण अन् जाळ्यात अडकले दोन सरपंच असा आगवेगळा कारवाईचा फास पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केला आहे. सरपंच पत्नीच्या पतीला १६ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. वेल्हा तालुक्यातील मौजे वरघड येथील महिला सरपंच पती व त्यांना प्रोत्साहन देणारे गिवशी आंबेगाव येथील सरपंचाना पकडण्यात आले आहे. या कारवाईने ग्रामीण भागात चांगलीच चर्चा रंगली आहे.

वरघड ग्रामंपचायतीच्या महिला सरपंचाचे पती नथुराम कोंडीबा डोईफोडे (वय ३२, रा. रायकरमळा, धायरी गाव) व वेल्हातील गिवशी आंबेगावचा सरपंच बाळासाहेब धाबू मरगळे (वय ३३, किरकटवाडी, हवेली) अशी पकडलेल्या दोघांची नावे आहेत. ही कारवाई सिंहगड रस्त्यावरील नांदेडसिटी गेटच्या समोरच्या बाजुस असलेल्या अतुल्य हॉटेलच्या पार्कींगमध्ये केली.

तक्रारदार यांनी वेल्ह्यातील वरघड गावात जमीन खरेदी केली आहे. त्या जमीनीवर पुर्वीच्या मालकाचे नाव आहे. हे नाव घराच्या गाव नमुना ८ उतर्‍यावरून कमी करायचे होते. त्यासाठी तक्रारदाराने वरघड ग्रामपंचायतीकडे पुर्वीच्या मालकाचे नाव कमी करावे, असा अर्ज केला होता. त्या अनुषंगाने तक्रारदार वरघड गावची सरपंच महिला सुवर्णा नथुराम डोईफोडे व त्यांचे पती नथुराम यांना भेटले. तक्रारदारांच्या कामासाठी व तसा ठराव ग्रामपंचायतीच्या बैठकीत घेण्यासाठी महिला सरपंच व तिच्या पतीने तक्रारदारांकडे १८ हजारांची लाचेची मागणी केली. नंतर तक्रारदारांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली.

एसीबीने पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानूसार सापळा कारवाईत सरपंचाचा पती नथुराम तडजोडीअंती १६ हजार रुपयांची लाच घेताना जाळ्यात अडकला. तेव्हाच लाच घेण्यासाठी प्रोत्साहन देणारा गिवशी गावचा सरपंच बाळासाहेब मरगळे यालाही ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर पुढील कारवाई सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : गुन्हे शाखेच्या युनिट 6 ची मोठी कारवाई; घरफोड्या करणार्‍या दोघांना ठोकल्या बेड्या

पाच हजारांची लाच घेताना पकडले

राज्यात लाच घेणाऱ्याविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई होताना दिसत आहे. लाच घेतल्याचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. अशातचं गेल्या काही दिवसाखाली सातबारा उताऱ्यावरील नोंदीसाठी तलाठ्यासाठी पाच हजारांची लाच घेणाऱ्या एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले आहे. फुरसुंगीतील तलाठी कार्यालयाच्या आवारात ही कारवाई केली. याप्रकरणी ठकसेन उर्फ तुषार मारुती गलांडे (वय 42, रा. नारायणनगर, फुरसुंगी, हडपसर) याच्यावर हडपसर पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वाये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Action has been taken against two sarpanchs in pune for accepting bribes nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2025 | 02:36 PM

Topics:  

  • Arrested
  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.