सौजन्य फोटो - AI Gemini
पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फुलंब्री तालुक्यातील पाडळी एकफाटा शिवारातील गट क्रमांक २८ मधील लालवन शिवारात एका शेतकऱ्याने लपूनछपून गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती पिशोर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ संबंधित शेतात छापा टाकून धडक कारवाई केली. पोलिसांनी प्रत्यक्ष शेतात पाहणी केली असता, तुरीच्या पिकाच्या आडोशाने बेकायदेशीरपणे गांजाची झाडे लावली असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी शेतातून गांजाची तब्बल १४१ झाडे जप्त केली. या जप्त केलेल्या गांजाचे एकूण वजन १ क्विंटल ५ किलो इतके भरले.
या कारवाईत पोलिसांनी गांजाच्या झाडांसह एकूण ५२ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा ऐवज आणि मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी ६६ वर्षीय शेतकरी चैनसिंग रतनसिंग बिमरोटे याला पोलिसांनी तात्काळ अटक केली. आरोपी शेतकऱ्याविरुद्ध अमली पदार्थ व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ म्हणजेच NDPS कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि सहायक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पिशोर पोलिसांच्या पथकाने पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी करीत आहेत.
Ans: ही कारवाई छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील लालवन शिवार (पाडळी एकफाटा शिवारातील गट क्रमांक २८) येथे पिशोर पोलिसांनी केली.
Ans: पोलिसांनी १ क्विंटल ५ किलो वजनाची गांजाची १४१ झाडे जप्त केली असून, एकूण ५२ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
Ans: या प्रकरणी ६६ वर्षीय शेतकरी चैनसिंग रतनसिंग बिमरोटे याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध NDPS (अमली पदार्थ विरोधी) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






